Bhartiyans

Menu

गँगरेप, ऍसिड अटॅक, विषप्रयोग अशी १४ प्राणघातक संकटे येऊनही न खचलेली सुनिथा क्रिष्णन.

Date : 18 Dec 2016

Total View : 104

गँगरेप, प्राणघातक हल्ले, ऍसिड अटॅक, विषप्रयोग अशी १४ प्राणघातक संकटे येऊनही सुनिथा क्रिष्णन खचली नाही. तिने आपला लढा सुरूच ठेवला.


सारांश

आधी गँगरेप..मग घरच्यांचे नाकारणे...समाजाशी लढाई...प्राणघातक हल्ले...ऍसिड अटॅक...विषप्रयोग १४ प्राणघातक संकटे येऊनही न खचलेली सुनिथा क्रिष्णन हिने आपला लढा सुरूच ठेवला. तिने ‘प्रज्वला’ या संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून ४०० मुलींची सुटका सेक्स जाळ्यातून केली. आज २०० कर्मचारी यासाठी काम करत आहेत. २०१६ मध्ये भारत सरकारतर्फे तिला पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.सविस्तर बातमी

आधी गँगरेप....मग घरच्यांचे नाकारणे...समाजाशी लढाई...प्राणघातक हल्ले...ऍसिड अटॅक...विषप्रयोग...या सगळ्यातून ४००० मुलींसाठी देवत्व आणि अजूनही काम चालूच....
भारताची एक आधुनिक दुर्गा.....सुनिथा क्रिष्णन....

तुमचा देवाच्या क्षमतेवर विश्वास असेल तर तो तुमच्या समस्या सोडवतो आणि जर त्याने तुमच्या समस्या सोडवल्या नाहीत तर त्याचा तुमच्या क्षमतेवर विश्वास असतो. असाच गाढ विश्वास देवाने सुनिथावर दाखवला….
#Bharatiyans

सामान्य माणूस विचार करू शकणार नाही अशा समस्यांना ती सामोरे गेली.

आणि सामोरी गेली ती सुद्धा अशा प्रकारे की त्यातूनही तिच्यासारख्या भयभीत, लज्जित ४००० मुली "माणूस" म्हणून जगू शकल्या....

सुनिथा क्रिष्णन. बेंगलोर’स्थित मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी...

वडिलांच्या नोकरीनिमित्त देशभर फिरताना सामाजिक जाणीवा तिच्या अगदी लहानपणापासूनच प्रगल्भ होऊ लागल्या.

स्वतःच्या मनानेच तिने लहानपणीच कामाला सुरवात केली.

8 वर्षाची असताना मेंटली चॅलेंजड मुलांना ती नृत्याचे धडे देऊ लागली तर १२व्या वर्षीच झोपडपट्टीच्या मुलांना अभ्यास शिकवू लागली....

आणि समोर वाढून आलं एक भीषण दुर्दैव....

एका सामाजिक कामासाठी प्रवास करत असताना एका वासनांध व्यक्तींची शिकार झाली १५ वर्षाची सुनिथा....

गँगरेप....स्त्रीला जिवंतपणी नरकयातना देणारा अपघात सुनिथाच्या नशिबी आला.

आजपावेतो समाधानी असणारं सुनिथाचं आयुष्य आता ओझ झालं होते...
एका शहाण्या समजूतदार, सरळमार्गी मुलीच्या आयुष्याची अक्षरशः वाताहत झाली होती...

या सगळ्याहून सुद्धा दाहक अनुभव पुढे वाढून ठेवला होता, 
तिच्या आपल्याच माणसांनी तिला नाकारले....

इथे आयुष्याने एक वेगळेच वळण घेतलं....

P I N संस्थेत नोकरी करण्याचे कारण सांगून ती हैद्राबादला शिफ्ट झाली आणि धडाक्यात काम सुरु झालं....

१९९६ मध्ये बेंगलोरला आयोजित मिस वर्ल्ड स्पर्धेला विरोधात्मक कारवाई केल्याने तिला २ महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला.

मुसीनदी काठी आकारात येणाऱ्या प्रकल्पाच्या सुशोभीकरणासाठी स्थानिकांच्या घराला बुलडोझर लावला तेव्हा सुनिथा आडवी आली, जिवाच्या कराराने तिने ते काम थांबवले... "मेहेबूब कि मेहेंदी "..हैद्राबाद मधील रेड एरिया रिकामा केला जात होता....

या वेश्यागृहातील पुढच्या पिढीला या कामापासून वाचवण्यासाठी तिने "प्रज्वला" संस्थेची स्थापना केली...
याच संस्थेमार्फत तिने आजपर्यंत सुमारे ४००० मुलींना या सेक्स ट्रॅफिकिंग पासून वाचवले आहे....

आज ‘प्रज्वला’ प्रामुख्याने ५ आघाड्यांवर काम करते...

प्रिव्हेन्शन, रेस्क्यू ,रिहॅबिलिटेशन, रिइंटीग्रेशन, ऍडव्होकसी यासाठी काम चालू आहे...

तब्बल २०० कर्मचारी इथे काम करतात..

देशविदेशातील नामांकित कंपन्यांनी प्रज्वला’च्या कामावर विश्वास दाखवून आर्थिक पाठिंबा दिला आहे.

२००३ मध्ये तिने काही अभ्यासपूर्ण सूचना शासनाला केल्या. त्यानुसार आंध्र प्रदेश सरकारने सेक्स ट्रॅफिकिंग’ची शिकार झालेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी एक पॉलीसी तयार केली जी आता कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश या सर्व राज्यांनी संपूर्णपणे स्वीकारली आहे....

"रिअल मेन डोन्ट बाय सेक्स" हे तिने तयार केलेले कॅम्पेन जगभरात १.८ बिलियन लोकांनी वाखाणले आहे....

या सगळ्या कामामध्ये तिच्यावर १४ वेळा प्राणघातक हल्ले झाले, एकदा ऍसिड अटॅक आणि विषप्रयोग देखील झाला.

समाजातील कैक क्रूरकर्मीना ती नको होती पण साक्षात नियतीलाच तिच्या कामाची गरज होती.... 
प्रत्येक संकटातून ती सहीसलामत बचावली, आणि अजून धडाडीने काम करतेच आहे...

२०१६ मध्ये भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्काराने सुनिथाला गौरवण्यात आले आहे.

भारताच्या या आधुनिक दुर्गेला ‘टीम भारतीयन्स’चा प्रणाम......!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

मधुरा दाते

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

vikipidiya