Bhartiyans

Menu

केरळचे ‘जन शिक्षण संस्थान’ युनेस्कोच्या साक्षरता पुरस्काराने सन्मानित

Date : 27 Nov 2016

Total View : 382

केरळच्या ‘जन शिक्षण संस्थान’ या संस्थेला ‘युनेस्को कान्फ्युशियस प्राईज फॉर लिटरसी’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केरळच्या १००% साक्षरतेमध्ये या संस्थेचा मोलाचा वाटा कसा आहे, चला जाणून घेऊया!


सारांश

केरळच्या ‘जन शिक्षण संस्थान’ या सामाजिक संस्थेला ‘युनेस्को कान्फ्युशियस प्राईज फॉर लिटरसी’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थानचे अध्यक्ष पी. व्ही. अब्दुल वहाब आणि केंद्र संचालक व्ही. उम्मरकोय यांना युनेस्कोच्या पॅरीस येथील मुख्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्यासविस्तर बातमी

केरळच्या ‘जन शिक्षण संस्थान’ या एनजीओ अर्थात सामाजिक सेवा संस्थेला युनेस्कोच्यावतीने दिल्या जाणाऱ्या ‘युनेस्को कान्फ्युशियस प्राईज फॉर लिटरसी’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जन शिक्षण संस्थानचे अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य पी. व्ही. अब्दुल वहाब आणि केंद्र संचालक व्ही. उम्मरकोय यांना युनेस्कोच्या पॅरीस येथील मुख्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

युनेस्कोचा अत्यंत मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार साक्षरता आणि कौशल्य–विकास या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना दिला जातो. केरळच्या मलप्पुरम येथील ‘जन शिक्षण संस्थान’ (जे. एस. एस.) ही संस्था ग्रामीण भागातील नागरिक साक्षर व्हावे, त्यांना विविध कौशल्यांची ओळख होऊन ते ‘कुशल’ व्हावे, त्यांना उपजीविकेच्या चांगल्या संधी निर्माण व्हाव्या यासाठी गेल्या १२ वर्षांपासून कार्यरत आहे. भारताच्या मानव संसाधन विकास मंत्रालय पुरस्कृत असलेल्या या संस्थेने आतापर्यंत अनेक गरजूंना व्यावसायिक प्रशिक्षण दिले असून त्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.

जेएसएसचे समाजाभिमुख आणि समाजोपयोगी कार्य लक्षात घेता, हा पुरस्कार या संस्थेला देण्यात आला. यंदाच्या वर्षी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचा सुवर्णमहोत्सव साजरा होतो आहे. युनेस्कोच्या साक्षरताविषयक कार्यक्रमांचा ५० वा वर्धापनदिन जागतिक पातळीवर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे. त्यानिमित्त पॅरीस येथे दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत हा पुरस्कार देण्यात आला.

यावेळी युनेस्कोच्या काही सभासद राष्ट्रांचे शिक्षण मंत्री उपस्थित होते. ‘ग्लोबल रिपोर्ट ऑन ऍडल्ट लर्निंग अँड एज्युकेशन’ (जीआरएएलइ ३) च्या तिसऱ्या आवृत्तीचे सादरीकरण करण्यात आले. तसेच साक्षरता व इतर शाश्वत विकास ध्येये यांचा संबंध या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. जेएसएसच्या प्रतिनिधीनी ‘साक्षरता आणि शेती व इतर उपजीविकेच्या साधनांमधील दुवा साधण्यासाठी राबवले जाणारे उपक्रम आणि त्या संदर्भातील आंतर- क्षेत्रीय दृष्टीकोन’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले.

केरळ हे १००% साक्षर राज्य म्हणून ओळखले जाते. मात्र, हे यश केवळ एकट्या सरकारचे नाही तर जन शिक्षण संस्थानसारख्या अनेक सेवाभावी संस्थांचे आहे, हे विसरता कामा नये.

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

मृणाल काशीकर- खडक्कर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

इंडियन एक्सप्रेस