Bhartiyans

Menu

देशातील प्रमुख १०० रेल्वे स्थानकांवर उभारले जाणार ‘स्तनपान कक्ष’, माता व बालकांसाठी रेल्वे मंत्रालयाने घेतला स्त्युत्य निर्णय !

Date : 13 Jul 2017

Total View : 880

महिला व बालविकास मंत्रालयाच्या विनंतीनुसार देशातील प्रमुख १०० रेल्वेस्थानकांवर आई व बाळासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या कशात माता बालकांना स्तनपान करू शकणार आहेत.


सारांश

लहान बाळाला घेऊन प्रवास करणं ही आई-वडिलांचीच परीक्षा असते. यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग येतो तो ‘स्तनपाना’चा. रेल्वे स्थानकावर खूप वेळ थांबण्याचा प्रसंग आला आणि बाळ रडू लागलं तर बाळाला दूध पाजणं आईला शक्य होत नाही. यावर उपाय म्हणून देशातील प्रमुख १०० रेल्वेस्थानकांवर स्वतंत्र कक्ष तयार करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या कशात माता बालकांना स्तनपान करू शकणार आहेत.सविस्तर बातमी

लहान बाळाला घेऊन प्रवास करणं ही आई-वडिलांचीच परीक्षा असते. लहान बाळ सोबत असेल तर प्रवासात खूप गोष्टी बदलतात. त्यादृष्टीने सगळं नियोजन करावं लागतं आणि व्यवस्थाही ठेवावी लागते. बाळाचं खाणं-पिणं, औषधं, कपडे सगळंच पाहावं लागतं. यामध्येच सर्वात महत्त्वाचा भाग येतो तो ‘स्तनपाना’चा. बाळाचं पोषण ज्यातून होतं ते आईचं दूध...! प्रवासात ते कसं देणार?

गर्दी, आवाज, प्रवासात होणारी भांडणं, अस्वच्छता अशा अनेक कारणांमुळे अनेकदा आईला बाळाला दूध पाजणं शक्य होत नाही. रेल्वे यायला उशीर झाला किंवा अन्य काही कारणांमुळे रेल्वे स्थानकावर खूप वेळ थांबण्याचा प्रसंग आला आणि त्यातच बाळ भुकेने व्याकूळ होऊन रडू लागलं; तरी मोकळी जागा आणि शांतता नसल्याने बाळाला दूध पाजणं आईला शक्य होत नाही, अशा वेळी महिलांना अवघडल्यासारखंही होतं. यावर उपाय म्हणून रेल्वे मंत्रालयाने अत्यंत स्त्युत्य निर्णय घेतला आहे.

देशातील प्रमुख १०० रेल्वेस्थानकांवरील प्रतीक्षालयात आई व बाळासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या कशात माता त्यांच्या बालकांना स्तनपान करू शकणार आहेत. महिला व बालविकास मंत्रालयाने केलेल्या विनंतीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार संबंधित रेल्वे स्थानकांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी याबाबत रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना पत्र लिहिले होते. या पत्राद्वारे गांधी यांनी स्तनपानाचे महत्त्व अधोरेखित करत महिलांची अडचण प्रभू यांच्यासमोर मांडली आहे.

त्या म्हणतात, “आईचं दूध हे बाळाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. खूप वेळ रेल्वे स्थानकावरच थांबण्याचा प्रसंग येतो, तेव्हा मात्र आई बाळाला दूध पाजू शकत नाही. तिला कपडे बदलायचे असल्यास ती तेही करू शकत नाही. कारण, रेल्वे स्थानकावर तशी सुविधा, स्वतंत्र जागा नाही. यासाठी प्रतीक्षालयात स्वतंत्र कक्ष उभारले जावे. लवकरच, ही सुविधा देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर सुरू होईल असा मला विश्वास आहे.”

लहान बाळ आणि मातांची होणारी अडचण लक्षात घेऊन भारत सरकारने घेतलेल्या या महत्त्वाच्या व गरजेच्या निर्णयासाठी आम्ही सर्व ‘भारतीयन्स’ सरकारला धन्यवाद देतो! आभार मानतो!


#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in hisMission 2020.

मयूर भावे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

टाईम्स ऑफ इंडिया