Bhartiyans

Menu

नोटाबंदी : लाख दुखोकी एक दवा..!

Date : 03 Dec 2016

Total View : 445

पंतप्रधान मोदी यांनी ५००-१००० च्या नोटा बंद करून म्हणजे ‘डिमॉनेटायझेशन’ अर्थात ‘निश्चलनीकरण’ करण्याचा निर्णय घेऊन सगळ्यांची झोप उडवली. यामुळे गैरसोय होत असली तरी याचे दूरगामी फायदे कोणते, ते पाहूया!


सारांश

पंतप्रधान मोदी यांनी ५००-१००० च्या नोटा बंद म्हणजे ‘डिमॉनेटायझेशन’ अर्थात ‘निश्चलनीकरण’ करण्याचा निर्णय घेऊन सगळ्यांची झोप उडवली. यामुळे गैरसोय होत असली तरी दूरगामी फायदे निश्चित आहेत. वापरात असलेले ८६% चलन आता बेकायदेशीर ठरल्याने त्याचा उपयोग करणारे दहशतवादी आणि अवैध धंद्यांचे माफिया यांना जोरदार फसविस्तर बातमी

पंतप्रधान मोदी यांनी ५००-१००० च्या नोटा बंद करून म्हणजे ‘डिमॉनेटायझेशन’ अर्थात ‘निश्चलनीकरण’ करण्याचा निर्णय घेऊन सगळ्यांची झोप उडवली. यामुळे गैरसोय होत असली तरी याचे दूरगामी फायदे कोणते, ते पाहूया!

सरकारने उचललेले ‘निश्चलनीकरणा’चे पाऊल हे देशात आर्थिक अनागोंदी माजवण्याचे कारण ठरते आहे, असा सूर काही लोक लावत आहेत. तज्ज्ञ अद्याप अर्थव्यवस्थेवर याचा काय परिणाम झाला हा लेखाजोखा मांडत आहेत.

सध्या वापरात असलेले ८६% चलन आता बेकायदेशीर ठरले आहे. त्यामुळे दहशतवाद्यांसह अवैध, बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांनाही जोरदार फटका बसला आहे!

याचा परिणाम म्हणजे श्रीनगरमध्ये लष्करावर होणारी दगडफेक बंद झाली. दहशतवादाशी दोन हात करण्यासाठी ‘डिमॉनेटायझेशन’चा अत्यंत प्रभावी साधन म्हणून सरकार उपयोग करत आहे.

यामागे विचार असा आहे, की पाकिस्तानातून पुरावठा होणाऱ्या खोट्या नोटांमध्ये ५००-१००० च्या नोटाच आधिक होत्या. त्या नोटा बंद केल्याने, आतंकवादाची रसदच बंद पडली.

चीनी वस्तूंच्या भारतातील बाजारपेठेला या निर्णयाचा फटका बसला. भारतात येणाऱ्या वस्तूंच्या किमती यामुळे अचानक वाढल्याने चीनी मालाच्या विक्रीत तब्बल ३०% घट झाली.

नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी देखील या निर्णयाला समर्थन दिले. त्यांच म्हणण आहे, की यामुळे देशातील मानवी तस्करी आणि बालकामगारांची गुलामगिरीला आळा बसेल. कित्येक स्त्रिया आणि लहान मुले या तस्करीला बळी पडलेली आहेत.

रोख पैशावर चालणारा अजून एक मोठा व्यवसाय म्हणजे वेश्याव्यवसाय आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ५००-१००० च्या नोटा बंद झाल्याचा परिणाम म्हणजे, वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया देखील डिजीटल माध्यमातून पैसे मागत आहेत, अन्यथा नकार देत आहेत.

या काळात झालेल्या लग्नांना मात्र झळ पोहोचली. लग्नाच्या नियोजनात तडजोड करावी लागली असली तरी हुंडा पद्धतीला आळा बसल्याने सामाजिक कार्यकर्ते आनंदात आहेत. काही जणांनी यामुळे हुंडा घेतला नाही किंवा मागणी कमी केली. विवाह समारंभांमधील अति झगमगाटसुद्धा कमी झाला.

अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी प्रसिद्ध असलेल्या प.बंगाल मधील मालदा येथील व्यवहारांना यामुळे आळा बसला आहे. अफू विकणाऱ्या शेतकऱ्याना द्यायला तस्कारांकडे आणि खरेदीदारांकडेही रोख पैसे नाहीत. आता काळच ठरवेल की ह्या माफियांना बसलेला हा भीषण फटका तात्पुरता आहे की कायमचा आहे ते.

शहरी स्थानिक संस्थांनी गोळा केलेल्या करामध्येदेखील प्रचंड वाढ झाली. नगरविकास मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ४७ संस्थांनी गोळा केलेल्या करामधे २६८% एवढी वाढ मागील वर्षाच्या तुलनेत या नोव्हेंबर २०१६ मधे दिसते आहे.

“निश्चलनीकरणाचा हा सकारात्मक परिणाम आहे. लोक त्यांच्याकडील जुन्या ५००- १००० च्या नोटा वापरून थकबाकी भरून टाकत आहेत. यामुळे कर संकलानात खूपच वाढ झाली आहे.

मुंबईतील दलाल एड्लवेस सिक्युरिटीज लिमिटेड यांनी असा अंदाज वर्तवला आहे, की सरकारने उचललेल्या या पावलामुळे अंदाजे ३ लाख कोटी रुपये एवढा काळा पैसा बाहेर येईल. काहींच्या अंदाजानुसार कदाचित हा आकडा ४,६०,००० कोटी इतका असेल.

‘हे पैसे आता विविध आर्थिक सुधारणांसाठी निधी म्हणून वापरले जाऊ शकतात.’ असे एड्लवेस विश्लेषक मनोज बाहेती यांनी सांगितले. 
भारताच्या अर्थसंकल्पामधील तुट भरून निघाण्यासाठी या पैशाचा उपयोग होऊ शकतो. हे पैसे संरक्षण आणि ऊर्जा यांच्या सक्षमीकरणासाठी खर्च करता येतील अथवा शिक्षण, आरोग्य आणि गृहनिर्माण अशा सामाजिक सेवांवर तिप्पट खर्च करण्याचीही संधी आहे. काही अर्थतज्ञांच्या मते सरकार या पैशाचा वापर अशाच काही गोष्टींसाठी करेल.

‘डिमॉनेटायझेशन’च्या असंख्य फायद्यांमुळे सर्वसामान्य लोकांनी होणारा क्षणिक त्रास दूरवरच्या फायद्यांसाठी सहन करण्याची तयारी दाखवली.

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

मृणाल क्षीरसागर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

बेटर इंडिया