Bhartiyans

Menu

नोटाबंदी करून मोदींनी मोडले नक्षलवादाचे कंबरडे !

Date : 27 Nov 2016

Total View : 361

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातील हजार-पाचशेच्या नोटा रद्द करून दहशतवादाच्या मुळावरच घाव घातला आहे. त्यामुळे शेकडो कोटींची रोकड हाताशी असूनही तिचा उपयोग करता नसल्याने नक्षलवादी कात्रीत अडकले आहेत.


सारांश

नोटाबंदीमुळे बेहिशेबी रोकड बाळगणारे नक्षलवादी आता अडचणीत येणार आहे. गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रकमा खात्यांत भरल्या गेल्या आहेत. मात्र, अशा खात्यांची पडताळणी होणे क्रमप्राप्तच आहे. राज्य नक्षलविरोधी मोहिमेचे प्रमुख शिवाजी बोडके म्हणाले, की गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यांमधील बँकसविस्तर बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चलनी नोटा रद्द करून दहशतवादाला जबरदस्त टोला लगावण्याच्या बेताने नक्षलवादाच्या मर्मावर पण घाव बसला आहे असे दिसतेय.

नोटा रद्द होण्याची घोषणा झाल्यापासून अंतर्गत माहिती आणि सुरक्षा यंत्रणा अतिशय सतर्क आहेत. त्यामुळे शेकडो कोटी रोकड हाताशी असलेल्या नक्षलवाद्यांना त्यांच्या नोटा बदलून घेण्याची गोची झालेली आहे.

जंगलात रोकड दडपून ठेवलेल्या गुप्त जागा फारच थोड्या मोठ्या नक्षली नेत्यांना माहिती आहेत. तिथून त्या काढून आणून बँकां पर्यंत आणून त्यांतून मोठ्या प्रमाणात बदलणे जवळपास अशक्य होऊन बसले आहे.

सुरक्षा यंत्रणेतील काही लोकांना वाटत आहे की अशा परिस्थितीत नक्षलवादी शक्य होईल तिथे नागरी समर्थक, बिनसरकारी संस्थांच्या स्वरूपात काम करणाऱ्या समर्थक संस्था, आणि अगदी खेडुतांच्या वेशात स्वत:चे नक्षली लोक, या मार्गांचा अवलंब करून बँकांतून नोटा बदलून घेण्याचा प्रयत्न करतील.

बँक व्यवसायातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात रोख रक्कम खात्यांत भरल्या गेली आहे. ज्या खात्यांत अशी रक्कम भरली गेली आहे, त्यांची पडताळणी होणे क्रमप्राप्तच आहे.

पोलीस महासंचालक आणि राज्य नक्षल विरोधी मोहिमेचे प्रमुख श्री शिवाजी बोडके म्हणाले की गडचिरोळी, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये बँकांच्या आणि इतर आर्थिक संस्थांच्या आसपास टेहळणी अगदी बारकाईने करण्यात येत आहे.

सुरक्षा यंत्रणा सतर्क आहे, आणि बेहिशेबी रोकड पकडण्यासाठी झडत्या घेणे चालू आहे. बँकांना विश्वासात घेऊन संशयास्पद भरणा आणि इतर पैशांच्या व्यवहारांबद्दल माहिती मिळवणे चालू आहे.

सुरक्षा यंत्रणेतील सूत्रांनुसार नक्षल प्रभावित क्षेत्र आणि आसपासच्या भागांत योजलेल्या या कडक उपायांमुळे नक्षलवाद्यांनी जमा केलेली सुमारे १५०० कोटी रुपयांची बेहिशेबी रक्कम अडकून राहू शकते.

मध्य भारतातल्या दुर्गम प्रदेशात नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य विशेष विभाग समिती (दविविस) कडे साधारण ५०० कोटी रुपये असू शकतात. दविविस च्याच अखत्यारीत असलेल्या गडचिरोलीत साधारण २००-३०० कोटी रुपये जमा असू शकतात. गडचिरोली महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातला सर्वाधिक नक्षल प्रभावित भाग आहे.

नागपूर विभागाचे पोलिस महासंचालक श्री रवींद्र कदम म्हणतात की नोटा रद्दीकरण नक्षलवाद्यांच्या शहरी जाळ्यावर खूप आघात करेल, कारण शहरी भागातील नक्षली ग्रामीण भागातल्या त्यांच्या सहकार्यांकडून आर्थिक मदत मिळण्यावर अवलंबून असतात. आणि ग्रामीण भागातून पैसा येणे अवघड झाले आहे.

अजून एक त्रास म्हणजे ही रोकड जंगलांत दुर्गम जागी दडवून ठेवलेली आहे, जिथून ती इतक्या लवकर इतक्या मोठ्या प्रमाणात काढून आणणे सुरक्षा यंत्रणांच्या कडक नजरेमुळे दुरापास्त झालेले आहे.

बांधकाम कंत्राटदार, व्यापारी, खाण कंपन्या आणि इतर व्यावसायिक संस्था यांच्या कडून गोळा केलेली खंडणी नक्षलवाद्यांसाठी पैशाचे मुख्य स्रोत आहे. गडचिरोलीत तेंदूपत्ता गोळा करणारे आणि बांबू कापणारे कंत्राटदार सुद्धा या वर्गणीत आपला हिस्सा देण्यास बाध्य आहेत.

स्थानिक गरीब आदिवासी लोकांनाही नक्षलवाद्यांनी सोडलेले नाही. 'एक-दिवस-काम स्कीम' म्हणून ते त्यांच्या रोजंदारीमधली एक दिवसाची कमाई वर्गणी म्हणून देण्याची सक्ती करतात.

गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक श्री अभिनव देशमुख म्हणतात की नक्षलवाद्यांना होणारा हा त्रास नोटा रद्दीकरणाच्या प्रक्रियेचाच थेट परिणाम आहे. "मिळणाऱ्या माहितीवर आणि झडती घेण्यावर पोलिस भर देत आहेत".

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

कृष्णा धारासूरकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य