Bhartiyans

Menu

मिझोराम मधील बिनदुकानदारांचे दुकान

Date : 07 Nov 2016

Total View : 374

मिझोराम मध्ये हायवेच्या शेजारी वसलेले दुकानदार, ग्राहकांच्या पारदर्शी मनावर आणि मनातल्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेऊन दुकानदाराशिवाय दुकान चालवतात आणि ग्राहकही त्यांच्या विश्वासाला पात्र ठरतात.


सारांश

मिझोराम मध्ये हायवेच्या शेजारी वसलेले दुकानदार, ग्राहकांच्या पारदर्शी मनावर आणि मनातल्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेऊन दुकानदाराशिवाय दुकान चालवतात आणि ग्राहकही त्यांच्या विश्वासाला पात्र ठरतात.सविस्तर बातमी

विश्वास द्या...विश्वास घ्या 
आजच्या जगात इतक्या सहजपणे तुम्ही कुणावर विश्वास टाकू शकता का मित्रांनो आणि मैत्रिणींनो ?

मिझोराम मधले हे दुकानदार टाकतात...आणि तिथले ग्राहक सुद्धा अभिमानाने प्रामाणिकपणे या विश्वासाला पात्रही ठरतात.... 
#Bharatiyans

आजच्या जगात जिथे आपण आपल्या सावलीवर सुद्धा विश्वास ठेवत नाही तिथे दुकान असो वा मॉल असो, सीसीटीव्ही, सिक्युरिटी एजन्सीज, सेन्सिंग आणि स्कानिंग मशीन्स इत्यादी प्रकारच्या सिक्युरिटीच्या नावाखाली अक्षरशः लाखो रुपये खर्च करावे लागत असताना कुणी दुकानदार आपल्या ग्राहकांवर इतका आंधळा विश्वास टाकू शकतो यावरच आपला विश्वास बसण शक्य नाही मित्रांनो

पण आज ही वस्तुस्थिती आहे भारताच्या पूर्वोत्तर राज्यात...मिझोराम मध्ये....

अविश्वासाने पोखरलेल्या आजच्या मतलबी आणि खोटारड्या जगात मिझोराम मध्ये हायवेच्या शेजारी वसलेले दुकानदार असा पूर्ण विश्वास त्यांच्या ग्राहकांच्या पारदर्शी मनावर आणि मनातल्या प्रामाणिकपणावर टाकतात.

अश्या दुकानांना मिझोराममध्ये Nghah lou dawr दुकाने म्हटले जाते. 
याचा अर्थ दुकानदारा शिवायचे दुकान.

हे दुकान चालते मिझो लोकांनी त्यांच्याच पद्धतीने विकसित केलेल्या तळागाळातल्या लोकांच्या एका अंतर्गत कॉमर्स बेस्ड विश्वास या कन्सेप्ट च्या सहाय्याने...

मिझो लोक हे त्यांच्या प्रामाणिकपणासाठी, सच्च्या साधेपणासाठी आणि त्यांच्या आयुष्याकडे बघण्याच्या शांत आणि विलक्षण निकोप अश्या दृष्टिकोनासाठी खूप प्रसिद्ध आहेत.

मिझोरामची राजधानी ऐझवाल पासून ६५ किमी वर असलेल्या सेलिंग प्रदेशात हायवेच्या शेजारी ही स्थानिक शेतकऱ्यांचा माल विकणारी ही नाविन्यपूर्ण दुकाने मोठ्या प्रमाणावर आढळतात.

दुकानदार किंवा कुणीच नसलेली आणि कुणाचेही लक्ष नसलेली ही दुकाने पाहून चोवीसतास पहारेकर्यांच्या आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या बंदोबस्तात शॉपिंग करणाऱ्या आपणांस आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

हायवेने जात असताना आवश्यक त्या वस्तू विकत उचलून नेण्यासाठी ही दुकाने खुलीच असतात.

\\"आम्ही ही दुनाके पूर्ण वर्षभर सुरु ठेवतो. माल घेऊन त्याचे पैसे ग्राहकांनी इथे टाकणे अपेक्षित असतो. आमच्या विश्वासाला इथे ग्राहकांनी कधीच तडा जाऊ दिलेला नाही.\\" मिझो दुकानदार सांगतात.

रोज सकाळी हे स्थानिक शेतकरी दुकानदार इथे त्यांच्या या बांबून्नी उभारलेल्या दुकानांमध्ये स्थानिक फळे, फुले , भाज्या , धान्य , स्थानिक फळांचे ज्युसेस, छोटे वाळवलेले मासे इत्यादी मांडून ठेवतात आणि खडू किंवा कोळशाने लिहिलेली किमतीची यादी लटकवतात.

ही अशी सगळी मांडामांड केल्यानंतर हे दुकानदार आपल्या ग्राहकांच्या चांगुलपणावर पूर्ण विश्वास ठेऊन, त्यांच्या स्वतःच्या शेतात किंवा त्यांच्या मालकाच्या शेतात रोजंदारीसाठी त्यांच्या रोजच्या शेतीच्या वा इतर कामांसाठी निघून जातात.

मालाची किंमत पाहून जितक्या वस्तू आपण घेतल्या त्या वस्तूंचे पैसे ग्राहकाने या बॉक्स मध्ये टाकणे इथे अपेक्षित असते.

मिझो ग्राहक सुद्धा मिझो दुकानदारांनी टाकलेल्या या विश्वासाला पूर्णपणे सार्थ ठरवतात.

शेतात काम करणारे हात एकतर कमी आणि त्यातही महाग असताना हे स्थानिक शेतकरी त्यांच्यापैकी कुणालाही या दुकानांत माल विकण्यासाठी बसवूच शकत नाहीत. आणि त्यामुळे अश्या पद्धतीने दुकान थाटून हे लोक आपापल्या कामासाठी निघून जातात.

या दुकानांमध्ये होणारी कमाई तशी फार नसली तरी हे छोटे दुकानदार या कामैमध्ये सुद्धा संतुष्ट असतात आणि एकाच भावनेने नित्य आनंदी असतात कि त्यांचे ग्राहक त्यांना कधीच फसवत नाहीत.

\\"अश्या दुकानांतून आम्हाला हवा असलेला माल घेणे हे आम्हांला खूप आनंददायक आहे कारण अश्या प्रकारचे विश्वास टाकणारे दुकानदार आमच्या मिझोराम मध्ये आहेत हे आम्हालाच भूषणावह आहे. कुठल्यातरी छान आणि पवित्र कामात आपण सहभागी आहोत याचाच आम्हाला जास्त आनंद होतो.\\" स्थानिक ग्राहक सांगतात.

आजच्या अविश्वासाने बरबटलेल्या जगात हे छोटे स्थानिक शेतकरी आपल्या चेहरा नसलेल्या ग्राहकांच्या नितळ अश्या चारित्र्यावर इतका विश्वास टाकतात आणि या विश्वासाला पूर्ण प्रामाणिकपणे आणि अभिमानाने हे ग्राहक कसे जीवापाड जपतात हे सर्वच दृश्य बघणे हे खूप, खूप , खूपच आशादायक आहे हे नक्की.

आधुनिक जगात महासत्ता होण्याकडे वेगाने अग्रेसर झालेल्या भारतात परस्पर विश्वासाचे हे असे छान रोपटे लावणारे आणि प्रामाणिकपणे या रोपट्याचे विशाल वटवृक्षात तितक्याच माणुसकीने रुपन्त्यार करणारे दुकानदार आणि ग्राहक या सर्वांचाच \\'Team Bharatiyans\\'ला आज अभिमान वाटतो आहे.

मिझोराम मधल्या या दुकानदारांना आणि या ग्राहकांना टीम भारतीयान्स\\'चा मानाचा मुजरा

**Team Bharatiyans**

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य