Bhartiyans

Menu

५व्या वर्षीच गुडघ्याखालचा पाय तुटलेला तरी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारा भारतीयन, मरिअप्पन थांगवेलू

Date : 08 Feb 2017

Total View : 1066

मरिअप्पन या २१ वर्षांच्या तरुणाने रिओ ऑल्मिपिकमध्ये T-42 या उंच उडी क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला आणि भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. चला, तर पाहुया मरिअप्पनची झंझावाती यशोगाथा..!


सारांश

मरिअप्पन शाळेत जात असताना त्याला भरधाव वेगाने आलेल्या बसने धडक दिली. या अपघातात मरिअप्पनला त्याचा गुडघ्याखालचा पाय गमवावा लागला. व्हॉलीबॉल खेळणाऱ्या त्याला त्याच्या क्रीडा-शिक्षकांनी लांब उडीसाठी प्रोत्साहन दिलं. वयाच्या १४व्या वर्षी लांब उडीच्या स्पर्धेत मरिअप्पन पहिल्यांदा उतरला. २०१३ मधे राष्ट्रीय पॅरा-अॅथलेटिक चॅंपियन स्पर्धेत प्रशिक्षक सत्यनारायण यांनी मरिअप्पनला पाहीलं. त्यांना या मुलामध्ये असलेली चमक दिसली आणि २०१५ मध्ये ते त्याला पुढील प्रशिक्षणासाठी बंगळूरला घेऊन गेले. आणि यानंतर याच मरिअप्पन या २१ वर्षांच्या भारतीय तरुणाने रिओ ऑल्मिपिकमध्ये T-42 या उंच उडी क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला आणि भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं.सविस्तर बातमी

वयाच्या पाचव्या वर्षी अपघातात ज्याचा गुडघ्याखालचा पाय तुटला, तो ऑल्मिपिकमध्ये उंच उडी प्रकारात सुवर्णपदक मिळवू शकतो.....? उत्तर तर सोडाच पण असा प्रश्न विचारण्याचं धाडससुद्धा होत नाही. परंतु, ही सर्वत: अशक्य गोष्ट तामिळनाडूच्या मरिअप्पन थंगवेलुने शक्य करून दाखविली आहे.

मरिअप्पन या २१ वर्षांच्या तरुणाने रिओ ऑल्मिपिकमध्ये T-42 या उंच उडी क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला आणि भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. चला, तर पाहुया मरिअप्पनची झंझावाती यशोगाथा..!  

मरिअप्पनचा जन्म तामिळनाडूमधील सालेम जिल्ह्यातील पेरिवडागंपत्ती या गावात झाला. मरिअप्पन हा सहा भावंडामधला एक मुलगा. त्याच्या वडिलांनी खूप लवकर संसाराचा त्याग केल्याने मरिअप्पनची आई सरोज हिने एकटीने आपल्या सहा मुलांचं संगोपन केलं.

तिने मुलांच्या संगोपनासाठी भाजी विकण्याचं काम केलं. एवढंच नाही, तर शंभर रुपये रोजावर वीटा वाहण्याचं कामसुद्धा केलं. प्रचंड कष्ट करून तिने आपल्या मुलांना घडवलं.

मरिअप्पन पाच वर्षांचा असताना एक घटना घडली. कदाचित या घटनेमुळे एखाद्या मुलाचं आयुष्य थांबलं असतं; पण मरिअप्पनने या घटनेनंतर खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याची सुरुवात केली. जीवनाला एक वेगळं वळण दिलं.

गोष्ट झाली अशी की, मरिअप्पन शाळेत जात असताना त्याला भरधाव वेगाने आलेल्या बसने धडक दिली. या अपघातात मरिअप्पनला त्याचा गुडघ्याखालचा पाय गमवावा लागला. मरिअप्पनचं कुटुंब अजूनही हा खटला न्यायालयात लढतं आहे. या परिस्थितीतसुध्दा मरिअप्पन खचला नाही, हरला नाही. त्याने जिद्दीने आपलं माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं.

तो म्हणतो, की ‘मी स्वतःला इतर सामान्य आणि तंदुरुस्त मुलांपेक्षा वेगळा मानत नाही.’ मरिअप्पन शाळेत असताना व्हॉलीबॉल खेळायचा. त्याच्या क्रीडा-शिक्षकांनी त्याला लांब उडीसाठी प्रोत्साहन दिलं. वयाच्या १४व्या वर्षी लांब उडीच्या स्पर्धेत मरिअप्पन पहिल्यांदा उतरला. त्याचा आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती पाहून अनेकांनी त्याला पाठिंबा देण्यास सुरुवात केली. मरिअप्पनचे नातेवाईक, मित्र, परिचयाचे सर्व लोक त्याच्या पाठीमागे उभे राहिले.


२०१३ मधे राष्ट्रीय पॅरा-अॅथलेटिक चॅंपियन स्पर्धेत प्रशिक्षक सत्यनारायण यांनी मरिअप्पनला पाहीलं. त्यांना या मुलामध्ये असलेली चमक दिसली आणि २०१५ मध्ये ते त्याला पुढील प्रशिक्षणासाठी बंगळूरला घेऊन गेले. तिथे त्यांनी त्याला खेळाचं प्रशिक्षण दिलं आणि दुर्दम्य आत्मविश्वास दिला. मोठं स्वप्न पहायला शिकवलं.

शेवटी तो सोन्याचा दिवस आलाच. ज्या दिवसाचं वर्णन करताना मरिअप्पनचा लहान भाऊ सांगतो, ‘आम्ही ऑलिम्पिकचं थेट प्रक्षेपण पहात होतो. बरोबर २ वाजून ५२ मिनिटांनी माझ्या भावाने सुवर्णपदकाच्या दिशेने झेप घेतली. एक मिनिटासाठी अस वाटलं, की हे स्वप्न आहे. पण नाही ते सत्य होतं. खरं घडलं होतं. माझ्या भावाने आणि आपल्या देशाने सुवर्णपदक मिळवलं होतं. माझा भाऊ व्यासपीठावर सुवर्णपदक घेऊन उभा होता. आम्हाला आणि त्याच्या प्रशिक्षकांना त्याच्यावर विश्वास होता, की तो सुवर्णपदक मिळवेलच.’

मरिअप्पनला सुवर्णपदक मिळाल्यावर त्याच्या ५०० रुपयाच्या भाड्याच्या घरात गावातील लोक अभिनंदन करायला आले, तेव्हा सगळे लोक त्या घरात मावत देखील नव्हते. गावातील लोकांनी फटाके फोडून, मिठाई वाटून आपला आनंद साजरा केला. मरिअप्पनची आई म्हणाली, की माझ्या मुलाला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांची मी खुप आभारी आहे.

‘सरकार माझ्या भावाच्या यशाची दखल घेईल आणि त्याला सरकारी नोकरी मिळेल. त्यामुळे आमच्या कुटुंबाला मदत होईल.’ अशी अपेक्षा मरिअप्पनचा लहान भाऊ कुमार याने व्यक्त केली आहे. ‘पेरिया करुअप्पन जिल्हा खेळ अधिकारी यांनी देखील मरिअप्पनचे अभिनंदन करून त्याला सर्व प्रकारची मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. 

गौरी भावे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

हिंदुस्थान टाईम्स