Bhartiyans

Menu

राजस्थानी - बादाम का हलवा

Date : 29 Nov 2016

Total View : 414

भारतीयन्स’च्या फुडीझम सेक्शन मध्ये, खास थंडीसाठी जगभर प्रसिद्ध असलेली, एक अस्सल भारतीय पौष्टिक डिश.


सारांश

राजस्थानात रात्री व हिवाळ्यात तापमान शून्य डिग्रीच्याही खाली जातं. अशा वेळी अंगात उष्णता निर्माण करण्यासाठी सुकामेवा आणि तुपातल्या पदार्थांवर भर दिला जातो. आपल्याकडेसुद्धा सध्या गुलाबी थंडी सुरु झाली आहे आणि म्हणूनच आज आपण पाहणार आहोत, खास हिवाळ्यात केला जाणारा, राजस्थानचा एक अत्यंत सोपा पदार्थ ‘बादसविस्तर बातमी

भारतीयन्स’च्या फुडीझम सेक्शन मध्ये, खास थंडीसाठी जगभर प्रसिद्ध असलेली, एक अस्सल भारतीय पौष्टिक डिश. नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, गेल्या आठवड्यात सांगितल्याप्रमाणे आपल्या टीम भारतीयन्स’च्या फुडीझम’साठी हा माझा पहिला लेख.

दिवसा पायाला चटके बसावेत इतकी गरमी तर रात्री अंग गारठून जाईल इतकी थंडी. नजर जाईल तिथपर्यंत फक्त वाळूचा समुद्र... सर्वत्र रखरखाट आणि गरम उन्हाच्या वाफा....कुठे कुठे म्हणून हिरवळ नाही.... एकीकडे हे रखरखीत वाळवंट तर दुसरीकडे भडक लाल, गुलाबी, निळ्या, हिरव्या रंगांचे कपडे घातलेल्या राजस्थानी बायका आणि डोक्यावर मोठाले लाल पिवळे फेटे बांधलेले पुरुष. एव्हढेच नव्हे तर मस्त राजेशाही लयीत झुलणारे हत्ती, पिसारा फुलवून मनमोकळे नाचणारे मोर आणि शांतपणे झुलत निघालेल्या उंटांच्या सवाऱ्या डोळ्यासमोर येतात.

जणू निसर्गाच्या शुष्क कोरड्या रूपावर मात करण्यासाठीच राजस्थानी आपल्या पेहेरावात रंगांची मुक्त उधळण करतात. तर असं विपरीत हवामान असलेलं राजस्थान, म्हणजेच राजेशाही रजपुतांचे स्थान. आणि त्यांना शोभेसंच त्यांचं राजेशाही खाणंपिणं देखील.

खरंतर पराकोटीच्या विरुद्ध हवामानामुळे इथे भाजीपाला, फळफळावळ तशी कमीच पण तरीही राजस्थानची स्वतःची अशी खास खाद्यसंस्कृती आहे.

डाळी, कडधान्य आणि सुकवलेल्या भाज्या ह्यांचं त्यांच्या आहारात मुख्यत: प्राधान्य दिसून येतं. यातूनच दाल बाटी चुरमा, केर सिंगरी की सब्जी, गट्टे की सब्जी, घेवर अशा काही अफलातून पदार्थांचा जन्म भारताच्या या रंगारंग प्रदेशात झाला.

इथे राजस्थानात रात्री व हिवाळ्यात तापमान शून्य डिग्रीच्याही खाली जातं. अशा वेळी अंगात उष्णता निर्माण करण्यासाठी सुकामेवा आणि तुपातल्या पदार्थांवर भर दिला जातो.

आपल्याकडे सुद्धा सध्या गुलाबी थंडी सुरु झालीच आहे आणि म्हणूनच आज आपण पाहणार आहोत मुद्दामून हिवाळ्यात केला आणि खाल्ला जाणारा राजस्थानचा एक अत्यंत सोप्पा पदार्थ " बादाम का हलवा ".

रोज सकाळी हा हलवा एक - दोन चमचे खावा. याने उष्णता तर मिळतेच पण लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सुद्धा हा खूप पौष्टिक आणि शक्तिवर्धक असा अस्सल राजस्थानी आहे. हा हलवा जास्त प्रमाणात करून फ्रिज मध्ये ठेवला तर १५/२० दिवस आरामात रहातो आणि हवा तेव्हा काढून खाता येतो हे विशेष.

चला तर मग बघुया आता हा खास भारताने जगाला दिलेला एक अदभूत चवीचा पौष्टिकतम खजाना

साहित्य : बदाम : १ कप ( रात्रभर पाण्यात भिजत ठेवावेत, साधे आणि मामडा असे दोन प्रकार असतात बदामात, मामडा बदाम महाग असतात पण नक्कीच जास्त पौष्टिक असतात, हे बदाम घेतलेत तर चव अप्रतिम येतेच पण हलवा दिसताना रसरशीत दिसतो मस्त ) गाईचे तूप : १० टेबल स्पून ( घरी केलेले असेल तर उत्तम ) साखर : ८ टेबल स्पून, वेलची पावडर : १ टीस्पून, इन्स्टंट मिल्क पावडर : ८ टेबल स्पून, गरम पाणी : १ कप

कृती : बदाम पाणी न घालता फक्त निथळून सालीसकट मिक्सर मधून ग्राइंड करून घेऊया.

आता एका नॉन स्टिक कढईत तूप घालून मंद अग्नीवर तूप जरासं सैलसर पातळ झालं की मिक्सर मधून फिरवलेली बदाम पेस्ट सोनेरी रंग येईपर्यंत खमंग परतून घेऊया.

मग त्यात अलगद गरम पाणी आणि साखर घालूया आणि व्यवस्थित मिक्स होईपर्यंत नीट ढवळून घेऊया. यानंतर वरून झाकण ठेवून हे सगळ मिश्रण जाडसर होईपर्यंत शिजवायचं.

आता त्यात मिल्क पावडर आणि वेलची पावडर घालूया आणि छान मंद अग्नीवर तूप सुटेपर्यंत हे सर्वच मिश्रण शिजवायचं.

आता घरभर साजूक तुपाचा आणि जातिवंत बदामाचा दरवळ पसरवत हळूहळू तयार होते आहे आपली ही खास जगप्रसिद्ध भारतीय डिश. हा हलवा गरम किंवा गार कसाही छान लागतो.

टीप - मिल्क पावडरच्या ऐवजी १ कप सायीसकट दूध घालूनही हा हलवा करता येईल पण मग तो २/३ दिवसात संपवावा लागेल.

या थंडीत हा हलवा लगेच करून घ्या आणि बदाम आणि साजूक तुपासकट आपल्या घरादाराची शक्ती वाढवा.

चला, तर मग! आता पॉझिटिव्हिटी वाढवण्याची सुरुवात करूया आपल्या पासून आणि आपल्या पोटापासून...भारतीयन्स'च्या फुडीझम' मध्ये आज आपण पाहिलेल्या या भन्नाट डिश पासून ...

कारण, मित्र आणि मैत्रिणींनो, पोट पॉझिटिव्ह तर शरीर पॉझिटिव्ह, शरीर पॉझिटिव्ह तर घर पॉझिटिव्ह आणि घर पॉझिटिव्ह तर देश पॉझिटिव्ह !

धन्यवाद !

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

नयना पिकळे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य