Bhartiyans

Menu

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्वत:चे घर संपूर्णत: नैसर्गिक साधनांनी बांधणारे केरळचे निसर्गप्रेमी दाम्पत्य !

Date : 15 Feb 2017

Total View : 1333

केरळच्या कुन्नूर जिल्ह्यातील हरी-आशा या निसर्गप्रेमी दाम्पत्याने पर्यावरणपूरक घर बांधलं आहे. या दोघांनी ‘इको फ्रेंडली घरा’चं स्वप्न बघितलं आणि ते साकार देखील केलं. त्यांच्या घराचं नाव आहे 'नवानू'.


सारांश

केरळच्या कुन्नूर जिल्ह्यातील हरी-आशा या निसर्गप्रेमी दाम्पत्याने पर्यावरणपूरक घर बांधलं आहे. निसर्गप्रेम या एकाच धाग्याने ते २००७ साली विवाह बंधनात अडकले. 'नवनू’ या त्यांच्या घराचं वैशिष्ट्य म्हणजे, कितीही उकाडा असला तरी घरात मातीच्या भिंती असल्याने थंडावा राहतो. छतावर ६ सोलर युनिट्स बसवले असल्याने कम्पुटर, फोन, टी.व्ही ही उपकरणे सौर ऊर्जेवर चालतात. वीज बिल केवळ २० रुपये येतं.सविस्तर बातमी

मातीच्या थंडाव्याची अनुभूती देणारं छान कौलारू टुमदार घर... घराभोवती बांबूचं कुंपण... त्यावर सुगंधी फुलांच्या वेली... पक्ष्यांची घरटी व त्यांचा किलबिलाट... अंगणात भाज्यांचे छोटे-छोटे वाफे.. आणि महत्त्वाचं म्हणजे ध्याच्या धकाधकीच्या जीवनापासून, गोंगाटापासून आणिप्रदूषणपासून कोसो दूर असलेल्या एका शांत घरात रहायला आवडेल तुम्हाला? 

तसं म्हणाल तर आजच्या काळात घर ही केवळ प्राथमिक गरज न राहता समाजातील तुमचे स्टेटस ठरवणारी आणि दाखवणारी एक महत्वपूर्ण गोष्ट झाली आहे. एक साधन झालं आहे. तुमचं घर शहराच्या कोणत्या भागात आहे, कसं आहे, किती मोठं आहे, घरात किती सोयी आहे यावरून तुमच्याबद्द्लचा विचार लोक करतात.

प्रगती, अत्याधुनिकता या नादात आपण मूळ शांतता हरवून गेलो आहोत. निसर्गाने आपल्याला जे दोन्ही हातांनी भरभरून दिलं आहे, त्याचा खरा आनंद कृत्रिमतेत आपण घेतच नाही आहोत.

तुम्ही म्हणाल शांत निसर्गरम्य घरात राहायला आवडेल नक्कीच, खूप आवडेल हो, पण असं घर आज या सिमेंटच्या जंगलात कुठे सापडेल..?

खरंय, अशी घरं सापडत नसतात. ती बांधावी लागतात. केरळचे हरी आणि शा यांनी असंच पर्यावरणपूरक आणि सुंदर घर बांधलं आहे.

चला, आज त्यांच्या घराची सफर करूया...!!  

ये तेरा घर, ये मेरा घर, किसीको देखना हो गर

तो  पहले मांग ले, तेरी नजर मेरी नजर..! 

केरळच्या कुन्नूर जिल्ह्यातील हरी आणि आशा यांचे घर पाहिल्यावर आपल्याला याच ओळी आठवतात. 

हरी आणि अशा यांनी पर्यावरणालापूरक असे नैसर्गिक घर बांधलं आहे.

हरी पाटबंधारे विभागात नोकरीला आहेत तर आशा स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या शिक्षिका आहेत. आता त्या स्थानिक शेतकऱ्यांना ऑरगॅनिक शेतीचे प्रशिक्षण देतात. हे दोघेही निसर्गप्रेमी आहेत. या एका धाग्याने त्यांना २००७ साली लग्नाच्या बंधनातसुद्धा बांधले.

या दोघांनी इको फ्रेंडली घरा’चं स्वप्न बघितलं होतं आणि ते साकार देखील केलं. त्यांच्या घराचं नाव आहे 'नवानू

आशा असं सांगतात, की सिमेंट, लोखंड, स्टील वापरायचं आणि शेतात घर बांधायचं, असं केल्याने घर नैसर्गिक होत नाही. पक्ष्यांकडे पहा. ते संपूर्णत: नैसर्गिक साधने वापरून घरटी बनवतात. त्याला नैसर्गिक घर म्हणतात. आम्ही तसंच करायचं ठरवलं. आम्ही केवळ मातीने आमचं घर तयार केलं आहे. निसर्गाकडून जितकं कमीत कमी घेता येईल तेवढच घ्यावं, असं आम्हाला वाटतं.

२००९ मध्ये त्यांनी हे ९६० चौरस फुटाचं घर बांधलं. गंमत म्हणजे, घर बांधण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा खर्च आला रुपये ५० हजार आणिकामगारांच्या मजुरीचा खर्च आला अडीच लाख रुपये. अशा पद्धतीने संपूर्ण घर बांधायला त्यांना केवळ ४ लाख रुपये एवढा खर्च आला.

या घराचं वैशिष्ट्य म्हणजे, बाहेर कितीही उकाडा असला तरी घरात मातीच्या भिंती असल्याने थंडावा असतो. घरात जास्तीत जास्त सूर्यप्रकाशयेईल, अशी घराची रचना आहे. घराच्या छतावर ६ सोलर युनिट्स बसवले आहेत. महिन्याभरात त्यांना केवळ ४ युनिट्स एवढीच वीज लागते. त्यामुळे वीज बिल महिन्याला केवळ २० रुपये इतकंच येतं.

याचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे, आशा आणि हरी यांच्या फ्रीझ, एसी ही उपकरणे नाहीत. गरज म्हणून ते कम्पुटर, फोन, टी.व्ही. वापरतात; पण ही सर्व उपकरणे सौर ऊर्जेवर चालतात.

स्वतःसाठी लागणाऱ्या भाज्या, फळे ते स्वतः अंगणात पिकवतात. या भाज्या ताज्या राहण्यासाठी त्यांनी एक विशेष फ्रीज बनवलं आहे. हे फ्रीजविजेवर चालत नाही. जमिनीखाली एक मोठा खड्डा खणून त्यात वाळू भरली जाते व त्या वाळूत एक मातीचे भांड ठेवलं जातं. या भांड्याच्या आजूबाजूची जागा ते कायम ओलसर ठेवता. यामुळे आतील भांड्याचं तापमान कायम १० अंश सेल्सिअसच्या खाली राहतं. या भांड्यात भाज्याफळे एक आठवड्यापर्यंत ताजे राहतात. ही पद्धत मोहन्जोदडोच्या काळापासून प्रचलित आहे.

हरी आशाच्या घरात गॅस कनेक्शनसुद्धा नाही. घरातील कचरा व इतर घन कचऱ्याचा उपयोग करून ते बायोगॅस तयार करतात व त्याचा उपयोग स्वयंपाकासाठी होतो. कचऱ्यापासून ते खत तयार करतात व त्याचा उपयोग ऑरगॅनिक शेतीसाठी करतात.

संपूर्णत: निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यामुळे आणि नैसर्गिक अन्नच खाल्ल्याने रोगराई त्यांच्यापासून लांबच आहे. हरी सांगतात,गेल्या १७वर्षांत मी दवाखान्यात गेलेलो नाही. छोटे-छोटे आजार आयुर्वेदिक वनस्पतींमुळे बरे होतात." 

शा आणि हरी त्यांच्या गावातील लोकांना पण निसर्गाचे महत्व समजावून सांगत आहेत. शेतीसाठी रसायनांचा वापर न करण्याचा सल्ला देत आहेत. नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देत आहेत.

आशा आणि हरीसारखा विचार जर प्रत्येक दाम्पत्याने घर बांधताना केला आणि कृत्रिमतेला दूर सारलं तर नक्कीच निसर्गाची कमीतकमी हानी होईल व पर्यावरणाचा समतोल साधला जाईल.

 


#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020.

वैशाली सागर - देवकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य