Bhartiyans

Menu

खाओ-पिओ-मजा करो या पलीकडे सामाजिक बांधिलकी जपणारा कोलकताचा कॅफे टोटो..!

Date : 02 Jan 2017

Total View : 332

‘कॅफे टोटो’ हा एक छोटासा आशेचा किरण आहे. त्या तरुणांसाठी ज्यांच्या आयुष्यात आजवर केवळ अंधारी रात्रच होती.


सारांश

कॅफे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते खाओ-पिओ-मजा करो हे वातावरण. यातून होतं एका सुखवस्तू संस्कृतीचे दर्शन. पण कॅफे टोटो असे नाही. उसकी की बात कुछ अलग ही है..! ‘कॅफे टोटो’ हा एक छोटासा आशेचा किरण आहे. त्या तरुणांसाठी ज्यांच्या आयुष्यात आजवर केवळ अंधारी रात्रच होती. या कॅफेच्या मालकाने आजवर अनेक तरूणांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मदत केली आहे!सविस्तर बातमी

कॅफे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते खवय्यांची गर्दी, कॉफीप्रेमींची रेलचेल, मित्रांच्या गप्पा, हसी-मजाक आणि एकूणच खाओ-पिओ-मजा करो हे वातावरण. यातून होतं एका सुखवस्तू संस्कृतीचं दर्शन. 
पण कॅफे टोटो असा नाहीये, उसकी की बात ही कुछ अलग है..!

या कॅफेच्या मालकाने आजवर अनेक तरूणांना स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी मदत केली आहे! कशी, ते तुम्हीच वाचा...!

खाओ-पिओ-मजा करो या पलीकडे सामाजिक बांधिलकी जपणारा कोलकताचा कॅफे टोटो..!

सौहार्दतेचे दर्शन भारतीय संस्कृतीमधून वारंवार होत असतं. मग, या संस्कृतीचे पाईक असलेली भारतीय तरुण पिढी तरी याला अपवाद कशी असेल? 
विविध वाटा निवडून ही पिढी नवनवीन व्यवसायांमध्ये प्रयोग करत आहे. यशस्वी होते आहे पण हे सगळे करताना आपण समाजाचे देणे लागतो ही जाणीव देखील त्यांना आहे. 
’कॅफे टोटो’ हे याचंच एक जिवंत उदाहरण..!

कोलकातामधील ’कॅफे टोटो’च्या मालकाच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. त्याला असं वाटलं की, उपेक्षित, वंचित अशा तरूण-होतकरू मुलांना आपण याच कॅफेमध्ये विविध पदार्थ करायला शिकवले आणि त्यातून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली तर?

त्याने हीच कल्पना प्रत्यक्षात उतरवली आणि आज तीच या कॅफेची खरी ओळख आहे.

’कॅफे टोटो’ एक असाच आगळा वेगळा कॅफे. 
कोलकाताच्या बंगाली आणि कोस्मोपोलीटन वातावरणासाठी तो प्रसिद्ध आहे! इथे केवळ तुमच्या जिभेचे चोचले पुरवले जात नाहीत, तर या बरोबरच समाजकार्य देखील होतं !

एका फ्रेंच वकिलाच्या साहाय्याने, कोलकाताच्या दक्षिण भागात टूमोरो’ज फाउंडेशन आणि लाईफ प्रोजेक्ट फोर युथ या दोन एन.जी.ओ. मिळून हा आगळावेगळा कॅफे चालवतात. फ्रेंच एन.जी.ओ.च्या कार्यकर्त्यांनी शिकवून तयार केलेले वंचित गटातील तरुण इथे काम करतात आणि त्याचबरोबर फ्रेंच पदार्थ करायला देखील शिकतात.

एकूणच काय तर कॅफे टोटो हा ‘रेस्टोरंट–कम-स्कूल’ आहे. १८ ते २४ वयोगटातील तरुण इथे हा १ वर्षाचा कुकिंगचा कोर्स करतात. हा कोर्स तीन भागात आहे. आठवड्याचे ५ दिवस हा कोर्स चालतो. ज्यात संभाषण कला, कंम्पुटर स्किल्स, इंग्लिश भाषा, हिशेब आणि कुकिंग शिकवले जाते. त्यापैकी कॅफे टोटो हे कुकिंगचं प्रशिक्षण देतं. इथे एक दिवस कॅफे-कम-स्कूल चालते.

जून २०१६ मध्ये सुरु झालेला हा कॅफे याच्या सामाजिक बांधिलकी जपण्याच्या या उपक्रमामुळे अत्यंत लोकप्रिय झाला आहे. सध्या येथे १४ तरुण व्यावसायिक प्रशिक्षण घेत आहेत. हे सर्वजण दुर्लक्षित, अपंग, वंचित आहेत. या कॅफेमुळे त्यांना जणू एक घरच मिळालंय.

कॅफे टोटोमध्ये एकाचवेळी जास्तीत जास्त २० जण बसू शकतात. २४ तास मिळणाऱ्या विविध ताज्या फ्रेंच पदार्थांसाठी हा कॅफे प्रसिद्ध आहे. त्यांनी आता घरपोच सेवा देखील सुरु केली आहे. इथे येणाऱ्या फ्रेंच रहिवासी, प्रवासी यांना सेवा देण्यासाठी या प्रशिक्षणार्थींना इंग्लिश आणि फ्रेंच भाषा चांगली अवगत असणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना शिक्षण दिलं जाते.

कॅफे चालकांना असा विश्वास वाटतो, की या तरुणांपैकी नक्कीच कोणीतरी उद्या आपले स्वत:चे रेस्टोरंट सुरु करेल. हे तरूण पुढे जावून नक्कीच उद्योजक होतील. कॅफे चालक आपल्या आर्थिक फायद्यापेक्षा या तरुणांना दिले जाणारे प्रशिक्षण याला अधिक प्राधान्य देतात.

‘कॅफे टोटो’ हा एक छोटासा आशेचा किरण आहे. त्या तरुणांसाठी ज्यांच्या आयुष्यात आजवर केवळ अंधारी रात्रच होती. तेव्हा, मित्रांनो, कोलकाताला गेलात, तर या ’कॅफे टोटो’ ला नक्की भेट द्या!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

मृणाल काशीकर- खडक्कर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

Times of India