Bhartiyans

Menu

बोगदा बांधणारी भारतातील एकमेव महिला इंजिनीअर

Date : 09 Feb 2017

Total View : 1430

जिथे मुलभूत सुविधाच नाहीत आणि सोबतीला एकही महिला सहकारी नाही, अशा वातावरणात कोणती महिला काम करेल? ॲनीने मात्र हे आव्हान स्वीकारलं! ती ठरली बोगदा बांधणारी भारतातील एकमेव महिला इंजिनीअर!


सारांश

मेकॅनिकल इंजिनीअर झाल्यावर तिला एमई करण्याची घेण्याची इच्छा होती; पण वडिलांचं निधन झाल्याने नोकरी करणं गरजेचं वाटलं. दिल्ली मेट्रोमध्ये बोगदा बांधण्याचं काम मिळालं. नजर जाईल तिकडे फक्त डोंगर-दऱ्या आणि राडा-रोडा पसरलेला होता, सोबतीला १०० पुरुष सहकारी होते, एकही महिला नाही, अशा वातावरणात तिने बोगदा बांधण्याचं काम सुरू केलं आणि ती ठरली बोगदा बांधणारी भारतातील एकमेव महिला इंजिनीअर!सविस्तर बातमी

बसायला एसी ऑफीस, दिमतीला नोकर-चाकर, ऑफिसची गाडी यांपैकी काही तर सोडाच पण जिथे मूलभूत सुविधा देखील नाहीत; आजूबाजूला फक्त डोंगर, माती, दगड आणि सोबतीला १०० हून अधिक पुरुष सहकारी. नावालासुद्धा महिला सरकारी नाही, अशा वातावरणात कोणती महिला काम करेल? ते कामसुद्धा बोगदा बांधण्याचं!

ॲनी सिन्हा रॉयने मात्र हे आव्हान स्वीकारलं आणि ती ठरली बोगदा बांधणारी भारतातील पहिली व एकमेव महिला इंजिनीअर!         

दिल्ली मेट्रो या सरकारच्या एका महत्वाकांशी उपक्रमावर काम करण्यास जेव्हा ॲनीने सुरुवात केली. तेव्हा तिथे १०० पुरुष काम करत होते. त्यातील काही इंजिनीअर तर काही कामगार होते. मुलभूत सोयी सुविधा तर सोडाच बसायलासुद्धा जागा नव्हती. नजर जाईल तिकडे फक्त डोंगर, दऱ्या, बांधकामाचं साहित्य आणि डांबर राडा-रोडा पसरलेला. 

या आठवणी सांगताना ॲनी म्हणते, रस्ते, बोगदे पूल व इतर पायाभूत सुविधांसाठी एकटा माणूस काम करूच शकत नाही. हे ‘टीमवर्क’ आहे. त्यामुळे मला हे काम कुठेही सुरू असलं, की मला ‘साथी, हाथ बढाना. एक अकेला थक जायेगा, मिलकर बोझ उठाना.’ हे गाणं आठवतं. या क्षेत्रात आजही महिला खूप कमी प्रमाणात आहेत. 

३५ वर्षीय ॲनी सिन्हा रॉय ही बोगद्याचे काम करणारी देशातील पहिली व एकमेव इंजिनिअर आहे.

ती सांगते, की ‘माझे वरिष्ठ व एक जर्मन अधिकारी यांनी मला कामाच्या पहिल्याच दिवशी एका मोठ्या मशीनच्या आत जायला मला सांगितलं. ते मशीन बिघडलं होतं. मी आत शिरले आणि मला काही कळायच्या आतच माझा चेहरा पूर्णपणे हायड्रॉलिक तेलाने माखला गेला. माझे सहकारी मला चिडवू लागले. तुझा चेहरा आता असाच चमकदार रहाणार, सं म्हणू लागले.''  

मे २०१५ ला ॲनीने बंगळूरमधील मेट्रो प्रोजेक्टवर काम करण्यास सुरवात केली. तेथील बोगद्याला ती स्वतःचा बोगदा’ असं म्हणते. कारण तिथे तिने संपूर्ण बोगद्याचं काम केलं आहे. बोगदा खणण्यापासून ते मशीन्स दुरुस्त करेपर्यंतची सर्व कामे केली आहेत. कोणत्याही परीस्थितीत काम थांबू न देणे हा तिचा प्रयत्न असतो. सॅम्पिग रोड ते मॅजेस्टिकपर्यंतचा रस्ता तिने एकटीने तयार केला आहे.

बोगद्यामध्ये दररोज ८ तास काम करणं हा तोंडाचा खेळ नाही; पण हे जिकिरीचं काम देखील तिने खुबीने आणि आवडीने केले. हातात हेल्मेट आणि अंगावर जकेट पाहून लोक तिला विचारात असत की कधी काम काम पूर्ण होईल.  

जुन्या आठवणी सांगताना ॲनी म्हणते, की ‘मेकॅनिकल इंजिनीअर झाल्यावर मला नागपूर विद्यापीठातून एमई करण्याची इच्छा होती; पण त्याच वर्षी माझ्या वडिलांचं निधन झालं. त्यामुळे कुटुंबाकरता नोकरी करणं मला गरजेचं वाटलं. दिल्ली मेट्रोचे सेन्बो यांच्याकडे मला पहिली नोकरी मिळाली. ऑक्टोबर २००७ मध्ये मी कोलकाता सोडून दिल्लीला नोकरीवर रुजू झाले. २००९ मध्ये चेन्नई मेट्रो प्रोजेक्टवर काम करण्यास सुरवात केली. २०१४ च्या सुमारास दोहा येथे ६ महिन्याच्या प्रोजेक्ट वर जाण्याचा योग आला. तत्पूर्वी माझा व्हिसा ३ वेळा अविवाहित ह्या कारणासाठी नाकारण्यात आला होता. पण चौथ्यांदा मी कसून प्रयत्न केले आणि मला कतारला जाता आले.

आधुनिक भारताच्या या अत्याधुनिक चेहेऱ्याला टीम भारतीयन्स’च्या अनेकानेक शुभेच्छा.


 

अनिता घटणेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

टाइम्स ऑफ इंडिया