Bhartiyans

Menu

तंबाखू आणि गुटख्याच्या विरोधातील एकाकी लढा

Date : 07 Nov 2016

Total View : 382

तंबाखू आणि गुटख्याच्या विरोधातील एकाकी लढ्याचा शिलेदार : ओरिसा चा इमरान अली


सारांश

तंबाखू आणि गुटख्याच्या विरोधात एकटाच प्राणपणाने, भक्कमपणे उभा राहिला ओरिसातला इमरान अली....‘नशा मुक्ती युवा संकल्प’ चा संस्थापक, 'ब्लडी गुटखा' पुस्तकाचा लेखक याचा तरुण मुलांना गुटखा, ड्रग्स, ई च्या व्यसनापासून दूर नेण्याचा अथक प्रयत्न आणि 'व्यसनमुक्ती' हेच ज्याचे व्यसन आहे अशा इमरान अली ची प्रेरणादासविस्तर बातमी

कुठलीही लढाई ही नेहेमीच एकट्यानेच सुरु करावी लागते,
हळूहळू लोक येऊन जोडले जातात आणि नंतर मात्र यश हमखास मिळतच जाते....

तंबाखू आणि गुटख्याच्या विरोधात एकटाच प्राणपणाने, भक्कमपणे उभा राहिला ओरिसातला इमरान अली.... 
#Bharatiyans

या त्याच्या लढाईच्या विरोधात जीवाची पर्वा न करता दंड ठोकून उभा राहिलेला इमरान अभिमानाने सांगतो,

”माझी आणि माझ्या ग्रुपची या तंबाखू आणि गुटख्याच्या विरोधातली लढाई ही सुद्धा एकप्रकारचे व्यसनच आहे जे आम्ही या देशातल्या तरुणीच्या अयायुष्याची धूळधाण उडवणाऱ्या व्यसनाच्या विरोधात उघडले आहे. 
याचसाठी आम्ही आता रोज एक तास आणि एक रुपया देशासाठी आणि देशातल्या तरुणाईला या विखारी विळख्यातून बाहेर काढण्यास देणार आहोत.” इमरान सांगतो.

‘मास्टर इन सोशलवर्क’चा अभ्यास करत असताना इमरान एकदा फिल्ड व्हीझीट साठी तो भुवनेश्वर येथील एका झोपडपट्टीत, शांतीपली येथे गेला होता. तिथे गेल्यावर त्याला एक जबरदस्त धक्का तेव्हा बसला जेव्हा त्याने पाहिलं की दहा-बारा वर्षांची लहान लहान मुले सुद्धा तिथे गुटख्याच्या व्यसनाने ग्रस्त आहेत.

यांनतर जेव्हा त्याने अजून शोध घेतला तेव्हा त्याला आढळून आले कि बाजारात गुटखा आणि तंबाखूचे तत्सम पदार्थ सर्वत्रच सहजपणे उपलब्ध आहेत. आणि लहानमुलांच्या आई-वडलांच्याअथवा पालकांच्या बेफिकिरीमुळे लहान मुलांना हे सगळंच मृत्युचं समान सहजच उपलब्ध होते आहे.

गुटख्याचे हे व्यसन पुढे जाऊन मोठ्या व्यसनांमध्ये म्हणजे दारू, ड्रग्ज इत्यादी मध्ये वाहवत जाऊ शकते आणि याच वास्तविकतेने इमरानला मुळापासून हादरवून सोडले आणि या विरोधात जीवाची पर्वा न करता उभे राहण्यास प्रवृत्त केले.

या सर्वप्रकाराची इतकी खोल जखम इमरानच्या मनावर झाली कि या संदर्भात “Bloody Gutka” नावाचे एक पुस्तक सुद्धा लिहून प्रकाशित केले त्याने ज्यामध्ये तंबाखू आणि तत्सम पदार्थांच्या सेवनाने शरीर आणि पर्यायाने आयुष्यावर होणाऱ्या भयंकर परिणामांना त्याने सोदाहरण समोर आणले.

यानंतर त्याने त्याच्या मित्रांसोबत मिळून या अश्या झोपडपट्टी मध्ये या विषाच्या विरोधात जागरूकता आणि जाणीव निर्माण करण्याचे कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली.

असे करता करता त्याने अश्याच आणि याच विचारांनी प्रेरीत असलेल्या भुवनेश्वर इथल्याच अनेक तरुण-तरुणींची एक टीम बांधली आणि यातूनच ‘नशा मुक्ती युवा संकल्प’ (NMYS) या नावाने ते आता काम करू लागले.

NMYS म्हणजे तंबाखू आणि तत्सम विषारी पदार्थांच्या विरोधात सुरु केलेली एक ऐच्छिक मोहीम आहे. या ग्रुप मध्ये आता थोडेथोडके नव्हे तर जवळपास ३० ध्येयवादी तरुण स्वखुशीने आणि कुठलंच मोबदला न घेता एका ध्येयासाठी त्यांना जमेल तेव्हा आणि जमेल तसं कार्यरत आहेत.

शाळा आणि कॉलेजेस मध्ये त्यांनी यासंदर्भात जागरूकता निर्माण करणारे कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली आणि आता भुवनेश्वर शहरात सर्वदूर या विचारांचा प्रसार करून हे सगळे लोक आता या विषया विरोधात सर्वसंमत वातावर्त निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत हे विशेष.

“काही काळानंतर आमच्या लक्षात आले की ओरिसा मध्ये असलेले सर्वच्या दुध विक्रीची केंद्रे या अंमली अश्या गुटखा विक्रीची केंद्रे बनली आहेत तेव्हा आम्ही ओरिसा हायकोर्ट मध्ये या विरोधात एक जनहितार्थ याचिका दाखल केली आणि हायकोर्टाला विनंती केली कि त्यांनी दुध केंद्रांवरच्या या अवैध गुटखा विक्रीवर प्रतिबंध आणावा.” इमरान सांगत होता.

हायकोर्टातले एक वरिष्ठ वकील श्री बिरेन त्रिपाठी या संदर्भात इमरानच्या बाजूने केस काहीही मानधन न घेता लढले आणि यामध्ये इमरान चा विजय झाला. ओरिसा हायकोर्टाने ओरिसा मधल्या या अवैध गुटखा विक्रीवर निर्बंध घातले.

“या केस मध्ये मिळालेल्या विजयाने आमचा हुरूप खूपच वाढला आणि आला माझ्या लक्षात आलं की आता आम्ही नेमक्या दिशेने अचूक प्रवास करत आहोत. आणि नक्कीच तुम्ही जेव्हा काही चांगले करता तेव्हा तुमची प्रशंसा तर होतेच पण त्या सोबत तुमच्या टीमला नवीन सैनिक सुद्धा मिळत जातात.” इमरान सांगत होता.

आता इमरान आणि त्याच्या संस्थेने गुटख्याच्या विरोधातली लढाई अजूनच तीव्र केली जेणेकरून तोंडाच्या कर्करोगाचा प्रसार थांबवला जाऊ शकेल.

एका रिपोर्ट प्रमाणे धूरविरहित तंबाखू हा ओरिसामध्ये होणाऱ्या ४०% कर्करोगाला कारणीभूत आहे. आणि ओरिसाच्या एकूण लोकसंख्येपैकी किमान ४३% लोक हे धूर विरहित तंबाखूचे सेवन करतात ही ओरिसा मधली भीषण परिस्थिती आहे.

जेव्हा नुसत्या जागरूकता वाढवणाऱ्या अभियानाने कुठलंच फरक पाडत नाही असे इमरान आणि त्याच्या टीमच्या लक्षात आले तेव्हा त्यान्नी पुन्हा हायकोर्टाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला.

यावेळी त्यांनी CLAP (Committee for Legal Aid to Poor) या एका NGOची मदत घेतली.

NMYS पुन्हा एकदा यशस्वी झाली आणि पूर्ण ओरिसा राज्यात तंबाखूच्या सेवनावर हायकोर्टाने प्रतिबंध लावला.

आपले मिशन तसेच सुरु ठेवताना इमरानने आता ‘सलाम जीवन’ नावाची एक उडिया डाक्यूमेंट्री तयार केली ज्यामध्ये तंबाखूच्या सेवनाने व्यक्तीच्या आयुष्यावर आणि पर्यायाने त्या व्यक्तीच्या कुटुंबाची होणारी धूळधाण सुद्धा त्याने व्यवस्थित दाखवली.

ओरिसा सरकारच्या मदतीने ‘सलाम जीवन’ ओरिसा मधल्या सगळ्या म्हणजे जवळपास २५०० कॉलेजेस मध्ये दाखवण्यात आली.

यासोबतच NMYSचे सदस्य तोंडाच्या कर्करोगाच्या रोग्यांना आचार्य हरिहर रिजनल कैंसर सेंटर मध्ये घेऊन जातात आणि इथे ज्यांची उपचार करण्याची परिस्थिती नाही अश्यांवर मोफत उपचार सुद्धा केले जातात. इमरानने इथे त्याचे एक डॉक्टर मित्र डॉ. बी. नायक यांच्या साथीने एक काउंसलिंग सेंटर सुद्धा सुरु केले आहे.

“तोंडाचा कर्करोग अचानक उदभवत नाही तर होण्याआधी हा रोग अनेकदा सुचना देत असतो आणि या सूचना समाजाने फार महत्वाचे असते. काउंसलिंग सेंटर मध्ये या कर्करोगापासून कसे वाचले जाऊ शकते आणि हा कर्करोग होणारच नाही म्हणून काय काय करावे याचे प्रशिक्षण देतो.” डॉ. बी. नायक सांगत होते.

इमरान त्याला या कामात मदत करायला खूप लोक स्वयंस्फुर्तीने तयार आहेत यावद्दल स्वतःला खूप नशीबवान मानतो. प्रोफेशनल लोक सुद्धा त्याला या कामात काहीही न घेता मदत करात असे ही तो सांगतो.

अनेकानेक क्षेत्रांत अग्रेसर असलेले इम्रानच्या या ग्रुपचे सदस्य स्वैच्छिक स्वरूपात इथे काम करतात. इमरान एका किलेज मध्ये पार्ट टाइम टीचर आहे. तो मुळचाओरिसातल्या भद्रक जिल्ह्याचा रहिवासी आहे पण ग्रेजुएशन झाल्यानंतर तो भुवनेश्वर इथे राहायला आला.

जेव्हा इमरानने पोस्ट ग्रेजुएशनला नव घातलं येव्हाच त्याने ठरवून टाकल होत कि तो त्याचे आयुष्य समाजसेवेसाठी वाहून घेणार आहे पण त्यावेळी त्याच्या शिक्षणासाठी कुठलीच बँक त्याला लोन देऊ इच्छित नव्हती.

तेव्हा त्याने तत्कालीन राष्ट्रपती डॉ. श्री एपीजे अब्दुल कलाम यांना पत्र लिहिले आणि राष्ट्रपतींच्या ऑफिसने त्वरित बँकेला पत्र पाठवले आणि दोन दिवसांच्या आत इमरानला त्याच्या पुढील शिक्षणासाठी लोन मिळाले होते अशी आठवण इमरान आवर्जून सांगतो.

“या प्रसंगाने मी प्रेरीत झालो आणि माझी समाजाप्रती काम करण्याची प्रेरणा आणखीनच वाढली. जर देशाचा प्रथम नागरिक माझ्या सारख्या सर्वसामान्य लोकांविषयी इतका संवेदनशील असेल तर या देशासाठी काहीतरी करण्याची माझी जबाबदारी अजूनच वाढते.” इमरान अभिमानाने सांगतो.

“प्रत्येक वेळी जेव्हा हॉस्पिटल मध्ये जाऊन आम्ही पेशंटसना मदत करतो आणि त्यानंतर जेव्हा हे कर्करोगग्रस्त लोक आम्हाला आशीर्वाद देतात तेव्हा आम्हाला वाटत कि आम्ही जगातले सगळ्यात धनवान लोक आहोत.

जेव्हा लोकांना कळत कि त्यांना कर्करोग झाला आहे तेव्हा हा त्यांच्यासाठी फारच जीवघेणा अनुभव असतो आणि तेव्हाच त्यांना कुणाच्या तरी सहाय्यतेची कुणीतरी आधार देण्याची गरज भासते. म्हणूनच हे जे काही मी करतो आहे ते कानं मी असेच सुरु ठेवणार आहे.” इमरान हसून सांगतो.

जागतिक महासत्ता होण्याच्या उंबरठ्यावर उभा असलेला भारत तंबाखू , दारू, गुटखा, ड्रग्ज अश्या तरुणांचे आयुष्य आणि पिढ्याच्या पिढ्या बरबाद करणाऱ्या नानाविविध व्यसनांच्या गराड्यात अडकला आहे.

इमरान आणि त्याच्या संस्थेच्या उल्लेखनीय कार्याचा म्हणूनच आम्हा ‘टीम भारतीयन्स’ला आज अभिमान वाटतो आहे.

इमरान आणि त्याच्या सहकाऱ्यांना ‘टीम भारतीयन्स’चा मानाचा मुजरा.

मिलिंद वेर्लेकर
**Team Bharatiyans**
(बातमी सौजन्य – याहू डॉट कॉम न्यूज )

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

www.yahoo.com.news