Bhartiyans

Menu

सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘मानवता’ जोपासणारा ‘मानव केडिया’..!

Date : 04 Jan 2017

Total View : 348

ज्या वयात मुले सोशल साईट्सवर तासनतास वेळ घालवतात. त्या वयात, १७ वर्षांचा 'मानव' आपल्याच वयाच्या अनेक वंचित मुलांना वेबसाईटच्या माध्यमातून चित्रकलेचे प्रशिक्षण देऊन त्यांना अर्थसहाय्य मिळवून देतो आहे.


सारांश

‘हल्लीची मुलं, वाचत नाही, खेळत नाही तासनतास मोबाईल-कंम्प्यूटरमध्ये डोळे घालून बसतात’, टीनएजर्समध्ये (किशोरवयीन मुले) हे प्रमाण जास्त आहे, अशी तक्रार जवळपास प्रत्येक पालकाची आहे ! पण म्हणून प्रत्येकच १५-१७ वर्षांचा मुलगा त्याच्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसतो तेव्हा तो टाईमपासच करत असतो, असा जर तुमचा ठाम समज असेल तर ‘मानव केडिया’ तो खोडून काढेल...! कोण हा मानव केडिया, बघुया..!सविस्तर बातमी

‘सोशल मीडिया’ आणि ‘आजची तरुणाई’ या विषयावर आपल्या देशात जेवढी चर्चा झाली आहे, जेवढं बोललं, लिहिलं, वाचलं, पाहिलं आणि ऐकलं गेलं आहे तेवढं कदाचितच दुसऱ्या कुठल्या देशात झालं असेल.

‘हल्लीची मुलं, वाचत नाहीत, खेळत नाहीत, तासनतास फक्त आणि फक्त मोबाईल आणि कंम्प्यूटरमध्ये डोळे घालून बसतात’ आणि टीनएजर्समध्ये (किशोरवयीन मुले) हे प्रमाण जास्त आहे, अशी तक्रार जवळपास प्रत्येक पालकाची आहे !

टीनएज... किशोरावस्था...रंगबेरंगी दुनिया..! 
शालेय जीवन आणि महाविद्यालयाची झगमगती दुनिया यांच्यातला उंबरठा..! 
गप्पा-टप्पा, यारी-दोस्ती, मारामारी आणि ‘प्रकरणं’ हेच सर्वस्व वाटण्याचे वय..!

पण म्हणून प्रत्येकच १५-१७ वर्षांचा मुलगा त्याच्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेला असतो तेव्हा तो टाईमपासच करत असतो, असा जर तुमचा ठाम समज असेल तर ‘मानव केडिया’ तो खोडून काढेल...! कोण हा मानव केडिया, बघुया..!

सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘मानवता’ जोपासणारा ‘मानव केडिया’..!
#Bharatiyans

टिनएजर्सचं आपलं एक जग असतं. या वयात त्यांना आपल्या जगाशिवाय कसलंच भान नसतं. अश्या अनेकांना आपण आपल्या आसपासच सोशल साईट्सवर तासनतास वेळ घालवताना बघतो. 
पण, मानव केडीया याला अपवाद आहे.

१७ वर्षाचा 'मानव' आपल्या नावाप्रमाणे ‘मानवता’ जोपासण्याचा त्याच्यापरीने प्रयत्न करतो आहे.

मानवने आपल्याच वयातील अनेक वंचित मुलांना चित्रकलेचे प्रशिक्षण दिले असून त्यांना अर्थसहाय्य देखील मिळवून दिले आहे. 
आणि महत्वाच म्हणजे हे सर्व तो एका वेबसाईटच्या माध्यमातून करतोय..!

राजस्थानातील उदयपूर हे मानवचे जन्मगाव. जयश्री पेरीवाल इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या मानवचा ‘चित्रकला’ हा छंद. आपल्या छंदाचा उपयोग कोणासाठी तरी व्हावा आणि त्यातून मदत व्हावी असं त्याला वाटायचं. याच कल्पनेतून त्याने चित्रकलेची आवड असलेल्या त्याच्या जवळपासच्या वंचित मुलांना गोळा केलं आणि त्यांना प्रोत्साहित केलं.

मानवने त्यांना योग्य मार्गदर्शन करुन त्यांच्याकडुन सुंदर चित्रे काढून घेतली. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर ही चित्रे विकून त्याने या मुलांसाठी एक नवा आर्थिक स्रोत निर्माण केला. 
अर्थातच, हे करत असताना कोणाच्याही एकाच्या खिशाला चाट बसणार नाही याची काळजी तो घेत होता आणि थेंबे थेंबे तळही साचवत होता.

हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवण्यासाठी मानवाने एक वेबसाईट तयार केली. 
तो म्हणतो, सोशल मीडियाचा उपयोग जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली कला पोहोचावी हा आहेच तसेच त्याद्वारे वंचित मुलांना अर्थसाहाय्य मिळवून देणे हा देखील आहे. या मुलांना उपकाराच्या भावनेतून दिलेला सहानभुतीचा हात नकोय. तर त्यांना त्यांच्या मेहनतीचा आणि कलेचा मोबदला हवा आहे. तसं झालं तरच त्यांचे कर्तृत्व घडण्यास मदत होईल.

अलीकडेच मानव 'प्रवाह' नावाच्या एका संस्थेशी पण जोडला गेला आहे. वंचित मुलांप्रमाणेच मानवला समाजातील तृतीय पंथीयांसाठी देखील काहीतरी करण्याची इच्छा आहे.

मानवसारख्या एका १७ वर्षीय मुलाला सामाजिक प्रश्नांची जाणीव होणं आणि त्याने त्यासाठी स्वत:हून धडपड करणं ही खरच प्रशंसनीय बाब आहे.

तुम्ही देखील मानवला मदत करू शकतात. मानव व त्याच्या चित्रांबद्दल अजून माहिती हवी असल्यास www.manavkedia.com या त्याच्या संकेतस्थळाला भेट द्या. तुम्ही https://www.facebook.com/officialmanavkedia/ याद्वारे त्याच्याशी फेसबुकवरून देखील कनेक्ट होऊ शकता.

धन्यवाद..!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

वैशाली सागर - देवकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य