Bhartiyans

Menu

मनाच्या श्रीमंतीचे औदार्य दाखवणारा रिक्षावाला..!

Date : 18 Dec 2016

Total View : 376

तुम्ही दानशूर असण्यासाठी तुम्ही श्रीमंत असण्याची गरज नसते. गरज असते ती तुमच्याकडे मनाच्या श्रीमंतीचे औदार्य असण्याची.


सारांश

To live as human being, adequate money is mandatory. But money is optional for Being Human . हे खरे आहे. तुम्ही दानशूर असण्यासाठी तुम्ही श्रीमंत असण्याची गरज नसते. गरज असते ती तुमच्याकडे मनाच्या श्रीमंतीचे औदार्य असण्याची. असंच औदार्य आणि माणूसकी मुंबईच्या एका रिक्षावाल्याने दाखवली आणि ती देखील त्याच्या अनोळखी प्रवाशासोबत..!सविस्तर बातमी

To live as human being, adequate money is mandatory .

But money is optional for Being Human . 
#Bharatiyans

जवळच्या अंतरावर जाण्याचे भाडे नाकारणारे, गरजू वृद्धांना सुट्या पैशासाठी अडवणारे काही रिक्षावाले आपल्याला भेटतात ही.
पण ‘उडदामाजी काळे गोरे’ हा नियम आहेच ना . 
तसाच हा एक.

चेन्नई मधे निसर्ग कोप झाला. जणू आभाळ फाटले. ४५० मृत आणि १०० च्या वर बेपत्ता हा शासकीय आकडा होता.

स्वतःचे सामानसुमान सुरक्षित ठेवून पाण्यात वाहत येणाऱ्या चीजवस्तू धुंडाळण्यात काही जण हिरीरीने सहभागी झाले होते.

अडचणीत सापडलेल्याला सोडवण्यासाठी अवाजवी किंमत लावली जात होती. संकटाची संधी साधून काही जण त्यातही स्वतःची चांदी करून घेत होते.

इकडे मायाबाजार असणाऱ्या मुंबईत शालिनी गिरीश रिक्षातून कामाच्या ठिकाणी चालली होती. तिचा काळवंडलेला चेहरा, सतत फोनकडे जाणारी नजर यामुळे ती कुठल्यातरी काळजीत असल्याची जाणीव होत होती.

तिचे कुटुंब चेन्नईत होते. पुराचा फटका त्यांनाही बसला होता. संवादातून हे त्या रिक्षावाल्याला समजले. "ताई ..तुमच्या घरचे सुरक्षित आहेत ना? काळजी करू नका. अल्ला उनकी रक्षा जरूर करेगा "

मग नंतरचा वेळ शालिनी त्याला चेन्नईमधल्या नागरिकांच्या हलाखीच्या अवस्थेबद्दल सांगत होती.

पुरामुळे सामान्यांचे झालेले नुकसान, शहराची दुर्दशा, पसरलेली रोगराई हे सगळे सगळे ती त्याच्याशी बोलत होती.

तिचे ऑफिस आल्यावर रिक्षा थांबली.

ती पैसे देऊ लागली त्यावर तिला थांबवत तो म्हणाला "नही चाहिये ये पैसे, लेकिन इन पेसोसे आप अपने चेन्नईवाले आपके लोगोंको कुछ मदद जरूर किजीये. 
मै गरीब हूं. बस इतना ही दे सकता हूं, 
खुदा करे ये किसीके काम आये.’’

इतके बोलून तो नाव गाव न सांगता निघून गेला

आता पाऊस कोसळत होता तो शालिनीच्या डोळ्यातून !!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

मधुरा दाते

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

india times