Bhartiyans

Menu

विश्वविक्रम केलेल्या या लेडी-शार्पशूटरचं आहे अवघे ८२ वर्षे वयोमान...!

Date : 27 Dec 2016

Total View : 374

चंद्रो तोमर या जगातील पहिल्या ८२ वर्षाच्या शार्पशूटर आहेत. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी हातात प्रथम बंदूक घेतली. त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पहिलेच नाही.


सारांश

वय वर्षे ६५ हे कशाचे वय आहे...? तुम्ही सांगाल, निवृत्तीचे, आरामाचे, छंद जोपासण्याचे... पण, हाच प्रश्न तुम्ही विश्वविक्रम केलेल्या उत्तर प्रदेशमधील चंद्रो तोमर या आजींना विचारला तर त्या म्हणतील ६५ हे हातात बंदूक घेऊन अचूक निशाणा साधत शार्पशूटर होण्याची स्वप्ने बघण्याचे वय आहे...! त्यांनी स्वत: हे केलं आहे. आज भेटूया ह्या शार्पशूटरला ज्यांचे आज आहे अवघे ८२ वर्षे वयोमान.सविस्तर बातमी

६५ वर्षे हे कशाचे वय आहे, असा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर तुम्ही काय सांगाल? 
निवृत्तीचं, आरामाचं, छंद जोपासण्याचं, ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद होण्याचं, समाजकार्याचं.... असं काही तरी.

पण, हाच प्रश्न तुम्ही विश्वविक्रम केलेल्या उत्तर प्रदेशमधील चंद्रो तोमर या आजींना विचारला तर त्या म्हणतील वय वर्षे ६५ हे हातात बंदूक घेऊन अचूक निशाणा साधत शार्पशूटर होण्याची स्वप्ने बघण्याचे आहे...!

हा फक्त त्यांचा विचार नाही तर हा त्यांचा अनुभव आहे आणि हे त्यांचे कर्तृत्व आहे.

आज भेटूया ह्या शार्पशूटरला ज्यांचे आज आहे अवघे ८२ वर्षे वयोमान. 
चंद्रो तोमोर यांचे ८२ वय हा केवळ वयाचा आकडा नाही तर तो एक मैलाचा दगड आहे...

हे दाखवून देणारा, की वाढत्या वयाची छाया, खचणारे शरीर, कमी होत जाणारा आत्मविश्वास यांपैकी काहीही तुमच्या दृढ निश्चयाला मर्यादा घालू शकत नाही. 
 चंद्रो तोमर या जगातील पहिल्या ८२ वर्षाच्या शार्पशूटर आहेत.

वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी हातात प्रथम बंदूक घेतली. त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पहिलेच नाही.
हे कसं जमलं...? 
तर अगदी सहज..!

६ मुलांची आई आणि १५ नातवांची आजी चंद्रो दादी एकदा नातींबरोबर उत्तर प्रदेशातील जोहरी या खेड्यावर असलेल्या रायफल कॅम्पवर जात होत्या. 
सहज त्यांनी रायफल हातात घेतली आणि नेम धरला. अचूक नेम लागला.

त्यावेळेस त्यांचं वय होतं ६५ आणि तेव्हा त्यांनी रायफल शिकण्यास सुरवात केली.

आपल्या कार्यातून त्यांनी अनेक महिलांना प्रेरणा दिली आहे. 
जोहरी खेड्यातील २५ पेक्षा जास्त स्त्रिया आज स्वतःच्या परंपरा आणि रूढी सांभाळत रायफलचे प्रशिक्षण घेत आहेत.

एकीकडे ‘डोक्यावरचा पदर’ ही संस्कृती सांभाळण आणि दुसरीकडे रायफल घेऊन नेमबाजीत पदक जिंकणं ही आश्चर्याची गोष्ट आहे.

२०१० साली चंद्रो यांची मुलगी सीमाने रायफल आणि पिस्तुल वर्ल्ड कपमध्ये सुवर्ण पदक पटकावलं. चंद्रो यांची नात सीमा सोलंकी हिने देखील हंगेरी आणि जर्मनी इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला होता.

आजवर आपण नणंद भावजय हे नाते कायम खाष्ट असते, असे समजतो. 
पण, इथे असं नाही.

चंद्रो यांची नणंद देखील त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून पुढे जाते आहे. 
प्रकाशी तोमोर यांचे वय देखील ७७ वर्षे आहे. एकदा त्यांनी एका पुरुष उप-अधीक्षकाला रायफल आणि पिस्तुल शूटच्या स्पर्धेमध्ये हरवले.

तेव्हा एका स्त्रीने आपल्याला हरवले हा धक्का सहन झालेला तो अधीक्षक पारितोषिक वितरणाला देखील उपस्थित राहिला नव्हता, असे नीतू शेरोन या क्रीडा संघटनेच्या अध्यक्षा सांगतात.

एकूणच काय, तर वय, जात, धर्म, पैसा, वेळ, भाषा, रंग, स्थळ अशी कोणतीही बंधने तुम्हाला अडवू शकत नाही. हेच दादिनी दाखवून दिले..!

यावरून एका सुप्रसिद्ध कवीच्या ओळी आठवतात. कवी म्हणतात,
उठल्या सुटल्या देऊ नको ग, भान वाढत्या वयाचे,
असेच वयास चुकवित चुकवित पुढे जायचे..!

चंद्रो तोमर आपल्याला हेच सांगत आहेत...!!!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

अनिता घटणेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य