Bhartiyans

Menu

उद्योग जगतात यशस्वी झालेल्या भारताच्या ग्रामीण भागातील ‘त्रिदेवी’ !

Date : 31 Jan 2017

Total View : 1019

भारताच्या ग्रामीण भागातील यशस्वी उद्योजिका असलेल्या त्रिदेवींची ओळख आपण करून घेणार आहोत ! या त्रिदेवी केवळ स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या असे नाही तर त्यांनी अनेकांना स्वावलंबन दिले !


सारांश

जिम्मेदारी संग नारी भर रही है उड़ान, ना कोई शिकायत, ना कोई थकान..! या ओळी भारतीय स्त्रीला तंतोतंत लागू पडतात. एकाचवेळी परंपरा जपणं आणि त्याच वेळी स्वत:च्या कार्यक्षेत्रात प्रगती करणं, मर्यादांच्या परिघात वाढताना अमर्याद क्षमतेने काम करणं या दोन्हीही गोष्टी भारतीय नारी किती चपखल करू शकते हेच आपल्याला या यशस्वी उद्योजिका असलेल्या त्रिदेवी सांगतात.सविस्तर बातमी

जिम्मेदारी संग नारी भर रही है उड़ान, 
ना कोई शिकायत, ना कोई थकान..!

या ओळी भारतीय स्त्रीला तंतोतंत लागू पडतात.

एकाचवेळी परंपरा जपणं आणि त्याच वेळी स्वत:च्या कार्यक्षेत्रात प्रगती करणं, मर्यादांच्या परिघात वाढताना अमर्याद क्षमतेने काम करणं या दोन्हीही गोष्टी भारतीय नारी किती सहज, अचूक आणि चपखल करू शकते हे आपण अनेक उदाहरणांतून पाहीलं आहेच.

आज अशाच यशस्वी उद्योजिका असलेल्या त्रिदेवींची ओळख आपण #bharatiyans च्या माधमातून करून घेणार आहोत ! 

उद्योग जगतात यशस्वी झालेल्या भारताच्या ग्रामीण भागातील ‘त्रिदेवी’ !

१) युक्ती चौधरी :

हरियानासारख्या पुरुषप्रधान राज्यातील युक्ती चौधरी ही मुलगी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उभी राहील, असा विचार देखील कोणी केला नव्हता.

पण युक्तीने ते केलं. कारण, महिलांच्या प्रश्नांविषयीच्या तिच्या तळमळीने तिला पुन्हा याच मातीकडे ओढून आणलं. ती हरियाना राज्यातील जिल्हा परिषद निवडणूक जिंकलेली ती महिला उमेदवार ठरली.

युक्तीने दिल्लीच्या सेंट स्टीफन्स महाविद्यालयातून इतिहास विषय घेऊन पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ती दिल्ली विद्यापिठातून एलएलबी झाली आणि पुढे एलएलएम करण्यासाठी केंब्रिजच्या हार्वर्ड विद्यापिठात गेली. त्यानंतर ती तिकडेच स्थायिक होईल, भारतात परतणार नाही असं अनेकांना वाटलं;

पण गावाचा विकास व्हावा या तळमळीने युक्ती भारतात परतली. ती फतेहबाद जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभी राहिली आणि ३५ मतांनी जिंकून आली.

गावाला स्वच्छ पाणी मिळावे, सर्वांना शिक्षणाच्या समान संधी मिळाव्या, महिलांचे प्रश्न, आणि मुलीचा घटता जन्मदर या प्रश्नांवर ती सध्या काम करते आहे. सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानतही तिचा सक्रीय सहभाग आहे.

युक्ती म्हणते, ‘बदल एका रात्रीत घडत नसतात. बदल किंवा परिवर्तन मोठ्या प्रमाणावर घडवून आणण्यासाठी अशा उपक्रमांची आज गरज आहे.’

२) दलिमी पटगिरी :

दलिमी पटगिरी ही आसाममधील भालागुरी या छोट्याशा गावातील एक सामान्य स्त्री. तिचे पती प्राथमिक शिक्षक. भारताच्या उत्तर-पूर्व भागातील आसामला निसर्गसौंदर्य उदंड लाभले असले तरी तिथे बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे.

मात्र, दलिमी पटगिरीने आपल्यासह अनेकांना रोजगार मिळवून दिला.

आसाममध्ये पोफळीचे वृक्ष मोठ्या प्रमाणावर आहेत. या झाडांच्या सालीचा उपयोग करून त्यापासून विविध प्रकारची भांडी तयार करण्याचा उद्योग तिने सुरू केला आणि त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तिने सात महिलांचा गट तयार केला आणि त्यातून हा उद्योग मोठ्या प्रमाणावर सुरू केला. या माध्यमातूनच ‘ध्रिती : द करेज विदइन’ या संस्थेची स्थापना झाली.  

आज ‘ध्रिती’च्या सुमारे ४४ शाखा कार्यरत असून साधारणत: २ लाख एवढे उत्पन्न येथील ग्रामीण भागातील कामगार याद्वारे मिळवत आहेत. दलिमी ही अनेक स्त्रियांना स्वत:च्या पायावर उभं करणारी यशस्वी महिला उद्योजिका झाली आहे.  

३) ललिताबाई :

ग्रामीण भागात आजही स्वयंपाकासाठी स्टोव्ह किंवा चूल मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. यामुळे होणाऱ्या धुराचा त्रास महिलांना सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणून कर्नाटकातील हरकरले येथील शेतमजूर ललिताबाई यांनी ‘धूरविरहित स्टोव्ह’ ची संकल्पना मांडली आणि आज त्या या स्टोव्हचा प्रचार करत आहेत. 

बंगळूरच्या इंडियन इंस्टीट्युट ऑफ सायन्सने या स्टोव्हची निर्मिती केली. त्यानंतर ललिताबाई यांनी आपल्या कल्पक बुद्धीने या स्टोव्हमध्ये काही सुधारणा केल्या आणि त्याचे अद्यायावत स्वरूप तयार केले.  आजपर्यंत त्यांनी अशा १००० स्टोव्हची विक्री केली आहे. महिलांची धुरापासून मुक्तता करण्याची त्यांची इच्छा आहे. त्या इतर जिल्ह्यातील महिलांना प्रशिक्षण देण्यासही जातात.

या तिघी भारतीय महिलांच्या प्रतिनिधी आहेत. मात्र, संधी मिळाली तर प्रत्येक भारतीय नारी त्या संधीचे सोने करेलच यात शंका नाही..!
कारण,
मैं भी छू सकती हूं आकाश,
सिर्फ
मौके की है मुझे तलाश…!!
हीच उर्मी प्रत्येक भारतीय स्त्रीच्या मनात आहे!
 

------------------------------------------------------------------------------------------------------
#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’.

राखी कुलकर्णी

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य