Bhartiyans

Menu

अंधांना ‘दृष्टी’ आणि मुक्यांना ‘वाचा’ देणा-या भारतातील तीन शिक्षण संस्था.

Date : 10 Dec 2016

Total View : 370

भारतातील शिक्षणसंस्थांवर नेहमी टीका होते. विनोद केले जातात. पण तीन भारतीय संस्थांनी मिळून विकसित केलेल्या प्रणालीमुळे अंध वाचण्याचा आणि मुके बोलण्याचा आनंद तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घेऊ शकणार आहेत.


सारांश

भारतातल्या आयआयटी खरकपूर, जडावपूर विद्यापीठ आणि इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट या शिक्षण संस्थांनी एकत्रं येऊन Society for Natural Language Technology and Research (SNLTR) ही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या मार्फत बंगाली साहित्याचं ब्रेललिपीत भाषांतर केलं जाणार आहे. ६५% पर्यंत वाचादोष असलेल्या रसविस्तर बातमी

भारतीय शिक्षणव्यवस्था आणि भारतातील शिक्षणसंस्था यांच्यावर नेहमी टीका होते, त्यांच्यावर विनोद केले जातात.

पण तीन भारतीय संस्थांनी मिळून विकसित केलेल्या प्रणालीमुळे “अंध वाचण्याचा आणि मुके बोलण्याचा” आनंद तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घेऊ शकणार आहेत.

बघूया आज या तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती.

भारतातल्या आयआयटी खरगपूर, जडावपूर विद्यापीठ आणि इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट या उच्च शिक्षण देणा-या तीन सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्थांनी एकत्रं येऊन एक विशेष तंत्र विकसित केलं आहे.

आयआयटी खरगपूरच्या संगणक शास्राच्या विभागाने असं एक सॉफ्टवेअर तयार केलं ज्यामुळे बंगाली साहित्य ब्रेललिपीत उपलब्ध होणार आहे.

भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारचं तंत्र वापरलं जात आहे. बंगाली ही पहिली भारतीय भाषा आहे की, जिच्यात निर्माण झालेलं साहित्य ब्रेल लिपीत भाषांतरित होत आहे.

या तीन शिक्षण संस्थांनी एकत्र येऊन Society for Natural Language Technology and Research (SNLTR) ही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या मार्फतच बंगाली साहित्याचं ब्रेललिपीत भाषांतर केलं जाणार आहे.

ही संस्था वेगवेगळ्या प्रकारचं अपंगत्व असलेल्या लोकांना भाषांविषयी मदत करण्याचं कार्य करणार आहे. सध्या अंध आणि सेरिब्रल पाल्सीच्या रुग्णांच्या मदतीसाठी काम सुरू आहे. डीस्लेक्सियाच्या रूग्णांपर्यंत हे कार्य नेणं ही पुढची पायरी असणार आहे.

आयआयटी खरकपूरने तयार केलेलं हे तंत्र विकसित करण्यासाठी SNLTR कडे सोपवण्यात आलं. या तंत्राच्या माध्यमातून SNLTR ने बंगाली भाषेतील 'टुंटुनीर बोई', 'ठकुमार झुली' यांसारखं साहित्य, याशिवाय रवीन्द्रनाथ टागोर यांचा 'गल्पागुच्चा', विभुतीभूषण बंडोपाध्याय यांचे 'अर्णायक' आणि 'चंदेर पहार' हे लघुकथासंग्रह ब्रेललिपीमधे आणले.

आता बंगाल राज्य शासनाने ब्रेललिपीतून पाठ्यपुस्तकं तयार करण्याची जबाबदारीही SNLTR वर सोपवली आहे.

SNLTRचे अध्यक्ष आणि आयआयटी खरकपूरचे ज्येष्ठ प्राध्यापक अनुपम बासू यांनी अशी माहिती दिली आहे की, भूगोल, इतिहास आणि गणित या विषयांच्या ब्रेल लिपीतील पुस्तकांचे काम झाले असून बाकी विषयांवर काम सुरू आहे.

भूमितीच्या आकृत्या ब्रेल लिपीत आणण्यासाठी आयआ टी दिल्लीने तयार केलेले विशेष तंत्र वापरले जात आहे.

तसंच, ६५% पर्यंत वाचादोष असलेल्या रूग्णांसाठी 'संजोग' नावाचं एक ॲप्लिकेशन तयार केलं गेलं आहे. ज्यात शंभराहून अधिक आयकोन्सच्या मदतीने त्यांना पत्र/अर्ज लिहणे, नोट्स काढणे, संदर्भ टिपणे शक्य होईल.

विशेष बाब म्हणजे, याच रूग्णांसाठी 'आकाशवाणी’ या ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे अशा रुग्णांना इतरांशी संवाद साधता येणार आहे.

हे ॲप् आता चाचणीसाठी Indian Institute of Cerebral Palsy ला पाठवले गेले आहे.

एकूणच, प्रत्येकात काही तरी गुण-दोष असतातच.

पण “स्वत:च्या गुणांचा उपयोग करून इतरांमधील दोष दूर करण्याचा प्रयत्न करणं” म्हणजेच नसानसात भिनलेलं ‘भारतीयत्व’ जपणंच आहे ना !

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

श्रुती आगाशे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

Times of India