Bhartiyans

Menu

‘एक कटिंग चाय आणि वाय-फाय’

Date : 02 Dec 2016

Total View : 532

एक कटिंग चाय बिस्कुट के साथ, हम दोनो और कटिंग.. हे ऐकलं आहे. पण चाय और वाय-फाय? हो! हा प्रयोग केला बंगळूरच्या सय्यद बाशा या २३ वर्षीय युवकाने !


सारांश

तुम्हाला अगदी १० मिनिटांसाठी अर्जंट नेटचे काम असेल , तर तेवढ्यासाठी नेट कॅफे शोधण आणि १० मिनटांसाठी २० रुपये देणं नको वाटतं. पण ३० मिनिटांसाठी तुम्हाला वाय-फाय आणि एक कप चहा मिळाला तर....! सय्यद खदर बाशा या छोट्या चहावाल्याने हीच कल्पना त्याचा बिजनेस वाढवण्यासाठी वापरली. त्याचा फंडा इतका लोकप्रियसविस्तर बातमी

‘एक कटिंग चाय आणि वाय-फाय’

ही काय भानगड बुवा?

"एक कटिंग चाय बिस्कुट के साथ"..... "हम दोनो और कटिंग चाय".... "चाय के साथ....चाय पे चर्चा".... हे सगळं ऐकलं आहे.

पण चाय और वाय-फाय हे कॉम्बिनेशन म्हणे?

हो, हा सुपर डुपर सफल प्रयोग केला बंगळूरच्या बेल्लारी गावातील सय्यद खदर बाशा या २३ वर्षीय युवकाने..!

तुम्हाला एखादा अर्जंट मेल करायचा आहे, व्हॉट्सअप वर मेसेज पाठवायचा आहे, मित्र-मैत्रिणीशी १० मिनिट गप्पा मारायच्या आहेत किंवा प्रोजेक्टचं अगदी थोड काम करायचं आहे तर तेवढ्यासाठी नेट-कॅफे शोधण आणि त्याला १० मिनटांसाठी २० रुपये देणं नको वाटतं नेहेमीच.

पण ३० मिनिटांसाठी तुम्हाला वाय-फाय आणि एक कप चहा मिळाला तर.... 
हीच कल्पना सय्यद खदर बाशाने वापरली.

या छोट्या चहावाल्याने ही आयडिया त्याचा बिजनेस वाढवण्यासाठी वापरली आणि तो त्यामध्ये जबरदस्त यशस्वी झाला.

बाशा तुम्हाला ५ रू. च्या चहा बरोबर ३० मिनिटे वाय-फाय वापरायला देतो.

त्याचा हा फंडा इतका लोकप्रिय झाला, की त्याचा व्यवसाय एकदम ४ पटीने वाढला. 
सप्टेंबरमध्ये त्याने ही सुरुवात केली.

सीरगप्पा. बेल्लारी जिल्यातील एक छोटसं गाव आणि तिथे राहणारा हा तरुण सय्यद खदर बाशा. 
त्याने ३००० रुपयांचा एक राउटर विकत घेतला आणि त्या बरोबर १७०० रुपये दर महिना असा अनलिमिटेड डेटाप्लॅन एका लोकल व्हेंडरकडून घेतला.

एक कप चहासोबत तो वाय-फायचा पासवर्ड देतो. 
तुम्ही एका चहासोबत ही सेवा फक्त ३० मिनिटांसाठी वापरू शकता त्यानंतर नाही. 
तशी सुविधाच त्याने केली आहे. 
या शिवाय एका ग्राहकाला एका दिवसात केवळ एकदाच पासवर्ड शेअर करता येतो.

या कल्पनेमुळे बाशाच्या धंद्यात चौपट वाढ झाली. आधी १०० कप चहा रोज विकणारा बाशा आता दिवसाला ४०० कप विकतो.

बंगळूरसारख्या ठिकाणी फ्री इंटरनेट सेवा ती सुद्धा केवळ ३० मिनिटे आणि ते ही निव्वळ एका चहा सोबत . 
ही कल्पना खरंच अगदी वेड्यासारखी वाटू शकते. 
कारण भारतातील सगळ्यात मोठी IT इंडस्ट्री बेंगलोरला आहे. पण छोट्या गावात हे सहज शक्य होत नाही त्यामुळे बाशा खरतरं तेजीत आहे.

त्याचाशी बोलताना एक गोष्ट जाणवते की, तो स्वतः अतिशय कमी शिकलेला असूनही, इतर मुलांनी शिकावे यासाठी त्याची तळमळ आहे. 
त्याचे नेहमीचे ग्राहक हे बहुतेक सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत आणि म्हणूनच त्याने ही शक्काळ लढवली ज्यात त्याचा चहा तर खपतोच पण विद्यार्थ्यांना मोफत काम करायला वाय-फाय सुद्धा मिळतं.

ज्यांना रु.१०० एवढा पॉकेट मनी मिळतो. ते देखील बाशामुळे इंटरनेटचा आनंद घेत आहेत. त्याच्या इंटरनेटचा स्पीड सध्या १ ते २ मेगाबाईट्स पर सेकंद असा आहे. तो एका वेळेस १०-१२ ग्राहकांना सेवा देऊ शकतो.

शेवटी, कल्पनेला तोटा नाही आणि करणाऱ्याला मरण नाही, म्हणतात ना तेच खरं...!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

अनिता घटणेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

India Times