Bhartiyans

Menu

कंपोस्टच्या साहाय्याने ‘शून्य कचरा’ व्यवस्थापन करणारे पाचर कुटुंब

Date : 10 Dec 2016

Total View : 761

मोठ्या शहरांत कचऱ्याच्या ढिगांचे डोंगर दिवसेंदिवस वाढतच आहेत. कचरा व्यवस्थापनाची समस्या खूप मोठी आहे. गुडगावमधील ‘पाचर’ कुटुंब मात्र ९०% कचऱ्याचा पुनर्वापर आणि कंपोस्टच्या साहाय्याने ‘शून्य कचरा’ व्यव


सारांश

भाज्यांची देठे, कागदाचे कपटे, वाळकी पाने-फुले, चहाचा गाळ, शिळे अन्न असा आपल्या घरात निर्माण होणारा कचरा ‘या’ घरात देखील निर्माण होतो. आपण तो कचराकुंडीत टाकून कचऱ्याचे ढिग वाढवतो; पण ‘हे’ काहीतरी वेगळ करतात..जमेल तुम्हाला असं करायला.. असेही देशकार्य करायला..? गुडगावमधील ‘पाचर’ कुटुंब ९०% कचऱ्याचा पुन



सविस्तर बातमी

भाज्यांची देठे, कागदाचे कपटे, वाळकी पाने-फुले, चहाचा गाळ, शिळे अन्न असा आपल्या घरात निर्माण होणारा कचरा ‘या’ घरात देखील निर्माण होतो.

आपल्या घरी आपण तो कचराकुंडीत टाकून कचऱ्याचे ढिग वाढवतो; 
पण ‘हे कुटुंब’ काहीतरी वेगळ करतं आहे बघा..

जमेल तुम्हाला असं करायला.. असंही देशकार्य करायला..?

पाणी, वीज, निवारा याबरोबरच मोठ्या शहरांत ‘कचरा’ या समस्येने अक्राळ-विक्राळ रूप धारण केले आहे.

कचऱ्याच्या ढिगांचे डोंगर दिवसेंदिवस वाढतच आहेत. दिवसागणिक शहराची वाढणारी लोकसंख्या, स्थलांतरितांचे शहरावर आदळणारे लोंढे आणि ‘यूज अँड थ्रो’च्या वाढत्या वापराने कचरा नावाचा भस्मासुर उभा-आडवा पसरतो आहे.

कचऱ्याची निर्मिती याहीपेक्षा मोठी समस्या आहे ती, कचरा व्यवस्थापनाची..! 
गुडगावमधील ‘पाचर’ कुटुंबाने मात्र कचरा व्यवस्थापनाच्या समस्येवर तोडगा शोधून काढला. 
ते ९०% कचऱ्याचा पुनर्वापर करून ‘शून्य कचरा’ व्यवस्थापन करत आहेत. कंपोस्ट पद्धतीचा उपयोग करून त्यांनी ही किमया घडवून आणली आहे.

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे ४६ वर्षीय सुनिल पाचर गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्या गुडगाव येथील त्यांच्या घरी कंपोस्ट पद्धतीच्या साहाय्याने कचऱ्याचा पुनर्वापर आणि व्यवस्थापन करत आहेत. 
त्यासाठी त्यांनी बाजारातून कंपोस्ट कीट आणले. मुंबईचे सुक्ष्मजीवशास्त्रतज्ज्ञ जयंत जोशी यांनी पाचर यांना ही कल्पना सुचवली.

त्याविषयी पाचर सांगतात, “आम्ही ओला-सुका कचरा वेगळा करतो. त्यातून कंपोस्ट खताची निर्मिती करतो. सुरवातीला ज्या डब्यात आम्ही हे कंपोस्ट खत तयार करायचो त्यातून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येऊ लागली. आम्ही जरा अस्वस्थ झालो पण नंतर कळालं की, सुक्ष्मजीवांकडून खत निर्मिती होण्याची ही प्रक्रिया आहे.

हळुहळू प्रयत्नातून आमच्या चुका कमी होत गेल्या. त्रास, दुर्गंधी कमी झाली. महत्त्वाचे म्हणजे, आमचं कचरा करण्याचं आणि तो घराबाहेर टाकण्याचं प्रमाण कमी होत गेलं.’’

सध्या पाचर कुटुंब प्लास्टिक आणि विशिष्ट प्रकारचा कोरडा कचरा या व्यतिरिक्त सर्व कचऱ्याचा पुनर्वापर करतं.

सुनिल पाचर यांच्या पत्नी विनोद कुमारी या निसर्गोपचारतज्ज्ञ आहेत. त्या म्हणतात, की खरेदीसाठी कापडी पिशवीचा वापर आम्ही करतो. कपडेधुण्यासाठी रिठ्याचा साबण वापरतो. त्यामुळे कपडेधुलाईनंतरचे पाणी हे सेंद्रिय झाल्याने ते झाडांना देतो. जुन्या टायरचा उपयोग बैठकीसाठी करतो."

पाचर यांची ८ वर्षांची मुलगी देवांशी शाळेतुन पेन्सिलला टोक केल्यानंतरचा कचरा तिथेच न टाकता घरी येऊन कंपोस्ट बीन मध्ये टाकते.

तरी देखील प्लास्टिकचा पुनर्वापर हे आव्हान आहेच. त्यासाठी त्या सर्वांनी मिळून प्रयत्न सुरू केले.

पाचर कुटुंबीय एलईडी दिवे वापरतात. त्यांनी घरातील सीएफल दिव्यांचा पुनर्वापर मेन्सरमधील इ-कचऱ्याचे व्यवस्थापन करणारी कंपनी ‘अर्थ सेन्स’ कडून करून घेतला आहे. या कंपनीच्या साहाय्याने त्यांच्या भागात इ-कचरा संग्रह केंद्र सुरू करण्याची त्यांची योजना आहे.

मृत बंधवारी उपचार प्रकल्पाकडून प्रेरणा घेतलेले पाचर म्हणतात, प्रत्येकाने स्वत:च्या पातळीवर कचऱ्याचा पुनर्वापर आणि व्यवस्थापन करायला सुरुवात केली, तरी कचऱ्याच्या ढिगांची उंची कमी होण्यास मदत होईल.

आपल्यापैकी प्रत्येकाने एवढे केले तरी नक्कीच आपण कचरा आणि त्यातून वाढणारी रोगराई आटोक्यात आणू शकतो.

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

टीम भारतीयन्स

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

India times