Bhartiyans

Menu

स्वत: आयएएस न झालेले, पण हजारो विद्यार्थ्यांना आयएएस होण्यासाठी मदत करणारे पटेल..!

Date : 16 Dec 2016

Total View : 182

‘गरीब परिस्थितीतील, उच्चशिक्षित नोकरदार अशा गुजराती माणसाचे पुस्तकप्रेम’.. हे वाचताना परस्परविरोधी आठ शब्द एकत्र आले आहेत असं वाटलं ना? आज जाणून घेऊया ‘श्रीमंती’ शब्दशः 'वाटणाऱ्या' व्रजलाल पटेल यांच्याबद्दल..!


सारांश

‘गरीब परिस्थितीतील, उच्चशिक्षित नोकरदार अशा गुजराती माणसाचे पुस्तकप्रेम’.. हे वाचताना परस्परविरोधी आठ शब्द एकत्र आले आहेत असं वाटलं ना? आज जाणून घेऊया ‘श्रीमंती’ शब्दशः 'वाटणाऱ्या' व्रजलाल पटेल यांच्याबद्दल..! जुनागढ जवळच्या खेड्यातील अतिसामान्य कुटुंबातील व्रजलाल यांना आयएएस होण्याची इच्छा होती. पण, त्यात यश आले नाही. तेव्हा त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना आयएएस होण्यासाठी मदत करायचे ठरवेल... त्यासाठी त्यांनी काय केले? तुम्हीच वाचा.!सविस्तर बातमी

‘गरीब परिस्थितीतील, उच्चशिक्षित नोकरदार,  गुजराती माणसाचे पुस्तकंप्रेम
परस्परविरोधी असंबद्ध आठ शब्द एकत्र आले आहेत असं वाटलं ना?
आज जाणून घेऊया "श्रीमंती" शब्दशः 'वाटणाऱ्या' व्रजलाल पटेल यांच्याबद्दल,
#Bharatiyans

आपल्या माहितीतील बहुतांश गुजराती लोक उद्योगाच्या शोधात मुंबई गाठतात.
शे-पन्नास माणसे हाताखाली घेऊन व्यवसाय करतात.

सोईनुसार आणि आवडीनुसार आधी प्रपंच आणि मग परमार्थ करतात.
खणखणीत प्रॉपर्टी वारसदारांना ठेवून जगाचा निरोप घेतात.

पण व्रज पटेल यांचे वेगळेच आहे हे मात्र नक्की.

जुनागढ जवळच्या खेड्यातील अतिसामान्य कुटुंबातील व्रजलाल खूप शिकून मोठे होण्याची स्वप्न घेऊन मंबईत आले.

उरुसात भेटलेल्या एका मुस्लिम माणसाने व्रजालाल यांना मायेचा आधार दिला.

या नंतर व्रज पटेल यांनी विल्सन कॉलेज मधून विज्ञान शाखेची पदवी घेतली. UPSC करून IAS होण्याचा प्रयत्न केला पण यात त्यांना यश आले नाही.

आता पैशासाठी नोकरी करणे क्रमप्राप्त आहे हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी आता सेंट्रल एक्साइज ची परीक्षा देऊन राज्य शासनाच्या विक्रीकर विभागात नोकरी मिळवली .

स्थिरस्थावर झाल्यानंतर आता मात्र "आवश्यक त्या सुविधा आणि वेळोवेळी हवे असणारे आर्थिक पाठबळ नसल्याने IAS होऊ शकलो नाही" हा विचार मात्र व्रज पटेलांचा मेंदू २४ तास पोखरत राहत होता .

आणि मग जे आपल्याला मिळाले नाही ते किमान आपल्यासारख्याच इतर गरीब ओं गरजू मुलांना तरी मिळावे असे स्वप्न व्रजलाल यांनी अशाच सर्व वंचित मुलांसाठी "दिवसा उघड्या डोळ्यांनी” पाहिले.

काही परिचितांना सोबत घेऊन मग व्रजलाल पटेल यांनी महर्षी दयानंद फौंडेशन नावाची संस्था स्थापन केली .

सनदी परीक्षेस लागणारी पुस्तके प्रचंड महाग असतात आणि ती लागतात सुद्धा खूप मोठ्या संख्येत. आणि म्हणूनच जास्तीत जास्त पुस्तके एकत्र करणे हा व्रज पटेल यांच्या कामाचा पहिला टप्पा होता.

हुतात्मा चौकात , CTO च्या फुटपाथवर अशी पुस्तके व्रजलाल वजनाच्या भावात घेऊ लागले.

कोणत्याही संदर्भपुस्तकासाठी परीक्षार्थी उमेदवारास अन्यत्र कुठेही वणवण करत जावे लागू नये या विचाराने झपाटलेले व्रजलाल ही पुस्तके मिळतील त्या ठिकाणाहून गोळा करण्यास पायाला भिंगरी लागल्यागत झपाटल्यागत फिरू लागले.

आता त्याचे अन्य संबंधित संस्थांशी संधान बांधणे सुरु झाले आणि आता व्रज पटेल यांच्या ध्येयातील संपूर्ण सेवाभावाची खात्री करून घेऊन त्यांना मोठ्या प्रमाणात पुस्तकरूपी देणगीदार सुद्धा मिळू लागले .

ब्रिटिश कौन्सिलच्या ग्रंथालयाने दिलेली २ ट्रक पुस्तके, भारतीय विद्या भवनने दिलेली ३ ट्रक पुस्तके, भारतीय नौदलाकडून मिळालेली हजारो पुस्तके...
बघता बघता अडीच लाखावर पुस्तके आता व्रज पटेल याच्याकडे सहजच जमा झाली.

आतापावेतो या सर्व पुस्तकांचे एकत्र वजन केले तर ते चाळीस टनावर जाईल.
एका छत्राखाली मिळणाऱ्या या अत्यावश्यक पुस्तकांमुळे UPSC करणाऱ्या मुलांचा लाखो रुपयांचा खर्च तर वाचलाच आणि त्यासोबत ही सगळीच महत्वाची पुस्तके एकाच छत्राखाली आता उपलब्ध होऊ लागल्याने ‘पैशांपेक्षाही महाग असलेला’ वेळ सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाचू लागला हे विशेष.

नाममात्र शुल्कात विद्यार्थ्यांनी पुस्तक न्यायचे, अभ्यास करून आणि नोट्स काढून पुस्तक परत आणून दिले की शुल्क परत घ्यायचे यामुळे मुलांना जणू ‘कुबेराचा खजिना’च मिळाला.

त्याबरोबरच व्रज पटेल यांनी या विद्यार्थ्यांसाठी शनिवार, रविवार प्रशिक्षण वर्ग आणि विनामूल्य अभ्यासिका देखील सुरु केल्या.

वसंत स्मृती या दादर च्या NGO ने त्यांना ४००० स्क्वेअरफुट जागा दिली आहे.
त्याबरोबरच जुनागढ मधील शिक्षसंस्थेने दिलेल्या जागेत तब्बल १,००,००० पुस्तके ठेवली आहेत.
कल्याण जवळ ३००० स्क्वेअरफुट जागा मिळाली आहे.

सर्वात मोठा ‘दुग्धशर्करा’ योग म्हणजे बाहेरगाववरुन येणाऱ्या मुलांसाठी व्रजलाल यांनी स्वतःच्या राहत्या घरात निवासी अभ्यासिका सुरु केली आहे .

अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’चा एक करोड रुपयांचे पहिले बक्षीस जिंकलेला हर्षवर्धन नवाथे व्रज्लाल पटेल यांच्या इथलाच.

स्वतःची परीस्थिती हलाखीची असल्याने तशीच परिस्थिती इतर गरजू पण हुशार विधार्थ्यांवर येऊ नये म्हणून जीवाचे पाणी करून त्यांच्यासाठी सर्व सोयी सुविधा उभारणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने ‘श्रीमंती’ वाटणाऱ्या या 'कुबेराला' त्याच्या कार्यासाठी लाख-लाख शुभेच्छा..!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

मधुरा दाते

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

google