Bhartiyans

Menu

सांताना मुर्मू : स्वत:चा बालविवाह होऊनही त्याच प्रथेविरुद्ध आवाज उठवणारी ‘बाल’ पण ‘जाणती वधू’!

Date : 21 Dec 2016

Total View : 153

आजही आपल्या देशात बालविवाह होतात. पश्चिम बंगालमधील सांताना मुर्मू या मुलीचा देखील वयाच्या १४ व्या वर्षी विवाह झाला. पण ती बालिका वधू असताना देखील तिने या प्रथेविरुद्ध आवाज उठवला.


सारांश

बाल विवाह.! देशाच्या विकासाला गोचडीसारख्या चिकटून बसलेल्या बुरसट प्रथांपैकी एक..! यालाच बळी पडलेली पश्चिम बंगालमधील एका छोट्या खेड्यातली सांताना मुर्मू. वयाच्या १४ व्या वर्षी तिचं लग्न झालं. शिक्षिका होण्याचे स्वप्न बघणाऱ्या मुर्मूच्या पदरात २ मुली पडल्या. पण स्वत:चा बालविवाह होऊन देखील लोकांच्या विरोधाला न जुमानता तिने बालविवाहाविरूद्ध आवाज उठवला. तिचा आवाज केवळ भारतानेच नाही तर चक्क युएनने देखील ऐकला..!सविस्तर बातमी

१४ व्या वर्षीच, आठवीतचं घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे वडलांनी शाळेतून काढून हिचं लग्न लावून दिलं, 
शिक्षिका होण्याचं स्वप्न बघणाऱ्या मुर्मूच्या पदरात त्याच वयात २ मुली पडल्या,

….नंतर मात्र तिने आकाशात ‘झेप’ घ्यायची असं ठरवलं,

बिकट परिस्थितीतसुद्धा अपरिमित कष्टांची परिसीमा करून तिने अर्धवट राहिलेलं शिक्षण नवऱ्याच्या साथीने पुन्हा सुरु केलं,

प्रगतीचा ध्यास घेत यशाची शिखरं पादाक्रांत करत, स्वतःवर आलेली वेळ इतर कुणावरही येऊ नये म्हणून तिने कंबर कसली आणि अनेक बालविवाह स्वतःच्या हिंमतीवर थांबवले,

या भारतीय ‘दुर्गे’च्या कामाची युनायटेड नेशन्स’नेसुद्धा नोंद घेतली आणि तिचे विलक्षण अनुभव सगळ्या जगासमोर मांडायला तिला युनो’च्या जनरल असेम्ब्लीमध्ये बोलायचं आमंत्रण दिलं.

भेटूया आपल्या भारतातल्या या अजून एका स्त्री-शक्तीला.. सांताना मुर्मू’ला..!
#Bharatiyans

बाल विवाह..! देशाच्या विकासाला गोचडीसारख्या चिकटून बसलेल्या बुरसट प्रथांपैकी एक..! आजही आपल्या देशात काही ठिकाणी बालविवाह होतात. एखादी कळी तिचं फुलं होण्याआधीच खुडली जाते, हे आजही होतं. अशा गप्पा आपण मारतो. पण प्रत्यक्षात कार्य कोण करतं.

तरूणदांचा ‘बालिका वधू’ हा सिनेमा किंवा त्याच नावाची अलीकडची टी.व्ही.वरची मालिका. यातून या प्रश्नावर चर्चा होतात. पण, पश्चिम बंगालमधील सांताना मुर्मू या खेड्यातील मुलीने तिचा स्वत:चा बालविवाह होऊन देखील न घाबरता आणि लोकांच्या विरोधाला न जुमानता बालविवाह प्रथेविरुद्ध आवाज उठवला. 
तिचा आवाज केवळ भारतानेच नाही तर चक्क युएनने देखील ऐकला..!

याच प्रकाराला बळी पडलेली पश्चिम बंगालमधील एका छोट्या खेड्यातली मुलगी, सांताना मुर्मू. 
वयाच्या १४ व्या वर्षी, इयत्ता आठवीत असताना तिचं लग्न झालं. 
ती बालिका वधू झाली. घरची परिस्थिती बेताची. त्यामुळे वडिलांनी प्रथेप्रमाणे मुलाला शिकवलं. हिला मात्र शाळेतून काढून टाकलं आणि तिचं लग्न लावून दिलं. 
शिक्षिका होण्याचे स्वप्न बघणाऱ्या मुर्मूच्या पदरात २ मुली पडल्या.

पण तिच्या मनातली शिक्षणाची ठिणगी तिला स्वस्थ बसू देत नव्हती. यासाठी प्रथम तिने स्वत:च्या नवऱ्याला गोविंद हेमरामला विश्वासात घेतले.

त्यानेही तिला पाठिंबा दिला कारण त्याला देखील शिक्षण पाचवीतच सोडावे लागले होते. तो म्हणाला, "मला जाणीव आहे की लवकर लग्न झाल्यामुळे मुर्मुला तिचे शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले. त्यामुळे तिची स्वप्ने तशीच राहिली. शिक्षण आणि आरोग्य हे दोन्ही खूप महत्वाचे आहे हे मला पटलंय. म्हणून माझा तिला पूर्ण पाठिंबा आहे."

आज त्यांची मोठी मुलगी ३ वर्षांची आहे. ती अंगणवाडीत जाते. मुर्मूने स्वत:सारखी अवस्था इतरांची होऊ नये, म्हणून प्रयत्न सुरू केले आणि मोठ्या हिकमतीने तिने ३ मुलींचे बालविवाह थांबवले.

याच दरम्यान ती सीआयएनआय या संस्थेशी जोडली गेली आणि बालविवाहांना प्रतिबंध निर्माण करण्यासाठी कार्यकर्ता म्हणून काम करू लागली.

तिच्या या कामाची संयुक्त राष्ट्रसंघाने (यूएन) दखल घेतली गेली आणि त्यांनी तिला तिचे अनुभव कथन करण्यासाठी तेथील जनरल असेम्बलीमध्ये बोलवले.

बालविवाह आणि त्यामुळे खूप लवकर येणारे मातृत्व याचे दुष्परिणाम तिने सांगितले. बालविवाह थांबवले तरच हे दुष्टचक्र थांबेल, अशी भूमिका तिने मांडली.

याचवेळी तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा अजून एक क्षण आला. अमेरिकेन लोकांनी तिचे विचार ऐकले आणि तिचे शिक्षण किती झालंय? असा प्रश्न विचारला.

यावर “८ वी.” हे उत्तर देताना तिला खूप वाईट वाटलं. 
पण तिने त्याच वेळी त्या लोकांना आणि स्वत:ला देखील वचन दिलं, की मी पुन्हा शिकायला सुरुवात करणार आणि तिने खरच हे आव्हान पेललं...!

अर्थात गावी आल्यावर शिक्षण पुन्हा सुरू करायचं ठरवलं तरी ते वाटतं तेवढ सोप नव्हतं. शाळेने तिला प्रवेश नाकारला. पण बीडीओ यांनी जातीने लक्ष घातल्यावर तो प्रश्न सुटला. तिची शाळा सुरू झाली.

आता ती मुलांना घरी ठेवून रोज सकाळी ३ किमी अंतरावरील कुशमंडी या गावाला चालत जाते. तिथल्या मणीकोर विद्यालयात ती सध्या इयत्ता ९ वीत शिकते आहे. एकीकडे काम आणि दुसरीकडे शिक्षण असा तीचा दिनक्रम आहे.

शेवटी ती म्हणते की, "काही लोक मी या जुन्या प्रथेविरुद्ध आवाज उठवल्याने माझ्यावर नाराज आहेत पण आता मला कुणीच रोखू शकत नाही."

खरंच, मुर्मू तुझ्या जिद्दीला आणि ध्येयासक्तीला कोणीही रोखू नये, याच शुभेच्छा!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

सुप्रिया पोतनीस

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य