Bhartiyans

Menu

शाळा अथवा काँलेज जीवनाच्या काळात धमाल, मौजमजा करणे हीच प्रवृत्ती असणाऱ्या हल्लीच्या तरुणतरुणीं आदर्श घ्यावा अशी कृतिशील 'दिया शहा’

Date : 07 Nov 2016

Total View : 155

भारतातल्या टीनेजर्सनी जर सतरा वर्षीय दिया शाह चा आदर्श घेतला (जो ते नक्कीच घेतील) , तर नक्कीच विवेकानंदांच्या म्हणण्याप्रमाणे हे टीनेजर्स डॉ एपीजे अब्दुल कलामांच्या स्वप्नातला बलशाली भारत निर्माण करती


सारांश

केवळ १७ वर्षाच्या दिया शाह नं स्वदेस या NGO द्वारे समाजकार्य करायला सुरवात केली.खामगाव येथे जाऊन तिनं मुले व स्त्रियांसाठी इंग्रजीचे वर्ग सुरु केले.आयुष्यात काहीतरी केले पाहिजे,आपल्या हातून काहीतरी भरीव असे घडलेच पाहिजे असा कृतीशील संदेश भारतीय युवावर्गाला देणाऱ्या दिया शाह ची हि कहाणीसविस्तर बातमी

सामान्यत: शाळा अथवा काँलेजजीवनाच्या काळात धमाल, मौजमजा करणे हीच प्रवृत्ती हल्लीच्या तरुणतरुणींमध्ये दिसून येते.

पण याला कृतीशील अपवाद ठरली \\'दिया शहा’ ,

दहावीची परीक्षा झाल्यानंतरच्या सुट्टीचा टाईमपास करण्यापेक्षा काहीतरी सकारात्मक कामासाठी उपयोग करायचा असे तिने ठरवलं आणि मुंबईला असणाऱ्या ‘स्वदेस’ NGO च्या CEO ला ती भेटली आणि ही NGO तिने जॉईन केली.

सुरुवातीचा बराचसा काळ तिने इथे ऑफिसमध्ये टेबलावर बसूनच संस्थात्मक स्वरूपाच्या desk-work काम करण्यात घालवला.

आता याचा ही तिला कंटाळा आला. काहीतरी प्रत्यक्ष फिल्डवर्क करावे अशी तिची मनापासून इच्छा होती आणि याचसाठी तर तिने ही NGO जॉईन केली होती.

तिने ही गोष्ट तिच्या NGOच्या प्रमुखांच्या कानावर घातली.

आणि एक छान दिवस दियाच्या आयुषात उजाडला ज्या दिवसामुळे, टीनेजर असलेल्या दियाने असा एक जबरदस्त मानदंड उभा केला की जो पुढे जाऊन अनेक तरुणांच्या आयुष्यात \\'दिया रोषन\\' करेल...नक्कीच करेल....

“साधारण माझ्या वयाची मुले असले प्रोजेक्ट्स आणि यांचा अनुभव हे त्यांच्या रेझ्युमी मध्ये लिहिण्यासाठी करतात, पण मला निव्वळ अश्या रेझ्युमी टाईप गोष्टींमध्ये स्वारस्य नव्हते. 
मला खरच काहीतरी भरीव, आयुष्याचा अनुभव देईल आणि माझ्या ही विस्डममध्ये भर घालेल असे करायचे होते आणि म्हणून मला फक्त हा वर्ग करण्यात रस नव्हता तर प्रत्यक्ष काहीतरी करून काहीजणांच्या आयुष्यात तरी काही नेमका बदल घडवून आणावा अशी माझी इच्छा होती. 
माझ्या या छोट्याश्या गोष्टीने फार मोठा बदल मी भारतीय जीवनमानामध्ये आणीन का नाही याची मला कल्पना नाही पण बदल घडवण्यासाठीचे पहिले पाउल तर मी निश्चितच मी टाकू शकते.” दिया सांगते.

दियाच्या NGOचा एक ग्रामीण भागातल्या लोकांना मदत करणारा वर्ग महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातल्या खामगाव इथे आयोजीत करण्यात आला होता जिथे दियाने काम करायला आणि प्रत्यक्ष अनुभवासाठी फिल्डवर जायचे असे ठरले.

या वर्गांतर्गत दिया एक नवीन कार्यकर्ती म्हणून खामगावला गेली.

इथे प्रत्यक्ष ग्रामीण भागात काम करताना एक गोष्ट दियाने अनुभवली कि हे ग्रामीण भागात राहणारे विद्यार्थी खूप मेहेनती, हुशार, स्वावलंबी आणि स्मार्ट असतात पण कदाचित प्रत्यक्ष भाषा आणि संवाद कला या संदर्भात जेव्हा विषय येतो तेव्हा मात्र त्यांची गाडी आत्मविश्वासाची कमी असल्याने अडू शकते आणि निव्वळ याचमुळे ते बुजु ही शकतात.

दियाचे इंग्लिश चांगले असल्याने आणि चांगल्याप्रकारे इंग्लिश शिकवता येत असल्याने या लोकांना इंग्रजी भाषेतून संवादकला शिकवता आली तर या ग्रामीण लोकांचा आत्मविश्वास नक्कीच वाढू शकेल असा विचार आता या टीनेजरच्या मनात डोकावून गेला.

झालं...काही दिवसांनी हा वर्ग संपला आणि इतरांसोबत दिया सुद्धा मुंबईला परत आली....

पण खामगावच्या लोकांसाठी अजून काही करावे आणि भरीव काही करावे असा विचार दियाला स्वस्थ बसू देत नव्हता.

काही दिवसातच दिया तिच्या NGOच्या प्रमुखांना भेटली आणि हा तिचा विचार तिने त्यांच्या समोर मांडला.

अस काहीच कधीच दियाने आधी केलं नव्हत पण हे असलं काही भरीव करायला नक्कीच तिला आवडेल असं दियाने या प्रमुखांना सांगितलं.

खूप उच्च दर्जाचा आणि भरीव कामाचा हा टीनेजर असलेल्या दियाचा विचार ऐकून त्यांना ही खूप आनंद झाला आणि यामुळेच आता तिने त्यांच्याकडून महाराष्ट्रातील खामगाव नामक या लहानश्या खेड्यात काम करण्याची परवानगी मिळवली.

दिया एकटीच खामगावला गेली आणि NGOने व्यवस्था केलेल्या तिथल्याच एका कुटुंबात तिने दोन महिने मुक्काम केला. या संपूर्ण कुटुंबाने अत्यंत प्रेमाने तिचे स्वागत केले.

दियाच्याच शब्दात सांगायचे झाले तर, \\" इथली घरे अगदी चित्रपटातील घरांप्रमाणे शेणामातीची होती. विहीरीवरुन पाणी आणावं लागे. हिरवीगार कुरणे आणि चविष्ट भाकऱ्या अस इथलं वातावरण होतं.\\"

स्वदेश ही संस्था खामगावमध्ये स्त्रियांसाठी शिवणकामाचे वर्ग चालवते. 
दिया तेथे गेली व तिने तेथील स्त्रियांना सांगितले की ती त्यांना व त्यांच्या मुलांना इंग्रजी भाषा शिकवणार आहे. त्यानंतर गावात घरोघरी हिंडून तिने मराठीमध्ये स्वत:ची ओळख करुन दिली.

पहिल्या दिवशी तिच्या इंग्रजी भाषेच्या वर्गात एकच विद्यार्थिनी होती, नंतर दोन, पण त्यानंतर हळूहळू संपूर्ण शिवणक्लासला येणाऱ्या स्त्रिया तिच्या विद्यार्थिनी झाल्या.

लवकरच तिचे तीन वर्ग सुरु झाले... लहान मुले, स्त्रिया व काँलेजमधील तरुणवर्ग.

त्यांना उत्तमप्रकारे शिकवता यावे, शब्द, वाक्य तयार करता यावे, इंग्रजी बोलता यावे यासाठी दिया सतत प्रयत्नशील होती.

काही आठवड्यानंतर जेव्हा तिने भाजीबाजारात दोन स्त्रियांना इंग्रजीमधून बोलताना ऐकले तेव्हा तिला खूप आनंद झाला. संध्याकाळी ती नैत्रीताईंना ( ज्यांच्या घरी ती रहात होती ) स्वयंपाकात मदत करायची आणि लहान मुलांच्या शंकांचे निरसन करत असे.

दोन महिने कसे निघून गेले दियाला कळलही नाही.

शेवटच्या दिवशी गावकऱ्यांनी तिला \\' बिदाई \\' दिली.

त्यांनी तिच्या नावाने दोन झाडे लावली. 
आणि विशेषम्हणजे तिच्या लहान लहान विद्यार्थ्यांनी इंग्रजीमधून समारोपपर भाषण दिले ( जे खूपच अचूक होते ).

या सगळ्यांमुळे कृतार्थझालेली दिया खूपच भारावून गेली.

कधीकधी दियाने दोनच महिन्यांत जे काही केले ते करण्यात उभी हयात निघून जाते.

लोकांना मनापासून मदत करायची संधी कदाचित सगळ्यांना मिळतेच असं नाही. 
पण अशी संधी कधी येते ही वाट पाहण्यापेक्षा अश्या संधी निर्माण करणे आणि अशी संधी मिळाल्यावर अश्या संधीचे सोने करणे हे मात्र दियाप्रमाणे आपल्या हातात नक्कीच असते.

!!!!किसी की मुस्कुराहटों पे हो निसार 
किसीका दर्द मिल सके तो ले उधार 
किसीके वास्ते हो तेरे दिल में प्यार 
जीना इसी का नाम है.........दिया इसी का नाम है !!!!

आयुष्यात काहीतरी केले पाहिजे... आपल्या हातून काहीतरी भरीव असे घडलेच पाहिजे असा कृतीशील संदेश भारतीय युवावर्गाला देणाऱ्या दिया शाह ला ‘टीम भारतीयन्स’चा मानाचा मुजरा....

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

डॉ. अनुपमा माढेकर

टीम भारतीयन्स