Bhartiyans

Menu

इंदू सिंग : पाटण्याच्या आधुनिक सावित्रीबाई..!

Date : 04 Jan 2017

Total View : 484

एक स्त्री शिकली, की ती संपूर्ण कुटुंबाला शिकवते.. याच प्रेरणेने पाटणा येथील इंदू सिंग यांनी मुख्याध्यापक पदाचा राजीनामा दिला आणि महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरु केले.


सारांश

गौतम बुद्ध शिक्षणाची व्याख्या करताना म्हणतात, ‘दुसऱ्याच्या दु:खात भागीदार होण्यास शिकणे हेच खरे शिक्षण..!’ पाटणा येथील इंदू सिंग यांनी हे वाक्य प्रत्यक्ष कृतीत उतरवलं. त्या झाल्या आधुनिक सावित्रीबाई..! महिलांना शिकवण्यासाठी त्यांनी मुख्याध्यापक पदाचा राजीनामा दिला आणि महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र सुरु केले. बालवाडी, शिवणकाम, संगणक प्रशिक्षण असे विविध अभ्यासक्रम तिथे सुरु आहेत.सविस्तर बातमी

गौतम बुद्ध शिक्षणाची व्याख्या करताना म्हणतात, ‘दुसऱ्याच्या दु:खात भागीदार होण्यास शिकणे हेच खरे शिक्षण..!’ तसेच एक स्त्री शिकली, की ती संपूर्ण कुटुंबाला शिकवते हे देखील एक सुंदर वाक्य आहे....

अशी वाक्ये आपण ऐकत असतो. मात्र, पाटणा येथील इंदू सिंग यांनी ही वाक्ये स्वत:च्या कार्यातून प्रत्यक्ष कृतीत उतरवली आणि त्या झाल्या आधुनिक सावित्रीबाई..! 

 

इंदू सिंग या २५ वर्षे शिक्षकी पेशात कार्यरत होत्या. त्यादरम्यान त्यांचा सतत पालकांशी संपर्कात येत होता. विशेषतः विद्यार्थ्यांच्या आईशी त्यांचा जास्त संपर्क यायचा. त्यावेळी त्यांना जाणवत असे की, केवळ मुलांनाच नाही, त्यांच्या आईलासुद्धा शिक्षणाची गरज आहे.

 

५६ वर्षाच्या इंदू सिंग सांगतात, बऱ्याचशा पालक महिला या गृहिणी आहेत. इयत्ता १० वी पर्यंतच त्यांचे शिक्षण झालेले असते. त्यांच्याशी बोलताना नेहमी वाटते, की त्यांना प्रेरणेची गरज आहे. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी."

 

या द्र्ष्टीने कार्य करायचे हे ध्येय ठेवून त्यांनी २०१२ साली मुख्याध्यापक पदाचा राजीनामा दिला आणि एक व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र सुरु केले. संशोधन करून विविध अभ्यासक्रम तयार केले आणि बालवाडी प्रशिक्षण केंद्र सुरु केले. हळू हळू या केंद्राचा विस्तार झाला. आता तिथे शिवणकामा, संगणक प्रशिक्षण असे विविध अभ्यासक्रम सुरु झाले आहेत. 

 

यातूनच त्यांनी पाटणा येथे ७ पदाधिकारी आणि २० इतर सदस्य यांची मिळून अशी एक संस्था तयार केली. IPSHA असे त्या संस्थेचे नाव. IPSHA म्हणजे Infinite, Potentiality, Significance, Hospitality and Awesome. महिलांमध्ये निसर्गात: प्रचंड शक्ती आणि असीम क्षमता आहे. त्यांना वाव मिळणे हे आवश्यक आहे. तसे झाले तर याचा उपयोग समाजासाठी होऊ शकतो.

 

या केंदात साधारण ६०० महिला शिक्षण घेतात. त्यांच्या सक्षमीकरणासाठीही या संस्था कार्यरत आहेत. महिलांना मुलाखत कौशल्य आणि व्यावसायिक शिष्टाचार याचीही नीट माहिती दिली जाते. याव्यतिरिक्त संस्थेने एक कपडे उत्पादन केंद्राचीही निर्मिती केली आहे ज्यातून तयार झालेले कापड हे स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवले जाते.

 

स्मिता शर्मा, बिना देवी यांसारख्या अनेक महिलांना या संस्थेचा उपयोग झाला असून त्या आज स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. पंजाब नॅशनल बँकेने या संस्थेला साहाय्य करून काही शिलाई मशीन व इतर सामान उपलब्ध करून दिला आहे. विद्यार्थ्यांकडून अतिशय माफक शुल्क घेऊन हे केंद्र चालवले जाते.

 

इंदू सिंग यांच्याकडे दृष्टी होती. या महिलांना घडवण्याची, त्यांच्या पायावर उभे करण्याची त्यातून हे साध्य होऊ शकलं...!

म्हणूनच हे वाचताना बोरकरांच्या कवितेतल्या ओळी आठवतात, की....

तेच डोळे देखणे

जे कोंडिती साऱ्या नभा ।

वोळिती दुःखे,

जनांच्या सांडिती नेत्रप्रभा ॥

 

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

राखी कुलकर्णी

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य