Bhartiyans

Menu

पुढल्या वर्षाच्या सुरुवातीला इस्रो ६८ परदेशी उपग्रह अवकाशात धाडणार आहे.

Date : 04 Dec 2016

Total View : 332

इस्रो घेणार अजून एक रेकॉर्ड भरारी,एकाच मोहिमेत अवकाशात धाडणार ६८ परदेशी उपग्रह.


सारांश

पुढील वर्षाच्या सुरवातीला इस्रो अजून एक रेकॉर्ड भरारी घेणार आहे.एकाच मोहिमेत अवकाशात ६८ परदेशी उपग्रह धाडणार आहे.यामुळे अन्य देशांमध्ये भारताची प्रतिमा उंचावणार आहे.सविस्तर बातमी

पुढल्या वर्षाच्या सुरुवातीला इस्रो, जागतीक महत्व प्राप्त झालेल्या, उपग्रह अवकाशात सोडण्याच्या बाजारपेठेत अजून एक उंच व्यावसायीक भरारी घेणार आहे.
या एकाच मोहिमेत, इस्रो ६८ परदेशी उपग्रह अवकाशात धाडणार आहे.

हे सर्व उपग्रह परदेशातले असणार असून छोट्या स्वरूपाचे असणार आहेत.

या वर्षी जून महिन्यात इस्रोने एकाच मोहिमेत एकंदर २० उपग्रह आकाशात सोडून रेकॉर्ड केला होता आता त्याहूनही अधिक उपग्रह Antrix मार्फत सोडले जाणार आहेत.

Antrix ही इस्रो’ची व्यावसायिक सहकारी कंपनी आहे.

अवकाशात उपग्रह सोडण्याच्या बाजारपेठेमध्ये छोट्या देशांचे लहान उपग्रह अवकाशात स्थिर करणे या गोष्टीला अनन्यसाधारण महत्व आहे.

हेच लक्षात घेऊन खूप कमी किमतीत हे NANO उपग्रह इस्रो मार्फत अवकाशात स्थिर केले जाणार आहेत. या संदर्भातली जुळवाजुळव इस्रो’ने अखेरच्या टप्प्यात आणली आहे.

छोट्या देशांचा भारतीय इस्रो’वरचा विश्वास , यामुळे भारताला मिळणारे अत्यावश्यक परकीय चलन आणि जगातल्या अन्य देशांमध्ये भारताची उजळ होणारी प्रतिमा असा तिहेरी लाभ या सर्वांतून इस्रो भारतासाठी कमावणार आहे.


**टीम भारतीयन्स** 

 

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .