Bhartiyans

Menu

महेश सवानी : एकाच मांडवात २३६ मुलींचे लग्न स्वखर्चाने लावून देणारा गुजरातचा खराखुरा ‘सांताक्लॉज’.

Date : 21 Jan 2017

Total View : 210

२५ डिसेंबर २०१६ ला २३६ अनाथ मुलींचे लग्न महेश सवानी यांनी स्वखर्चाने लावून दिले. आतापर्यंत असे 700 विवाह त्यांनी लावून दिले असून १००० विवाह लावण्याचा त्यांचा संकल्प आहे.


सारांश

नाताळ म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो लाल ड्रेस घालून पाठीवर खाऊ आणि भेटवस्तूंनी भरलेली पोतडी घेऊन येणारा दाढीवाला सांताक्लॉज..! पण, यावेळेस गुजरातवासियांनी एका खऱ्याखुऱ्या सांताक्लॉजला अनुभवलं. २५ डिसेंबरला २३६ अनाथ मुलींचे लग्न स्वखर्चाने लावून देणाऱ्या या सांताक्लॉजचे नाव आहे महेश सवानी..! त्यांनी आतापर्यंत असे 700 विवाह लावून दिले असून १००० विवाह लावण्याचा त्यांचा संकल्प आहे.सविस्तर बातमी

नुकताच आपण सर्वांनी नाताळ सण साजरा केला.

नाताळ म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो लाल ड्रेस घालून पाठीवर खाऊ आणि भेटवस्तूंनी भरलेली पोतडी घेऊन येणारा दाढीवाला सांताक्लॉज..!

पण, यावेळेस गुजरातवासियांनी एका खऱ्याखुऱ्या सांताक्लॉजला अनुभवलं !

या सांताक्लॉजने एकाच वेळी २३६ अनाथ मुलींना नाताळाची अविस्मरणीय भेट दिली. २५ डिसेंबरला २३६ अनाथ मुलींचे लग्न स्वखर्चाने लावून देणाऱ्या या सांताक्लॉजचे नाव आहे महेश सवानी..!

महेश सवानी : एकाच मांडवात २३६ मुलींचे लग्न स्वखर्चाने लावून देणारा गुजरातचा खराखुरा ‘सांताक्लॉज’.
#Bharatiyans

‘जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे!’ हे गुजरातच्या एका सद्गृहस्थाने केवळ जाणलं नाही, तर कृतीत आणलं!

ज्याला कोणी नाही, त्याला ज्या अडचणी येतात, ज्या संघर्षाला सामोरं जावं लागतं, ते जाणून, त्यांच्यासाठी देवासारखे धावून जाणाऱ्या या हे सद्गृहस्थ आहेत गुजरातमधील हिऱ्याचे व्यापारी महेश सवानी !

महेश यावेळेस गुजरामधील नागरिकांसाठी खरेखुरे ‘सांताक्लॉज’च ठरले. कारण, गेल्या नाताळला म्हणजे २५ डिसेंबर २०१६ ला याच महेश यांनी २३६ अनाथ मुलींचे थाटामाटात लग्न लावून दिले! हा सामूहिक विवाह सोहळा त्यांनी सर्व धर्मातील अनाथ व गरीब मुलींसाठी आयोजित केला होता. इतकेच नव्हे तर याच मंडपात त्यांच्या दोन सुपुत्रांचे लग्न देखील पार पडले.

२०१६ मध्ये काही जणांनी अत्यंत साधेपणाने लग्न करून त्या रकमेतून समाजोपयोगी कामे केली. या आगळ्यावेगळ्या लग्नसमारंभामुळे २०१६ हे वर्ष गाजले. 
त्यातच मोलाची भर टाकली ती महेश सवानी यांनी.

२०१२ मध्ये महेश यांचे बंधू देवाघरी गेले. त्यानंतर महेश यांच्या पुतणीचा विवाह करताना त्यांच्या वाहिनीला कोणत्या अडचणी आल्या, ते महेश यांनी जवळून पाहिले होते.

पित्याचे छत्र नसेल तर मुलीचे लग्न करताना कशा अडचणी येतात यांची त्यांना कल्पना होती. तेव्हाच त्यांनी ठरवले, की यापुढे आपण कोणत्याही मुलीला अशा त्रासाला सामोरे जाऊ द्यायचे नाही.

त्यामुळे २०१२ पासून महेश अशा मुलींचे पालकत्व स्वीकारून त्यांचे लग्न लावून देतात. इतकेच नाही, तर त्या मुलींना त्यांच्या भावी आयुष्यात काही अडचण आल्यास ते वडिलांसारखे धावून जातात.

महेश यांच्या मते कन्यादान हे अत्यंत पुण्याचे काम आहे. त्यांनी आजपर्यंत जवळजवळ ७०० अनाथ किंवा गरीब परिवारातील मुलींचे कन्यादान केले आहे. या सत्कार्यामुळे ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त होतो अशी त्यांची धारणा आहे.

२५ डिसेंबर २०१६ ला संपन्न झालेल्या या दिमाखदार सोहळ्यामध्ये २३६ मुली लग्नबंधनात अडकल्या. या वेळी लाखो रुपयांच्या भेटवस्तू देखील त्यांनी या नवविवाहित दांपात्याला दिल्या.

इतकेच नव्हे तर नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी आर्थिक मदत केली. महेश यांच्या २ सुपुत्रांचे विवाह देखील याच समारंभात पार पडले.

महेश सवानी यांनी १००० विवाह करून देण्याचा संकल्प केला आहे.

आपण सर्वजण त्यांना त्यांच्या या पुण्यकर्मासाठी शुभेच्छा देऊया आणि त्यांच्यापासून प्रेरणा देखील घेऊया !

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

मृणाल काशीकर- खडक्कर

टीम भारतीयन्स