Bhartiyans

Menu

आय.आय.एम. कोलकातानंतर गलेलठ्ठ पगाराची नोकरी नाकारून,तिने स्वीकारले ग्रामीण भागातील विद्यार्थांना शिकवण्याचे व्रत !

Date : 02 Mar 2017

Total View : 1096

आय.आय.एम.कोलकातामधून बाहेर पडलेल्या पूजा मिश्राने नोकरी नाकारून पुरसी नावाच्या खेडेगावात ‘गुरुकुल’ ही शाळा सुरू केली. केवळ 23 विद्यार्थ्यांसह सुरु झालेल्या या छोट्या शाळेत आज ९७० हून अधिक विद्यार्थी आहेत.


सारांश

उत्तम शिक्षण आणि त्यानंतर ‘लाईफ’ सेट होईल अशी उत्तम नोकरी मिळवणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र, आय.आय.एम.कोलकातामधून बाहेर पडलेल्या पूजा मिश्राचं स्वप्न एवढं साधं नव्हतं. तिने नोकरी नाकारून उत्तर प्रदेशच्या रायबरेली येथील पुरसी नावाच्या खेडेगावात २०१२ मध्ये स्वबचतीतून ‘गुरुकुल’ ही शाळा सुरू केली. केवळ 23 विद्यार्थ्यांसह सुरु झालेल्या या शाळेत आज ९७० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.सविस्तर बातमी

उत्तम शिक्षण आणि त्यानंतर ‘लाईफ’ सेट होईल अशी उत्तम नोकरी मिळवणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं.

आई-वडिलांच्या कष्टांचं चीज व्हावं आणि आपल्याला आयुष्यात काहीतरी करून दाखवता यावं याउद्देशाने

प्रचंड मेहनत करून अभ्यासाचे डोंगर उपसल्यानंतर जेव्हा विद्यार्थ्याला त्याच्या आवडीच्या, नामांकित

महाविद्यालयात प्रवेश मिळतो आणि तावून सुलाखून उत्तम गुणांसह बाहेर पडताना कॅम्पस प्लेसमेंटमध्येच

गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाते, तेव्हा विद्यार्थी आणि त्याच्या पालकांना आयुष्याचं सार्थक झालं, असं

वाटतं.

मात्र, ‘याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा’ असा हा छान नोकरीचा दिवस आल्यानंतर

जर तो मुलगा किंवा मुलगी नोकरी नाकारू लागला तर? तो चौकट मोडून चाकोरीबाहेरची वाट चालू

लागला तर..? तर, सगळ्यांनाच धक्का बसेल. काहींना वेडेपणासुद्धा वाटेल!

आय.आय.एम. कोलकातामधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या पूजा मिश्राने नोकरी नाकारून खेडेगावात

गरीब विद्यार्थ्यांसाठी एक शाळा सुरू करण्याचं ठरवलं, तेव्हासुद्धा सर्वांना हा तिचा वेडेपणा वाटला. उत्तर

प्रदेशची पूजा मिश्रा. एक असा हिरा ज्याने स्वत:च्या प्रकाशाने केवळ स्वत:चे घर नाही तर समाजातील

अनेकांची आयुष्ये उजळवण्याचा प्रयत्न केला!

आपण ठरविले तर आजूबाजूला सकारात्मक बदल कसा घडवून आणू शकतो. याचे जिवंत उदाहरण म्हणजे

पूजा मिश्रा. आय.आय.एम. कोलकाताच्या कॅम्पस प्लेसमेंटमधून मिळणाऱ्या गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीला

रामराम ठोकल्यानंतर उत्तर प्रदेशच्या रायबरेली येथील पुरसी नावाच्या छोट्या गावात २०१२ मध्ये तिने

स्वबचतीतून ‘गुरुकुल’ ही शाळा सुरू केली. केवळ 23 विद्यार्थ्यांसह सुरु झालेल्या या छोट्या शाळेत आज

९७० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

आज देशात मुलांना शिक्षण देणं नोकरी करणाऱ्या मध्यमवर्गीय पालकांनासुद्धा जड जातं तिथे वंचितांची

अवस्था काय असणार?? खेड्यापाड्यातील गरजू, होतकरू मुलांना चांगलं शिक्षण मिळावं कारण

त्यांच्यातही आपलं आयुष्य बदलण्याची तितकीच ताकद असते या तळमळीने पूजाने स्वतः प्रयत्न करायचे

ठरवले. पूजा म्हणते, “भारतासारख्या मोठ्या देशात, जिथे सरकारला देखील उच्च दर्जाचे शिक्षण सर्वांपर्यंत

पोहोचवणे अवघड जाते आहे, तिथे खेड्यापाड्यातील मुलांना या शिक्षणापर्यंत आणणे ही उद्याचा भारत

घडण्यातील मोठी अडचण आहे.”

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून मोफत शिक्षण मिळावं यासाठी पूजाने ‘गुरुकुल पब्लिक

स्कूल’ या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. इतर शाळांमधून दिल्या जाणाऱ्या शिक्षणापेक्षा ‘गुरुकुल’मध्ये

काहीतरी वेगळे देण्याचा-शिकवण्याचा प्रयत्न असतो. धर्म, जात, पात, वर्ण अशा सर्व भिंती ओलांडून

मुलांना मोफत शिक्षण देण्याचा तिचा प्रयत्न नक्कीच उल्लेखनीय आहे. पूजाला आय.आय.टी. आणि

आय.आय.एम.मधील तिच्या मित्र-मैत्रिणींचा खूप पाठिंबा लाभला. मदत मिळाली. त्यांनी केवळ तिच्या

शाळेला आर्थिक मदत न करता, त्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक म्हणून देखील काम केलं. यामुळे मुलांची

प्रगती तर झालीच, शिवाय कोणीही शिक्षण अर्ध्यात सोडलं नाही.

पूजाने स्वतःला या ध्येयासाठी पूर्णत: झोकून दिले आहे. तिने यासाठी तिच्या आयुष्यात आलेली

सुवर्णसंधी देखील नाकारली. पूजा त्या अत्यंत निवडक ७ जणांपैकी एक होती ज्यांना इंडियन लीडरशिप

इंस्टीट्युट व नॉलेज इज पावर प्रोग्रामतर्फे प्रशिक्षण दिलं जाणार होतं; पण, तिने ‘गुरुकुल’ हेच एकमेव

ध्येय मानलं.

 

आपल्या उपक्रमाबद्दल पूजा खूप उत्साहाने बोलते. ती म्हणते, “इथे केवळ उच्च दर्जाचे इंग्रजी माध्यमाचे

शिक्षण मोफत दिले जात नाही, तर या मुलांना त्यांच्या मार्गदर्शकांकडून जगभरातील संधींची ओळख

करून दिली जाते.” गुरुकुलमध्ये प्रत्येक मुलाला अनेक संधी उपलब्ध करून दिल्या जातात. त्याच्या

आवडीनुसार, कलानुसार तो या संधींचा उपयोग करून दारिद्र्य, निरक्षरता या सगळ्यापासून लांब जाऊ

शकेल. गुरुकुलमध्ये प्रत्येकाला सक्षम समजले जातं. सुरुवात जरी अडखळत झाली तरी लवकरच आपण

आत्मविश्वासाने जगातील इतर मुलांसारखेच पुढे जाऊ शकतो, असा विश्वास त्यांना दिला जातो.

शाळेतही न गेलेली मुले जेव्हा १२वी पास होतात. तेव्हा त्यांचा आनंद अवर्णनीय असतो. त्यांचा

आत्मविश्वास जागविणारा असतो आणि त्याच्याच बळावर ते आपले करियर घडवू शकतात. त्यांना सबळ

करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांना अनेक उत्तमोत्तम संधी उपलब्ध करून त्यातून निवड करू द्यावी.

आमचे प्रयत्न केवळ शिक्षणाच्या संधीपुरते मर्यादित नसून त्यांना कला, खेळ, इ.मध्ये देखील आवड

निर्माण व्हावी आणि त्यांनी त्यात कौशल्य मिळवावेब असे असल्याचे पूजा आवर्जून नमूद करते.

आपल्या प्रवासाबद्दल पूजा म्हणते, “मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आहे. माझे कुटुंबिय अजूनही

ग्रामीण भागात राहतात. नशीब चांगले होते म्हणून मला लखनऊसारख्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेण्याची

संधी मिळाली. त्यानंतर मला इन्फोसिससारख्या कंपनीमध्ये काम करण्याची संधी देखील मिळाली. त्यामुळे

मी अमेरिकेला देखील जाऊन आले. मात्र, मला सतत ग्रामीण आणि शहरी भागातील संधी यामधील दरी

सतावत होती. माझे आयुष्य आणि माझ्या इतर भावंडांचे आयुष्य यात खूप तफावत होती. मी शिकत

असताना माझ्या इतर भावंडांची लहान वयात लग्ने झाली होती. मला पहिली नोकरी लागेपर्यंत त्यांना मुले

देखील झाली. मी खूप विचारात पडले आणि मला जाणीव झाली, की माझे आयुष्य या सर्वांपासून वेगळे

असण्यामध्ये ‘शिक्षण’ या एकाच गोष्टीचा किती मोठा वाटा आहे. माझ्या गावातील मुले त्यांचे शिक्षण

पूर्ण करू शकत नाहीत, कारण तिथे पदवीचे शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालय नाही. म्हणून, मी माझे

आय.आय.एम.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कॉर्पोरेट जगतात परत जाऊ इच्छित नव्हते. मला गावातील

मुलांसाठी शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध करून द्यायच्या होत्या. मी जर त्यांच्या आयुष्यात काही

सकारात्मक बदल घडवू इच्छिते, तर ते त्यांच्या शालेय शिक्षणादरम्यानच केले पाहिजे, असे मला वाटले.”

पूजाच्या या विचारांबद्दल तिचे करावे तितके कौतुक थोडेच आहे. तिचा हा प्रवास सोपा नक्कीच नव्हताच.

चांगल्या कामात अडथळे येतातच. तिने सुरुवातीला अगदी कमी म्हणजे केवळ ५० रुपये प्रतिमहिना शुल्क

ठेवले होते, परंतू, अनेक पालक असेही होते की त्यांना ते देखील देणे शक्य नव्हते. चांगली शाळा इतके

कमी शुल्क आकारून देखील चालविता येत नाही. खर्च वाचवण्यासाठी पूजा स्वतःच सगळे वर्ग घेत असे.

तरीही, तिच्या अपेक्षेप्रमाणे तिच्या शाळेला प्रतिसाद मिळत नव्हता. आपले हे स्वप्न केवळ आर्थिक

कमतरतेमुळे धुळीला मिळेल का काय अशी भीती तिला वाटू लागली. यावर शेवटचा उपाय म्हणून तिने

तिच्या आय.आय.एम. कोलकाताच्या सहकारी मित्रांना मदतीची हाक मारली. त्यांनी तिला उत्तम पाठींबा

दिला आणि मदतीचा ओघ सुरु झाला. त्यानंतर मात्र तिने पुन्हा मागे वळून पाहिले नाही.

पूजाच्या मते, अत्यंत लाजाळू असलेल्या एखाद्या विद्यार्थिनीने स्टेज वर जावून ‘थँक यू’ म्हणणं आणि

हळूहळू वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणं, हा आमच्यासाठी विजयाचा क्षण असतो. आमचे विद्यार्थी जेव्हा

जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत यशस्वी होतात, तो आमच्यासाठी आनंद असतो. या छोट्या छोट्या

यशाच्या पायऱ्याच तिला पुढेपुढे चालत राहण्याची उर्जा देतात.

पूजाला येत्या १५ वर्षात एक आदर्श मॉडेल राबवायचे आहे. २०२० पर्यंत पुरसी गावातील शाळेत १०,०००

मुलांना आणायचे आहे आणि जागतिक दर्जाची शाळा सुरू करण्यासाठीचे तिचे प्रयत्न सुरु आहेत. प्रत्येक

मुलाला यशाची संधी मिळेल तेव्हाच गुरुकुल यशस्वी होईल, असे तिचे म्हणणे आहे.

खरच, भारत हा हजारो वर्षांपासून शिक्षणाच्या बाबतीत अग्रेसरच होता. इंग्रजी राजवटीनंतर झालेली

पीछेहाट, पूजा सारख्या असंख्य सकारात्मक उर्जेने आणि देशप्रेमाने भारलेल्या तरुण पिढीमुळे भरून

निघेल आणि भारत पुन्हा एकदा सर्व बाबतीत सुवर्णभूमी म्हणून गौरविली जाईल, असा विश्वास नक्कीच

पूजासारख्या हुशार-उत्साही- देशप्रेमी तरुणाईला पाहिल्यावर आपल्याला वाटतो.

पूजाप्रमाणेच आजही अनेक जण मदतीच्या प्रतिक्षेत आहेत व पाठींबा न मिळाल्याने त्यांची स्वप्ने अपूर्ण

राहत आहेत. आपण शक्य होईल तेवढं आणि शक्य होईल तिथे आपल्या अशा भारतीय बंधू–भगिनींच्या

पाठीशी उभे राहण्याचा निर्धार करूया! जय हिंद!


#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020 .

मृणाल काशीकर- खडक्कर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य