Bhartiyans

Menu

“मी जे भोगलं ते माझ्या सुनेने भोगू नये असं मला वाटतं” आंध्रप्रदेशातील एक सासू!

Date : 07 Nov 2016

Total View : 402

आंध्रप्रदेशातल्या एका सासूने, सुनेला लग्न होण्यापूर्वीच शौचालय बांधून दिले. जे हाल घरात स्वच्छतागृह नसल्याने त्यांनी आयुष्यभर सहन केले ते सुनेच्या वाट्याला येऊ नयेत म्हणून हे पाऊल त्यांनी उचलले.


सारांश

बोल्लावरम या गुंटूर जिल्ह्यातल्या गावात पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या 'स्वच्छ भारत' मोहिमेंमुळे प्रभावित झालेल्या एसके शमसान या सासूने सलमा या आपल्या सुनेसाठी ही आयुष्याचा स्तर उंचावणारी ही अमरणीय भेट दिली.सविस्तर बातमी

 

मी जे भोगलं ते माझ्या सुनेने भोगू नये असं मला वाटतं....
#Bharatiyans

 

आंध्र प्रदेशातल्या एका सासूने आपल्या सुनेला लग्न ठरल्यावर आणि होण्यापूर्वीच एक शौचालय आग्रहाने बांधून दिले.

 

\\"जे हाल आणि जी मानहानी घरात स्वच्छतागृह नसल्याने मी उभ्या आयुष्यभर सहन केली ती अवस्था माझ्या सुनेची होऊ नये म्हणून हे पाऊल मी टाकले आहे. इतरवेळी सोडा पावसाळ्यात तर नैसर्गिक विधींसाठी बाहेर उघड्यावर जायला लागणे ही आत्यंतिक अवहेलना माझ्यासारख्या महिला वर्षानुवर्षे कश्या सहन करतात हे मी बोलू सुद्धा शकत नाही पण माझ्या सुनेला मात्र या अवस्थेत मला घरात आणायचे नाही आणि म्हणून माझ्या सुनेला मी ही भेट देते आहे.

 

बोल्लावरम या गुंटूर जिल्ह्यातल्या गावात पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या \\'स्वच्छ भारत\\' मोहिमेंमुळे प्रभावित झालेल्या एसके शमसान या सासूने सलमा या आपल्या सुनेसाठी ही आयुष्याचा स्तर उंचावणारी ही अमरणीय भेट दिली.

 

\\"माझ्या वडलांच्या घरी आणि माझ्या सासरी सुद्धा मला ही सोय, ही गरज कधीच उपलब्ध होऊ शकली नाही. विशेषतः दुबई इथे राहत असलेल्या माझ्या दूरच्या नातेवाईकाने जेव्हा माझ्या घरी ही सोय नाही असे ऐकल्यावर माझ्याकडे येणे रहित केले. तेव्हा या गोष्टीची मला खूप वाईट वाटले.\\" शमसान म्हणाली.

 

शेवटी तिच्या घराला पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या \\'स्वच्छ भारत अभियान\\' स्कीम अंतर्गत हे शौचालय मिळू शकल. जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या मिटींग्जना उपस्थित राहिल्यावर तिला या अभियानाची आणि शासनाने देऊ केलेल्या निधीरूपी मदतीची तिला कल्पना आली.

 

आता शमसानने आपल्या मुलाच्या लग्नाआधीच हे सुनेला उघड्यावर जाण्याचे प्रकरण थांबवण्यासाठी पुढाकार घेतला. स्वतःचे ४००० रुपये आणि भारत सरकारच्या \\'स्वच्छ भारत अभियान\\' स्कीम अंतर्गत मिळालेली आर्थिक मदत यांच्या सहाय्याने तिने शौचालय बांधून घेतले.

 

\\"मला माझ्या सुनेचे आरोग्य धोक्यात आणायचे नव्हते.\\" आपल्या सलमा या आता प्रेग्नंट असणाऱ्या सुनेविषयी काळजी व्यक्त करताना शमसान म्हणाली. 
\\"सलमाच्या माहेरच्या लोकांना सुद्धा असेच एक शौचालय बांधून घेण्याची विनंती मी आता केली आहे.\\" ती पुढे म्हणाली.

 

उघड्यावर शौचास जाणे हे लोकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण करणारा विषय आहे आणि म्हणून लोकांचे या बाबत मतपरिवर्तन करून ग्रामीण लोकांना या संदर्भात आर्थिक मदत सुद्धा करणे आणि या देशातल्या मोठ्या समस्येचे निराकरण करणे हे पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या \\'स्वच्छ भारत अभियान\\' या मिशनचे एक महत्वाचे उद्दिष्ट्य आहे.

 

सासू-सुनेच्या या नात्याला आणि \\'स्वच्छ भारत अभियान\\' मिशनच्या आगामी सर्व अभियानांना \\'टीम भारतीयन्स\\' तर्फे मन:पूर्वक शुभेच्छा.

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य