Bhartiyans

Menu

चेन्नईच्या बँकेने केली 'लक्ष्मी' या रोबोची शाखेत नेमणूक. रोबो देणार ग्राहकांना माहिती!!

Date : 27 Nov 2016

Total View : 173

नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरातल्या बँकिंग क्षेत्रावर प्रचंड ताण आला. बँक कर्मचारी अक्षरश: दिवसाचे १८ तास काम करत होते. म्हणूनच आता बँककाउंटरवर तुम्हाला दिसेल माणसाऐवजी रोबोट.


सारांश

प्रेम व्यक्त करू शकणारा, संवाद साधणारा, माहितीचा अतिजलद वापर करणाऱ्या बँकिंग रोबोचा वापर चेन्नईच्या कुम्ब्कोणम येथील 'सिटी युनियन बँके' ने आपल्या शाखेत मदतनीस म्हणून केला आहे. 'लक्ष्मी' या कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या रोबोचा बँकेत उपयोग करण्याचा प्रयोग भारतात पहिल्यांदाच होतो आहे. १२५ हून जास्त विषयसविस्तर बातमी

नोटा बदलण्याच्या निर्णयानंतर संपूर्ण देशभरातल्या बँकिंग क्षेत्रावर एक प्रचंड मोठा ताण आलेला आपण अनुभवला.

बँक कर्मचाऱ्यांवर अक्षरश: दिवसाचे १६-१८ तास काम करण्याच्या या तणावग्रस्त परिस्थितीमध्ये काउंटरवर माणसाऐवजी रोबोट तुम्हाला दिसला तर ?

प्रेम व्यक्त करू शकणारा, संवाद साधणारा, माहितीचा वापर अतिजलद करू शकणाऱ्या अश्या भारतातील पहिल्या बँकिंग रोबोचा वापर चेन्नईच्या कुम्ब्कोणम येथील 'सिटी युनियन बँके' ने आपल्या शाखेत मदतनीस म्हणून केला आहे.

'लक्ष्मी' या कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या पण बँकेत प्रत्यक्ष काम करणाऱ्या रोबोचा प्रयोग भारतात आता पहिल्यांदाच होतो आहे.

'लक्ष्मी'ला तयार करण्यासाठी सुमारे सहा महिने लागले. 
आता १२५ हून जास्त विषयांवर हा रोबो माहिती देऊ शकतो. 'आपल्याला खात्यातील शिल्लक जाणून घ्यायची असेल, गृह कर्जाचा व्याजदर हवा असेल, ठेवीसंबंधीची माहिती हवी असेल तर ही माहिती तुम्हाला 'लक्ष्मी' देऊ शकते. 
साध्या साध्या प्रश्नांच्या उत्तरांपासून ते कोअर बँकिंगपर्यंतची अवघड कामे करण्याचे 'प्रोग्राम' या रोबोत कार्यान्वित केलेले आहेत.

एखाद्या ग्राहकाला त्याच्या बँक खात्याचा तपशील किंवा आधीचे व्यवहार जाणून घ्यायचे असतील, तर हा रोबो ती उत्तरे त्याच्या डिस्प्लेवर फ्लॅश करू शकतो.

संवेदनशील माहिती, जसे की खात्याचा तपशील हा या रोबोच्या स्क्रीनवर सावधपणे प्रदर्शित केला जातो , तो मोठ्याने बोलून दाखवला जात नाही असे सिटी युनियन बँकेचे सीईओ आणि एमडी एन. कामाकोडी यांनी सांगितले.

पुढे ते विनोदाने म्हणाले, 'लक्ष्मी' फक्त सर्वसामान्य विषयांवर मोठ्या आवाजात बोलतो. आपण आपल्या मैत्रिणीसोबत आमच्या शाखेला भेट दिली, तर तो आपल्याला खात्यातील कमी शिल्लक सांगून तुम्ही खजील व्हाल, असे कदापि करणार नाही!

लक्ष्मी सध्या इंग्रजीमध्ये बोलतो आहे. तो हातवारे करतो, स्वतःभोवती फिरू शकतो आणि जिवंत माणसासारखा संभाषणामध्ये भाग घेऊ शकतो. बाकीच्या रोबोसारखी त्याची भाषा औपचारिक नसून, हलकीफुलकी आणि सहज आहे.

बँक अधिकारी म्हणाले,” कृत्रिम बुद्धिमत्ता असल्यामुळे हा रोबो सतत ग्राहकांकडून शिकत असतो. त्यामुळे जितके जास्त व्यवहार हा करेल तितका हा अधिक चांगल्या पध्दतीने आणि सफाईने काम करू शकेल.”

'एखाद्या प्रश्नाचे उत्तर 'लक्ष्मी' देऊ शकला नाही तर तो शाखा अधिकाऱ्याशी संपर्क साधा. असे सांगतो. मग आम्ही असे सर्व प्रश्न गोळा करुन, त्यांची उत्तरे रोबोमध्ये भरतो. जेणेकरून त्याला नवीन माहिती मिळते.

तो परकीय चलनाची माहिती देखील देऊ शकतो. वैयक्तिक, शैक्षणिक, दुचाकी, गृह अशा विविध कर्जांचे दर सांगू शकतो. भविष्यात तो विविध प्रकारची कामे कामे करू शकेल.' असा विश्वास रोबोचे निर्माते विजय शहा यांनी व्यक्त केला आहे.

या रोबोने ग्राहकांचे तमिळ भाषेतून स्वागत करावे, दृष्टिहीन लोकांना सेवा द्यावी, हे सिटी युनियनचे पुढील उद्दिष्ट आहे, असे सीईओ कामाकोडी म्हणाले.

सध्या लक्ष्मी सारखा एकाच रोबो बँकेकडे आहे पण जर 'लक्ष्मी' ग्राहकांच्या पसंतीस उतरली, तर वर्षाअखेरपर्यंत असे २५-३० रोबो सर्व महत्वाच्या शाखांमध्ये वापरण्यात येणार आहे.

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

टीम भारतीयन्स

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

टाइम्स ऑफ इंडिया