Bhartiyans

Menu

पहिल्या विश्वचषक विजेतेपदाच्या थरारावर अनुराग कश्यप काढतोय पिक्चर...

Date : 02 Nov 2016

Total View : 422

सेमीज मध्ये सुद्धा पोचतील का नाही असे वाटणारी भारतीय टीम त्यावेळी जशी जशी जिंकत गेली आणि शेवटी फायनल जिंकली तो सगळाच्या सगळा थरार तसाच्या तसा दिसणार आहे फिल्म मध्ये


सारांश

सेमी फायनलपर्यंतसुद्धा जातील की नाही असे वाटत असताना टीम इंडिया जेव्हा एक एक सामना जिंकत अगदी फायनल देखील जिंकते, तेव्हाचा थरार तसाच्या तसा फिल्ममध्ये दिसणार आहे.सविस्तर बातमी

पहिल्या विश्वचषक विजेतेपदाच्या थरारावर अनुराग कश्यप काढतोय पिक्चर...
#Bharatiyans

२५ जून १९८३ संध्याकाळी टीव्ही समोर जमलेल्या लाखो-करोडो भारतीयांच्या साक्षीने त्याकाळच्या जगज्जेत्या आणि ज्यांना हरवणे केवळ अवघडच नव्हे तर अशक्यच होते अश्या \\'राक्षसी खेळाडूंची सेना\\' भरलेल्या क्लाइव्ह लॉईडच्या नेतृत्वाखाली एकच नव्हे तर दोन विश्वचषक जिंकलेल्या वेस्ट इंडीज संघाला कपिल देवच्या भारतीय संघाने रोमहर्षक धूळ चारली आणि ६० ओव्हर्सचा विश्वचषक जिंकला.

१९७५ आणि १९७९ सालचे दोन्ही विश्वचषक जिंकणारी वेस्ट इंडिजची टीम जबऱ्या फॉर्मात होती.

अँडी रोबर्ट्स, जोएल गार्नर, माल्कम मार्शल आणि मायकेल होल्डिंग या राक्षसी तुफानांनी भारतीय फलंदाजांना ६० ओव्हर्स मध्ये निव्वळ १८३ मध्येच रोखले.

पहिल्यांदाच विश्वकप फायनल मध्ये इंग्लंडला सेमीज मध्ये हरवून पोचलेल्या भारतीय संघाने पहिली फलंदाजी करून कसेबसे निव्वळ १८३ रनांचे टार्गेट आणि ते ही ६० ओव्हर्समध्ये जिंकण्याचे अगदीच माफक टार्गेट वेस्ट इंडीजसमोर ठेवले.

गोर्डन ग्रीनीज, डेस्मंड हेन्स, विव्ह रिचर्डस, क्लाइव्ह लॉईड, लॅरी गोम्स इत्यादी कसलेल्या हातोडा आणि हैवानी फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिज फलंदाजांपुढे हे भारतीय टार्गेट म्हणजे \\'किस झाड की पत्ती\\'च होते.

पण पहिल्याच षटकात मुंबईचा मध्यमगती गोलंदाज बलविंदर संधू याने गॉर्डन ग्रीनीज याचा बोल्ड काढला, मदनलालने डेस्मंड हेन्स आणि विव्ह रिचर्डस च्या विकेट काढल्या.
तब्बल १२० यार्ड्स मागल्या बाजूस धावत जाऊन कपिल देवने विव्ह रिचर्डस चा अप्रतिम कॅच घेतला आणि मॅच फिरली.

रॉजर बिन्नीने क्लाइव्ह लॉईडला काढला आणि मोहिंदर अमरनाथने जेफ दुजॉन , माल्कम मार्शल आणि मायकेल होल्डींगची विकेट काढत शेपटी कापून काढली.

भारतीय क्रिकेट इतिहासातले हेच सर्व अदभूत क्षण आता ऑफिशियली जिवंत होणार आहेत पुन्हा एकदा रुपेरी मोठ्या पडद्यावर मित्रांनो आणि मैत्रिणींनो....

अनुराग कश्यपची फॅन्टम फिल्म्स आणि विष्णू इंदोरी हे दोघे मिळून तेच चिरंतन रोमहर्षक क्षण पुन्हा एकदा जिवंत करणार आहेत आणि आपल्या सर्वांनाच पुन्हा एकदा त्या अदभूत संध्याकाळच्या सफरीवर घेऊन जाणार आहेत.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे तो विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघातले सगळेच्या सगळे खेळाडू या फिल्म मध्ये दर्शन देणार आहेत.

हे सगळे खेळाडू त्यांच्या खर्याखुर्या नावानेच या फिल्म मध्ये असणार आहेत आणि यांच्या आयुष्यातले तेच सर्वच्या सर्व खरेखुरे प्रसंग आपल्याला या फिल्म मध्ये पाहायला आणि अनुभवायला मिळणार आहेत.

सेमीज मध्ये सुद्धा पोचतील का नाही असे वाटणारी भारतीय टीम त्यावेळी जशी जशी जिंकत गेली आणि शेवटी फायनल जिंकली तो सगळाच्या सगळा थरार तसाच्या तसा जगायला आता मी तयार झालो आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो....

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

इंडिया टुडे