Bhartiyans

Menu

युवशाला : विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारी संघटना

Date : 21 Dec 2016

Total View : 340

आपली स्वप्नं प्रत्यक्षात कशी उतरवायची हे अनेकांना माहीत नसतं. अशा मुलांना ‘युवशाला’ मदत करते. विद्यार्थ्यांना उपलब्ध करिअरचे पर्याय आणि ते निवडण्यासाठी काय करायचं याचं मार्गदर्शन ‘युवशाला’तर्फे केलं जातं.


सारांश

क्षितिज मेहरा...एक युवा उद्योजक. भारतात विशेषतः ग्रामीण भागात मुलांना करिअरचे वेगवेगळे पर्याय माहीत नसतात. त्यांना ते माहीत करून देण्यासाठी आणि त्यासाठी काय करावं लागतं, कुठल्या परीक्षा द्याव्या लागतात याचं मार्गदर्शन देण्यासाठी, विद्यार्थी व पालकांचे समुपदेशन करण्यासाठी त्याने ‘युवशाला’ची स्थापना केली. चला, वाचूया पंजाब, हरियाणा, चंदीगढ आणि हिमाचल प्रदेश येथील ११ शाळांमध्ये कार्यरत असलेल्या युवशालाची ही प्रेरणादायी यशोगाथा...!सविस्तर बातमी

तुम्ही तरुण आहात पण आत्ता तुमच्या खिशात फक्त ५० रुपयेच आहेत....पोटात अन्नाचा कण नाही....घराचं भाडं दिलेलं नाही....बिल न भरल्यानं मोबाईल बंद आहे....

आणि त्याही अवस्थेत तुम्ही स्वप्न पाहाताय हजारों युवकांची करिअर सेट करायची? आहे शक्य हे ?

आहे...हे शक्य आहे....

क्षितिज मेहराने, एका भारतीय युवकाने हे अशक्य स्वप्न शक्य करून दाखवलं...
#Bharatiyans

लहानपणी सगळ्यांचीच स्वप्न खूप खूप मोठी असतात. आपण डॉक्टर, इंजिनिअर, पोलीस, वकील यांपासून ट्रेनचा गार्ड, बस कंडक्टर व्हावं असं सुध्दा वाटतं असतं.

वय वाढायला लागलं की, परिस्थितीची जाणीव, क्षमता यामुळे स्वप्न आता बदलू लागतातं. ही स्वप्नं प्रत्यक्षात कशी उतरवायची हे अनेकांना माहीत नसतं.

नेमक्या अशा मुलांना क्षितिज मेहराने धाडसी निर्णय घेऊन सुरु केलेली आणि आता नावारूपाला आणलेली ‘युवशाला’ मदत करते.

विद्यार्थ्यांना कुठले करिअर पर्याय उपलब्ध आहेत आणि ते निवडण्यासाठी काय करायचं याचं मार्गदर्शन ‘युवशाला’ करते.

त्याचबरोबर विद्यार्थ्यांची ‘सायको मेट्रिक’ चाचणी घेऊन त्याआधारे पालक आणि विद्यार्थ्यांचं समुपदेशन केलं जातं.

सध्या ‘युवशाला’ पंजाब, हरियाणा, चंदीगढ आणि हिमाचल प्रदेश येथील थोड्या-थोडक्या नव्हे तर ११ शाळांमध्ये कार्यरत आहे. लवकरच दिल्ली आणि मध्यप्रदेश येथेही शाखा सुरु करायचा त्यांचा विचार आहे.

शिक्षणाची आणि शिकवण्याची आत्यंतिक आवड असणारे ७ शिक्षक युवशालाचं काम करतात.

युवशालाचा संस्थापक क्षितिज मेहरा याची कहाणी खूपच प्रेरणादायी आहे. खिशात फक्त ५० रु असताना आणि पोटात अन्न नसताना त्यानं हे स्वप्नं पाहिलं. झिराकपूरच्या ज्या घराचं भाडं थकलं आहे अशा घरात बसून तो विचार करत होता.

भाड्याप्रमाणेच मोबाईल बिल थकल्याने outgoing calls बंद झाले होते. त्याच्या नातेवाईकांनी सुरुवातीला त्याला या सगळ्यांपासून परावृत्त करण्यासाठी समजवण्याचा प्रयत्न करून नंतर त्याला ते मूर्ख म्हणून सोडून गेले.
कारण तसच होतं...

चांगल्या पगाराची नोकरी करून आरामात आयुष्य जगण्याची संधी असताना, क्षितिज मेहरा या वेगळ्याच वाटेनं निघाला होता.

खिशात फक्त ५० रु घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी तो राजपुरा येथील शाळेच्या समन्वयकांना भेटण्यासाठी निघाला. या शाळेत त्यांने एक कार्यशाळा घेतली होती. त्याचे पैसे लवकर कसे मिळतील याचा विचार तो करत होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता उठून देवाची प्रार्थना त्याने केली आणि २ किमी अंतरावर असलेल्या बस थांब्यापाशी गेला. खरं तर पोटात अन्न नसल्यामुळे अंगात ताकद नव्हती. पण आता पै अन पै वाचवण्याची गरज होती.

राजापुराला जाण्यासाठी ३५ रुचं तिकीट घेतल्यावर त्याच्याकडे केवळ १५ रु शिल्लक राहिले. शाळा गावापासून लांब होती. त्यामुळे ३ किमी अंतर त्याला पायी चालत जावं लागलं. चालताना त्याच्या मनात एकच विचार होता, की शाळेने जर आज पैसे दिले नाहीत तर त्याला चंदिगढपर्यंत पायी चालत जावं लागेल.

प्रचंड तणावात त्याने शाळेत प्रवेश केला आणि आश्चर्य... तो दिसल्याच क्षणी शाळेचे समन्वयक म्हणाले, ‘क्षितिज, तुमची कार्यशाळा आम्हाला खूप आवडली. तुमचे या पूर्ण कार्यशाळेचे आम्ही जमा केलेले २५००० रु घेऊन जा.”

आज युवशालाच्या माध्यमातून अनेकांना दिशा देण्याचे काम करणाऱ्या क्षितिजच्या डोळ्यात तो दिवस आठवला की, आजही पाणी येतं......

पण अनेकांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी हेच पाणी त्याची प्रेरणा ठरतं आहे, हे नक्की...!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

सुमेधा देशपांडे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

your story