Bhartiyans

Menu

ज्याच्या घरात वीजच नव्हती, त्याने ‘बुलेट’द्वारे वीजनिर्मिती केली. पहा-वाचा, विश्वास ठेवा, तुम्ही देखील हे करू शकाल !

Date : 22 May 2017

Total View : 617

ज्याच्या घरात वीज नाही, जो माणूस शास्त्रज्ञ-अभियंता नसून महापालिकेचा वाहनचालक आहे, त्याने ‘बुलेट’च्या माध्यमातून वीजनिर्मिती केली, यावर तुम्ही विश्वास ठेवाल? ठेवावाच लागेल. केरळच्या एका सुपुत्राने ही किमया केली आहे.


सारांश

केरळमधील पलाक्कड जिल्ह्यातल्या कल्लाडीकोडे गावातील हरिनारायण यांनी ‘बुलेट’च्या माध्यमातून वीज निर्माण केली आहे. ते केएसआरटीसीमध्ये वाहनचालक आहेत. हरिनारायण यांनी पाण्याचा पंप, डायनामो आणि बुलेटच्या साहाय्याने वीज निर्मिती केली. बुलेट सुरू करून एकाच जागी उभी करून पूर्ण वेगात रेस केल्यावर एक लीटर डीझेलमध्ये एका घराला एक दिवस पुरेल एवढी वीज निर्माण होते. यासाठी बुलेटचं इंजिन एक तास सुरू ठेवावं लागतं.सविस्तर बातमी

‘इस बुलेट की ‘सवारी’ मत किजीये, वरना आपमें भी बिजली आ सकती हैं’.. कसं अगदी फिल्मी वाटतं ना हे वाचायला; पण केरळमधील एका अवलियाच्या बुलेटकडे बघून त्याच्या गावातील मंडळी हे वाक्य नक्कीच म्हणत असणार..!

ज्याच्या घरात वीज नाही, अशा माणसाने वीजनिर्मितीचं रोलमॉडेल तयार केलं. शिवाय तो माणूस शास्त्रज्ञ-अभियंता नाही; तर महापालिकेत वाहनचालक आहे आणि आश्चर्य म्हणजे त्याचं रोलमॉडेल हे कोणतंही विशिष्ट यंत्र नसून ‘बुलेट’ गाडी आहे, यावर तुम्ही विश्वास ठेवाल? ठेवावाच लागेल. कारण, केरळच्या एका सुपुत्राने ही किमया केली आहे.

केरळमधील पलाक्कड जिल्ह्यातल्या कल्लाडीकोडे गावातील पुल्लपत्ता किझ्हकेकरा पूथेनवीत्तल हरिनारायण यांनी त्यांच्या ‘बुलेट’ या दुचाकीच्या माध्यमातून वीज निर्माण केली आहे. हरिनारायण हे केएसआरटीसी (केरला स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन) मध्ये चालक आहेत. खरं तर, वीज असली आणि नसली काय, भारनियमन झालं किंवा नाही झालं काय, यामुळे हरिनारायण यांना काहीही फरक पडत नाही. कारण, त्यांच्या घरात वीजच नाही. असं असताना देखील त्यांच्या अभिनव कल्पनेमुळे गावासमोर वीज निर्मितीचा नवा पर्याय निर्माण झाला आहे., हे मात्र खरं.

हरिनारायण यांनी पाण्याचा पंप आणि डायनामो (विद्युतजनित्र- मेकॅनिकल एनर्जीचं इलेक्ट्रिसिटीमध्ये रुपांतर करणारं यंत्र) यांच्या साहाय्याने वीज निर्मिती केली आहे. बुलेट सुरू करून एकाच जागी (मेन स्टॅन्डवर) उभी करायची आणि तिला पूर्ण वेगात रेस करायचं, असं केल्यावर एक लीटर डीझेलमध्ये एका घराला एक दिवस पुरेल एवढी वीज निर्माण होऊ शकते. यासाठी बुलेटचं इंजिन एक तास सुरू ठेवावं लागतं.   

हरिनारायण यांच्या या अनोख्या आणि उपयुक्त बुलेटचा फायदा त्यांच्या गावातील अनेकांना होतो आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यावर घरात लाईट लावण्यासाठी, पाण्याची टाकी भरण्यासाठी, विहिरीतून पाणी उपसण्यासाठी त्यांच्या बुलेटचा उपयोग अनेक ग्रामस्थ करतात. यासाठी साधारण, ३००० रुपये खर्च हरिनारायण यांना येतो आणि ग्रामस्थ तो खर्च करतात.

सुप्रसिद्ध उद्योजक स्व. भवरलालजी जैन यांनी ‘कल्पना कणापरी, ब्रह्मांडाचा भेद करी’ हे ब्रीद त्यांच्या कंपनीच्या समुहासाठी स्वीकारलं होतं. दहावीची परीक्षाही उत्तीर्ण न झालेल्या हरिनारायण यांची ही अभिनव कल्पना पाहिल्यावर याच ब्रीदवाक्याची प्रचिती येते.    


#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020.

मयूर भावे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

बेटर इंडिया