Bhartiyans

Menu

देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे..! हेच सांगतेय वयाच्या १०व्या वर्षी समाजसेवा करणारी क्षीरजा

Date : 29 Nov 2016

Total View : 342

वयाच्या १० व्या वर्षी कोणी समाजसेवा करतं का हो? असा प्रश्न पडणं साहजिक आहे. मात्र या प्रश्नाचं उत्तर ‘हो’ असं दिलं ते क्षीरजाने. कोण ही क्षीरजा..? चला, बघूया तरी!


सारांश

मुंबईची क्षीरजा ही साधारण दहा वर्षांची असतानाची गोष्ट. एकदा ती जेवताना नाक मुरडत होती. तिला ‘समज’ देण्यासाठी आईने तिला एका झोपडपट्टीत नेलं. त्या झोपडपट्टीत फूडपाकिट वाटणारी ट्रक आली होती. जेवणाचं पाकीट मिळवण्यासाठी मुले जिवाच्या आकांताने पळत होते. ते दृश्य पाहून क्षीरजाच्या जीवनाला मोठी कलाटणी मिळालसविस्तर बातमी

देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे
मंगलांनी बांधलेले गंधलाचे सोहळे..!
देखणी ती पाऊले, जी ध्यासपंथी चालती,
वाळवंटामधूनी स्वस्तिपद्मे रेखिती..!

वयाच्या दहाव्या वर्षी समाजसेवा करणाऱ्या मुंबईच्या क्षीरजाला पाहिलं, की कवी बा.भ.बोरकर यांच्या या ओळी आठवतात.

वयाच्या १० व्या वर्षी कोणी समाजसेवा करतं का हो? 
असा प्रश्न पडणं साहजिक आहे.

मात्र या प्रश्नाचं उत्तर ‘हो’ असं दिलं ते क्षीरजाने. 
कोण ही क्षीरजा..? 
चला, बघूया तरी!

ही मुंबईची क्षीरजा राजे. 
ती साधारण दहा वर्षांची असतानाची गोष्ट.

एकदा क्षीरजा जेवताना ‘हे नको, ते मला आवडत नाही’ असं नाक मुरडत होती. तिला ‘समज’ देण्यासाठी तिची आई उज्ज्वला राजे यांनी तिला एका जवळच्या झोपडपट्टीत नेलं. तिथलं दृश्य पाहिलं आणि क्षीरजाच्या जीवनाला खूप मोठी कलाटणी मिळाली.

त्या झोपडपट्टीत फूडपाकिट वाटणारा एक ट्रक आल होता. जेवणाचं किमान एक पाकीट मिळवण्यासाठी सर्व मुले जिवाच्या आकांताने प्रयत्न करत होती. काही ट्रकच्या मागे पळत होते. त्या पाकिटात काय आहे हे देखील त्या मुलांना माहीत नव्हत; पण परत कधी खायला मिळेल हे माहीत नसलेली मुले मिळेल ते आनंदाने खात होती.

हे पाहून क्षीरजाने ठरवलं, की या मुलांसाठी आपण पण काही तरी करायचं. यासाठी आई-वडिलांकडे पैसे मागण तिला पटत नव्हत.

शाळेने दिलेल्या प्रोजेक्टसाठी क्षीरजाने एक छोटा आकाश कंदील बनवला होता. त्यावरून आकाशकंदील विकण्याची कल्पना तिला सुचली. २ रुपये एवढा खर्च एक आकाशकांदील तयार करायला येत होता. 
तोच कंदील तिने ५ रुपयांना विकला. 
त्या दिवाळीत तिने असे अनेक कंदील विकले आणि झालेल्या नफ्यातून झोपडपट्टीतील मुलांना मदत केली.

क्षीरजा आज १३ वर्षांची आहे. तिचे व्रत तेवढ्याच जोमाने सुरू आहे.

लहानग्या क्षीरजाची काळाने पुन्हा एकदा परीक्षा पाहिली. 
तिच्या आईला ब्रेस्ट कॅन्सर झाला. 
घरची परिस्थिती चांगली असल्याने ते महागड्या उपचारांचा खर्च पेलवू शकत होते. मात्र, असे कितीतरी कॅन्सरग्रस्त रुग्ण असतील ज्यांना औषधांचा खर्च परवडत नसेल, त्यांचं काय? या विचाराने क्षीरजाला अस्वस्थ केले.

पुन्हा एकदा ती जिद्दीने कामाला लागली.

त्या वर्षी क्षीरजाने हँडीक्राफ्टच्या वस्तू विकून तब्बल ३०,००० रुपये जमा केले आणि ते कॅन्सरग्रस्त मुलांच्या उपचारासाठी दिले.

ज्या वयात मुले सोशल मीडियावर ‘टाईमपास’ करतात, त्या वयात क्षीरजा सोशल मीडियाद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचते आणि तिच्या वस्तुंची विक्री करते. 'क्षीरजा क्रिएशन'- KC या फेसबुक पेजवर तुम्हाला तिने बनवलेल्या असंख्य वस्तू दिसतील.

मुंबई, दिल्ली, पुणे अशा मोठ्या शहरातल्या विविध प्रदर्शनात ती या वस्तुंची विक्री करते. हँडीक्राफ्टच्या वस्तू तयार करण्याच्या कार्यशाळा देखील घेते.

‘ लवकरच एक दिवस असा येईल, की या देशात एकही मूल उपाशी झोपणार नाही आणि कोणीही उपचारावाचून मरणार नाही.’ असा आशावाद उराशी बाळगून कोणत्याही ‘मेव्या’ची अपेक्षा न करता समाज ‘सेवा’ करणाऱ्या क्षीरजाला सर्व ‘भारतीयन्स’चा सलाम!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

वैशाली सागर - देवकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य