Bhartiyans

Menu

या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या..!

Date : 10 Dec 2016

Total View : 491

बालपणाच्या गोष्टीतली चिऊताई आज चित्रातच दिसते. प्रत्यक्षात नाही. प्रदूषण, मोबाईलची रेंज अशा कारणांनी चिमण्या नामशेष झाल्या. दिल्लीच्या नोएडा सेक्टर ३१ मधील नागरिकांनी चिमण्या जपण्यासाठी काय केलं, तुम्


सारांश

‘चिऊताई’....गेल्या अनेक पिढ्यांपासून आजही जिच्याशिवाय बालपण पूर्ण होऊ शकत नाही....तूप-मीठ-भातातला एक घास जिच्या नावाने काढल्याशिवाय बाळाचं पोट भरत नाही..अशी चिऊताई..! पण बडबडगीतांमधली ही चिऊताई चित्रातच दिसते. प्रत्यक्षात नाही. दिल्लीच्या नोएडा सेक्टर ३१ मधील नागरिकांनी मात्र या चिमण्यांचा चिवचिवाटसविस्तर बातमी

‘चिऊताई’....

बडबडगीतांमधली चिऊताई हल्ली कधीच दार ऊघडून समोर येत नाही...ती चित्रातच असते..राहते...

दिल्लीच्या नोएडा सेक्टर ३१ मधील नागरिकांनी मात्र या चिमण्यांचा चिवचिवाट जपण्यासाठी काय केलं ? तुम्ही स्वत:च वाचा..!

गेल्या अनेक पिढ्यांपासून आजही जिच्याशिवाय बालपण पूर्ण होऊ शकत नाही,
तूप-मीठ-भातातला एक घास जिच्या नावाने काढल्याशिवाय बाळाचं पोट भरत नाही,
एखाद्या वस्तूसाठी बाळ हट्ट करू लागलं की, ती वस्तू ‘घेऊन जा गं चिऊताई..’ असं म्हटलं की नेणारी चिऊताई...! 
अशी चिऊताई प्रत्येकाला आठवतेच....!

पण गोष्टीतली-बडबडगीतांमधली ही चिऊताई हल्ली कधीच दार ऊघडून समोर येत नाही...ती चित्रातच असते... प्रदूषण, मोबाईलची रेंज अशा असंख्य कारणांनी चिमण्या नामशेष होताहेत.

दिल्लीच्या नोएडा सेक्टर ३१ मधील नागरिकांनी मात्र या चिमण्यांचा चिवचिवाट जपण्यासाठी काय केलं.. तुम्ही स्वत:च वाचा..!

आंतरराष्ट्रीय चिमणी दिनाच्यानिमित्ताने सेक्टर ३१ मधील नागरिकांनी शपथ घेतली, की आपल्या शहरात चिमण्यांसाठी अनुकूल वातावरण तयार करायचे. झालं, कल्पना सुचली आणि काम सुरू झालं..! चिमण्यांसाठी अनुकूल वातावरण तयार करायचे तर त्यासाठी घरटे आपण बांधायला हवे..!

‘इको-रूटस’ या प्राणी-पक्षी संवर्धनाचे काम करणाऱ्या संस्थेने सेक्टर ३१ मधील लहान मुलांना चिमणीचे घरटे बांधण्याचं प्रशिक्षण दिलं. या संस्थेला त्यांच्या कार्यासाठी लंडनच्या ‘हाउस ऑफ कॉमर्स’ने गौरवले आहे.

नारळाच्या शेंड्या, ज्यूटचे दोरे, काथ्या, काड्या यांच्या साहाय्याने चिमण्यांना अगदी नैसर्गिक वाटतील अशी घरटी बांधण्याचे प्रशिक्षण इको-रूटसच्या सहकाऱ्यांनी दिलं.

इको-रूटसचे संस्थापक राकेश खत्री म्हणतात, की लहान मुलांना आम्ही हे शिकवतो. मुलं लहान वयात निसर्गाविषयी जागरूक झाल्याने ते पर्यावरणप्रेमी होतात आणि पक्षांना त्यांचा निवारा मिळतो.

सेक्टर ३१ च्या अध्यक्षा पुरन सरीन म्हणाल्या, की मुलांमध्ये निसर्गप्रेमाची जाणीव निर्माण व्हावी यासाठी आम्ही एक योजना केली. जो अशा प्रकारचे घरटे बांधण्यास पुढे येईल, त्याला १०० रुपये बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा केली.

इतर सेक्टर मधील मुलांनी देखील या उपक्रमात सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे. वाढत्या शहरीकरणामुळे कमी होणाऱ्या चिमण्या वाचवणे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

पुढील ३ महिने आर.डब्लू.ए मधील मुलांना एकत्र करून घरटे बांधणी शिकवण्याचा खत्री यांचा मानस आहे. विविध वयोगटातील मुलांपर्यंत पोहोचण्याची त्यांची इच्छा आहे.

‘मार्च ते सप्टेबर’ हा पक्षांचा विणीचा हंगाम असतो. त्यामुळे या कालावधीत अधिकाधिक मुलांपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त घरटी तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

या प्रकल्पाचे वरिष्ठ समन्वयक केईथ एग्बर्त यांचे एक वाक्य विचार करायला भाग पाडते. ते म्हणतात, वाढत्या शहरीकरणात गरजांसाठी जंगल तोडून मोठी, अलिशान घरे बांधली जात आहेत पण या मोठ्ठ्या घरांमध्ये लहानग्या चिमण्यांना मात्र जागा नाही....!

दुर्दैवाने, ही सत्य परिस्थिती आहे. ती बदलणे आपल्या हातात आहे.

तेव्हा मित्रांनो असेच कार्य करूया की, ज्यातून आपण म्हणू शकू... 
“या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या...!”

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

अनिता घटणेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

India Times