Bhartiyans

Menu

‘पंजाब केसरी’ लाला लजपत राय : एक द्रष्टा नेता

Date : 27 Nov 2016

Total View : 345

स्वातंत्र्यसंग्रामात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या लाला लजपत राय यांनी १७ नोव्हेंबर १९२८ रोजी जगाचा निरोप घेतला. लालाजींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा जागर करूया! टीम भारतीयन


सारांश

‘पंजाब नॅशनल बँके’ची स्थापना करून लालजींनी ‘बँकिंग’ संकल्पना भारतीयांच्या दैनंदिन व्यवहारात आणली. ‘हिंदू ओर्फन रिलीफ मुवमेंट’ सुरू केली. या चळवळीने अनेक अनाथ मुलांना आश्रय दिला. १८८६ मध्ये त्यांनी ‘दयानंद अंग्लो-वेदिक स्कूल’ सुरू केली. ‘स्वदेशी’चा उच्चार सर्वप्रथम लालजींनीच केला. त्यांना ब्रिटीश सरसविस्तर बातमी

स्वातंत्र्य संग्रामात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांपैकी एक अतिशय महत्वाचे नाव म्हणजे लाला लजपत राय!! १७ नोव्हेंबर १९२८ साली लालजींना आपण गमावले. आज लालाजींच्या पुण्यतिथी निमित्त टीम भारतीयनस् तर्फे त्यांचा आठव मनात जागृत करूया!

खरंतर स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक ह्यांच्या बरोबरीने लालजींच नाव आठवतं. एक अतिशय करारी व्यक्तिमत्व ज्यांना लहानपणापासूनच भारतीय संस्कृतीचे धडे आणि संस्कार मिळाले.

लालजींना आपण विशेष करून ओळखतो ते “पंजाब नॅशनल बँक” चे संस्थापक म्हणून!‘बँकिंग’ ही संकल्पना लालजींनी भारतीयांच्या दैनंदिन व्यवहारात आणली.

ह्याहून समाजासाठी केलेलं सर्वोत्तम कार्य म्हणजे “हिंदू ओर्फन रिलीफ मुवमेंट” ची स्थापना, जी त्या काळची नितांत गरज होती. ह्या चळवळी अंतर्गत त्यांनी अनेक अशा अनाथ मुलांना आश्रय दिला ज्यांना अनेक ख्रिस्ती संस्था आपल्या वर्चस्वाखाली त्यांचे अस्तित्व मिटवू बघत होत्या.

१८८६ मध्ये लालजींनी समाजाला दिलेली अजून एक देणगी म्हणजे “दयानंद अंग्लो-वेदिक स्कूल”! ही शिक्षण संस्था आज प्रत्येक राज्यात कार्यरत आहे. 
खरतर स्वदेशीची चळवळ गांधीजीच्या अगोदर म्हणजे १९०० मध्ये लालजींनी भारताला शिकविली. त्या नंतर स्वदेशी चळवळ (Make in India) त्यांनी गांधीजी, ऑरोबिंदो घोष, बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल आणि इतर अनेक स्वातंत्र्य चळवळीच्या प्रणेत्यांबरोबर अमलात आणली.

‘पंजाब केसरी’ हा किताब त्यांना ब्रिटीश सरकार विरुद्ध पुकारलेल्या चळवळीनंतर लोकांनीच बहाल केला. आपल्या सर्वांना माहित असलेली ही चळवळ “Rowlett Act” विरुद्ध उभी केली होती.

त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अजून एक पैलू म्हणजे त्यांचे लिखाण! आपल्या उत्तुंग कारकिर्दीत त्यांनी बरीचशी पुस्तके लिहिली, जसे की, 'History of the Arya Samaj', 'England's Debt to India: India, The Problems Of National Education In India', 'Swaraj and Social Change', 'The United States of America: A Hindu's impressions and a study' इ.

भारतासाठीचं त्याचं प्राणार्पण आजही आपल्या इतिहासात अजरामर आहे. प्रत्येक भारतीय विद्यार्थी लालजींचं आयुष्य आणि देशासाठीचा त्यांचा त्याग नक्कीच पाठ्यपुस्तकातून अभ्यासतो. “सायमन चले जाओ” चळवळ आणि त्यात प्राणाची आहुती देणारे लालाजी हा प्रसंग आपल्या सर्वांना परिचित आहे. अश्या धडाडीच्या, उत्तुंग व्यक्तिमत्वाला आमचा, टीम भारतीयनस् चा नतमस्तक होऊन नमस्कार!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

टीम भारतीयन्स

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य