Bhartiyans

Menu

अव्वल दर्जाच्या जागतीक मिलिट्री मार्शलआर्ट मधली 7th डिग्री ब्लॅकबेल्ट होल्डर आहे एक भारतीय महिला

Date : 07 Nov 2016

Total View : 227

भारताच्या एकमेव महिला कमांडो ट्रेनर डॉ. सीमा राव, ज्या गेल्या तब्बल २० वर्षांपासून भारतीय स्पेशल कमांडो फोर्सेसना प्रत्यक्ष युद्ध परिस्थितीत समोरासमोरच्या युद्धाचे विशेष कमांडो ट्रेनिंग देणाऱ्या कमांड

सारांश

जगातल्या अत्यंत थोड्या लोकांमध्ये डॉ. सीमाची यांची गणना होते. त्यांचा ‘जीत क्यून दो’ या १९६७ साली जगभरातल्या निवडक मार्शल आर्ट तंत्रांच्या सहाय्याने ब्रूस-ली ने निर्माण केलेल्या हायब्रीड प्रकारचा सखोल अभ्यास आणि हातखंडा आहे. सीमा एक परंपरागत मेडिसिन डॉक्टर आहेत. यासोबतच त्यांनी क्राईसेस मॅनेजमेन्ट मसविस्तर बातमी

ही भारतीय महिला आहे एका अव्वल दर्जाच्या जागतीक मिलिट्री मार्शल आर्ट मधली 7th डिग्री ब्लॅकबेल्ट होल्डर, स्पेशल कमांडो वन-टू-वन फाईट ट्रेनर, एक बेलाग फायर-फायटर, एक अव्वल दर्जाची स्कुबा डाइव्हर, एक अचाट रॉक क्लाइम्बर , एक प्रशिक्षित डॉक्टर, क्राईसेस मॅनेजमेंट मध्ये एक निष्णात MBA, एक प्रसिद्ध सह-लेखक, एक कल्पक फिल्म मेकर आणि आहे एक यशस्वी गृहिणी सुद्धा....
#Bharatiyans

वेळोवेळी आपण अश्या गोष्टी ऐकल्या आहेत ज्या निव्वळ आपल्याला प्रभावित करतात असच नाही तर या खऱ्याखुऱ्या आयुष्यातल्या आपल्यासारख्याच खऱ्याखुऱ्या माणसांच्या स्टोरीज मनापासून आपल्याला जाणवून देतात कि आपल्या आयुष्यातले असलेले अनेकानेक इशुज आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न हे खरंच जवळजवळ नगण्यच असतात.

उभ्या जगात अश्या अनेकानेक यशस्वी लोकांच्या, आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन आमुलाग्र बदलून टाकणाऱ्या, गोष्टी आपल्याला आढळून येतात ज्या लोकांनी परिस्थिती पूर्ण विरोधी असताना सुद्धा विलक्षण ताकतीने, जिद्दीने , कष्टाने आणि असामान्य उमेदीने लढा दिला आणि ये प्रमाणाबाहेर सगळ्यातच यशस्वी झाले.

डॉ सीमा राव यांची ही गोष्ट वाचून आपला विश्वास बसेल की या जगात ध्येयपूर्तीसाठी अढळ निष्ठा ठेवून प्रामाणिकपणे कष्ट केले तर कुणासही कधीच काहीच अशक्य नाहीच....

आज भेटूया भारताच्या एकमेव महिला कमांडो ट्रेनरला, डॉ. सीमा राव यांना, ज्या आहेत गेल्या तब्बल २० वर्षांपासून भारतीय स्पेशल कमांडो फोर्सेसना प्रत्यक्ष युद्ध परिस्थितीत समोरासमोरच्या युद्धाचे विशेष कमांडो ट्रेनिंग देणाऱ्या कमांडो ट्रेनर.

गोवा मुक्ती संग्रामातल्या स्वातंत्रसैनिक असलेल्या प्रा. रमाकांत शिनारी यांच्या डॉ सीमा या कन्या.

जगातल्या अत्यंत थोड्या लोकांमध्ये डॉ. सीमाची यांची गणना होते ज्या लोकांचा ‘जीत क्यून दो’ या १९६७ साली जगभरातल्या निवडक मार्शल आर्ट तंत्रांच्या सहाय्याने ब्रूस-ली ने निर्माण केलेल्या हायब्रीड प्रकारचा सखोल अभ्यास आणि सरावाने आलेला हातखंडा आहे.

सीमा एक परंपरागत मेडिसिन डॉक्टर आहेत. यासोबतच त्यांनी क्राईसेस मानाज्मेंत मध्ये MBA केलं आहे.

मार्शल आर्ट संबंधातल्या गाजलेल्या अनेकानेक पुस्तकांची डॉ. सीमा या ही सहलेखिका आहेत.
भारतीय सैन्यासाठी तयार केल्या गेलेल्या Close Combat Ops ट्रेनिंगच्या पहिल्या एन्सायक्लोपिडिया सोबत, ‘A Comprehensive Analysis of World Terrorism ‘ या जागतिक दहशतवादावर काढल्या गेलेल्या पहिल्या भारतीय पुस्तकासारखीच त्यांची बरीच पुस्तके आज FBI, INTERPOL, UN आणि जगभरातल्या SWAT पोलिसांच्या ग्रंथालयात उपलब्ध करून दिलेली आहेत.

आत्तापावेतो मिळालेल्या अनेकानेक सन्मानांची डॉ. सीमा यांची यादी फार मोठी आहे.
भारतीय सेनाध्यक्षांनी तीन वेळा दिलेली सन्मानदर्शक सायटेशन्स , २००९ साली भारताच्या गृहमंत्र्यांनी निस्वार्थीपणे सीमा यांनी दिलेल्या कमांडो ट्रेनिंग साठी दिलेले प्रशस्तीपत्र, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा Volunteer Service Award, World Peace Congressने सीमा यांना दिलेला World Peace Award, मलेशियाच्या पंतप्रधानांनी त्यांना २००८ साली दिलेला स्पेशल मलेशिया अवार्ड आणि अजून बरेच सन्मान आणि पुरस्कार.

बऱ्याच लोकांना ऐकून आश्चर्य सुद्धा वाटेल की ‘हाथापाई’ या ‘जीत क्यून दो’ या मार्शल आर्ट टेक्निकवर आधारित प्रकारातल्या, भारतात तयार झालेल्या पहिल्या वहिल्या फिल्मचे निर्माणही डॉ सीमा यांनी केले आहे आणि त्यांनी त्यात कामही केले आहे.

आयुष्यातल्या अनेकानेक आलेल्या गंभीर आणि कटू प्रसंगा नंतर सुद्धा डॉ सीमा यांनी कधीच ‘गिव्ह-अप’ केले नाही आणि त्या सतत लढतच राहिल्या.

अनेक आर्थिक प्रश्न असताना सुद्धा त्यांनी आणि त्यांचे पती यांनी भारतीय कमांडोजना ते देत असलेल्या मार्शल आर्ट्स’च्या ट्रेनिंग साठी कधीच पैसे आकारले नाहीत.

आत्तापर्यंत जवळपास १५,००० कमांडोजना प्रशिक्षित केलेल्या डॉ सीमा यांन्ना त्यांच्या कामाच्या स्वरूपामुळे भारतात अनेकानेक धोकादायक ठिकाणी प्रवास करणे भाग पडत असे, एकदा तर त्यांच्या भारतीय सैनिकांच्या कमांडो ट्रेनिंगच्या खूप दूर सुरु असलेल्या बिझी शेड्युल मुळे त्यांच्या वडलांच्या अंत्य संस्काराला सुद्धा त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.

एकदा एका आर्मी ऑपरेशन मध्ये बंडखोरांनी केलेल्या भीषण अश्या हल्ल्यामध्ये पाठीच्या मुख्य कण्यालाच झालेल्या गंभीर फ्राक्चार असताना सुद्धा त्यातून उठल्यावर डॉ सीमा यांनी हार मानली नाही आणि नंतर पुन्हा त्या कामावर रुजू झाल्या.

एकदा फिल्ड वर असताना त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये त्यांच्या डोक्यालाच गंभीर दुखापत झाली आणि डॉ सीमा यांची स्मृतीच जवळपास काही काळापर्यंत नाहीशी झाली. यानंतर सुद्धा डॉ सीमा यातून बाहेर पडल्या आणि त्यांनी पूर्ववत कामाला सुरुवात केली.

आजकालच्या जगात जिथे मुलीला गर्भातच गर्भपात ठार केले जाते तिथे डॉ सीमा आणि त्यांचे पती मेजर दीपक राव यांनी ठरवून आणि पूर्णपणे समजून उमजून एका मुलीलाच दत्तक घेतले.

त्यांच्या कामाच्या स्वरूपामुळे असलेल्या सर्वच धोक्यांमुळे नैसर्गिकरीत्या मुल होऊ देण्यापेक्षा या जोडप्याने एका मुलीला दत्तक घेणे पसंद केले.

“पुरुषांची जबरदस्त मक्तेदारी असलेल्या कमांडो-ट्रेनिंगच्या क्षेत्रामध्ये जेव्हा एक महिला यशस्वीपणे, पूर्ण ताकतीने आणि कष्टसाध्य अश्या असामान्य स्किल्सच्या सहाय्याने कमांडो-ट्रेनिंग द्यायला सुरुवात देते तेव्हा तिला पुरुषांची ही मक्तेदारी मोडून काढायला खूप कष्ट करावे लागतात. हे सर्व कष्ट मी परिश्रमपूर्वक केले करण माझी या विषयातली प्रामाणिक आवड आणि तळमळ.” डॉ सीमा सांगतात.

“मला पुरुषांना कमांडो ट्रेनिंग देत असताना कठोर शिस्त तर पाळावी आणि लावावी लागतेच पण त्याहीपेक्षा मला या सर्वच जबाबदार आणि निष्णात कमांडोजच्या मनामध्ये माझ्या स्किल्ससाठी पूर्ण आदरभाव ही निर्माण करावाच लागतो. अर्थात आत्तापावेतो मी नेहेमीच माझ्या पुरुष कमांडोजचा विश्वास मिळवण्यात यशस्वी ठरले आहे आणि त्यासाठी मी स्वतः खूप प्रामाणिकपणे कठोर कष्ट घेतले आहेत आणियाचामलाप्रचंडअभिमानआहे.” डॉ सीमा पुढे सांगतात.

‘टीम भारतीयन्स’चा डॉ सीमा राव यांच्या अतुलनीय कर्तुत्वाला नतमस्तक मानाचा मुजरा....

ही भारतीय महिला आहे एका अव्वल दर्जाच्या जागतीक मिलिट्री मार्शल आर्ट मधली 7th डिग्री ब्लॅकबेल्ट होल्डर, स्पेशल कमांडो वन-टू-वन फाईट ट्रेनर, एक बेलाग फायर-फायटर, एक अव्वल दर्जाची स्कुबा डाइव्हर, एक अचाट रॉक क्लाइम्बर , एक प्रशिक्षित डॉक्टर, क्राईसेस मॅनेजमेंट मध्ये एक निष्णात MBA, एक प्रसिद्ध सह-लेखक, एक कल्पक फिल्म मेकर आणि आहे एक यशस्वी गृहिणी सुद्धा....
#Bharatiyans

वेळोवेळी आपण अश्या गोष्टी ऐकल्या आहेत ज्या निव्वळ आपल्याला प्रभावित करतात असच नाही तर या खऱ्याखुऱ्या आयुष्यातल्या आपल्यासारख्याच खऱ्याखुऱ्या माणसांच्या स्टोरीज मनापासून आपल्याला जाणवून देतात कि आपल्या आयुष्यातले असलेले अनेकानेक इशुज आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न हे खरंच जवळजवळ नगण्यच असतात.

उभ्या जगात अश्या अनेकानेक यशस्वी लोकांच्या, आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन आमुलाग्र बदलून टाकणाऱ्या, गोष्टी आपल्याला आढळून येतात ज्या लोकांनी परिस्थिती पूर्ण विरोधी असताना सुद्धा विलक्षण ताकतीने, जिद्दीने , कष्टाने आणि असामान्य उमेदीने लढा दिला आणि ये प्रमाणाबाहेर सगळ्यातच यशस्वी झाले.

डॉ सीमा राव यांची ही गोष्ट वाचून आपला विश्वास बसेल की या जगात ध्येयपूर्तीसाठी अढळ निष्ठा ठेवून प्रामाणिकपणे कष्ट केले तर कुणासही कधीच काहीच अशक्य नाहीच....

आज भेटूया भारताच्या एकमेव महिला कमांडो ट्रेनरला, डॉ. सीमा राव यांना, ज्या आहेत गेल्या तब्बल २० वर्षांपासून भारतीय स्पेशल कमांडो फोर्सेसना प्रत्यक्ष युद्ध परिस्थितीत समोरासमोरच्या युद्धाचे विशेष कमांडो ट्रेनिंग देणाऱ्या कमांडो ट्रेनर.

गोवा मुक्ती संग्रामातल्या स्वातंत्रसैनिक असलेल्या प्रा. रमाकांत शिनारी यांच्या डॉ सीमा या कन्या.

जगातल्या अत्यंत थोड्या लोकांमध्ये डॉ. सीमाची यांची गणना होते ज्या लोकांचा ‘जीत क्यून दो’ या १९६७ साली जगभरातल्या निवडक मार्शल आर्ट तंत्रांच्या सहाय्याने ब्रूस-ली ने निर्माण केलेल्या हायब्रीड प्रकारचा सखोल अभ्यास आणि सरावाने आलेला हातखंडा आहे.

सीमा एक परंपरागत मेडिसिन डॉक्टर आहेत. यासोबतच त्यांनी क्राईसेस मानाज्मेंत मध्ये MBA केलं आहे.

मार्शल आर्ट संबंधातल्या गाजलेल्या अनेकानेक पुस्तकांची डॉ. सीमा या ही सहलेखिका आहेत.
भारतीय सैन्यासाठी तयार केल्या गेलेल्या Close Combat Ops ट्रेनिंगच्या पहिल्या एन्सायक्लोपिडिया सोबत, ‘A Comprehensive Analysis of World Terrorism ‘ या जागतिक दहशतवादावर काढल्या गेलेल्या पहिल्या भारतीय पुस्तकासारखीच त्यांची बरीच पुस्तके आज FBI, INTERPOL, UN आणि जगभरातल्या SWAT पोलिसांच्या ग्रंथालयात उपलब्ध करून दिलेली आहेत.

आत्तापावेतो मिळालेल्या अनेकानेक सन्मानांची डॉ. सीमा यांची यादी फार मोठी आहे.
भारतीय सेनाध्यक्षांनी तीन वेळा दिलेली सन्मानदर्शक सायटेशन्स , २००९ साली भारताच्या गृहमंत्र्यांनी निस्वार्थीपणे सीमा यांनी दिलेल्या कमांडो ट्रेनिंग साठी दिलेले प्रशस्तीपत्र, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा Volunteer Service Award, World Peace Congressने सीमा यांना दिलेला World Peace Award, मलेशियाच्या पंतप्रधानांनी त्यांना २००८ साली दिलेला स्पेशल मलेशिया अवार्ड आणि अजून बरेच सन्मान आणि पुरस्कार.

बऱ्याच लोकांना ऐकून आश्चर्य सुद्धा वाटेल की ‘हाथापाई’ या ‘जीत क्यून दो’ या मार्शल आर्ट टेक्निकवर आधारित प्रकारातल्या, भारतात तयार झालेल्या पहिल्या वहिल्या फिल्मचे निर्माणही डॉ सीमा यांनी केले आहे आणि त्यांनी त्यात कामही केले आहे.

आयुष्यातल्या अनेकानेक आलेल्या गंभीर आणि कटू प्रसंगा नंतर सुद्धा डॉ सीमा यांनी कधीच ‘गिव्ह-अप’ केले नाही आणि त्या सतत लढतच राहिल्या.

अनेक आर्थिक प्रश्न असताना सुद्धा त्यांनी आणि त्यांचे पती यांनी भारतीय कमांडोजना ते देत असलेल्या मार्शल आर्ट्स’च्या ट्रेनिंग साठी कधीच पैसे आकारले नाहीत.

आत्तापर्यंत जवळपास १५,००० कमांडोजना प्रशिक्षित केलेल्या डॉ सीमा यांन्ना त्यांच्या कामाच्या स्वरूपामुळे भारतात अनेकानेक धोकादायक ठिकाणी प्रवास करणे भाग पडत असे, एकदा तर त्यांच्या भारतीय सैनिकांच्या कमांडो ट्रेनिंगच्या खूप दूर सुरु असलेल्या बिझी शेड्युल मुळे त्यांच्या वडलांच्या अंत्य संस्काराला सुद्धा त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.

एकदा एका आर्मी ऑपरेशन मध्ये बंडखोरांनी केलेल्या भीषण अश्या हल्ल्यामध्ये पाठीच्या मुख्य कण्यालाच झालेल्या गंभीर फ्राक्चार असताना सुद्धा त्यातून उठल्यावर डॉ सीमा यांनी हार मानली नाही आणि नंतर पुन्हा त्या कामावर रुजू झाल्या.

एकदा फिल्ड वर असताना त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये त्यांच्या डोक्यालाच गंभीर दुखापत झाली आणि डॉ सीमा यांची स्मृतीच जवळपास काही काळापर्यंत नाहीशी झाली. यानंतर सुद्धा डॉ सीमा यातून बाहेर पडल्या आणि त्यांनी पूर्ववत कामाला सुरुवात केली.

आजकालच्या जगात जिथे मुलीला गर्भातच गर्भपात ठार केले जाते तिथे डॉ सीमा आणि त्यांचे पती मेजर दीपक राव यांनी ठरवून आणि पूर्णपणे समजून उमजून एका मुलीलाच दत्तक घेतले.

त्यांच्या कामाच्या स्वरूपामुळे असलेल्या सर्वच धोक्यांमुळे नैसर्गिकरीत्या मुल होऊ देण्यापेक्षा या जोडप्याने एका मुलीला दत्तक घेणे पसंद केले.

“पुरुषांची जबरदस्त मक्तेदारी असलेल्या कमांडो-ट्रेनिंगच्या क्षेत्रामध्ये जेव्हा एक महिला यशस्वीपणे, पूर्ण ताकतीने आणि कष्टसाध्य अश्या असामान्य स्किल्सच्या सहाय्याने कमांडो-ट्रेनिंग द्यायला सुरुवात देते तेव्हा तिला पुरुषांची ही मक्तेदारी मोडून काढायला खूप कष्ट करावे लागतात. हे सर्व कष्ट मी परिश्रमपूर्वक केले करण माझी या विषयातली प्रामाणिक आवड आणि तळमळ.” डॉ सीमा सांगतात.

“मला पुरुषांना कमांडो ट्रेनिंग देत असताना कठोर शिस्त तर पाळावी आणि लावावी लागतेच पण त्याहीपेक्षा मला या सर्वच जबाबदार आणि निष्णात कमांडोजच्या मनामध्ये माझ्या स्किल्ससाठी पूर्ण आदरभाव ही निर्माण करावाच लागतो. अर्थात आत्तापावेतो मी नेहेमीच माझ्या पुरुष कमांडोजचा विश्वास मिळवण्यात यशस्वी ठरले आहे आणि त्यासाठी मी स्वतः खूप प्रामाणिकपणे कठोर कष्ट घेतले आहेत आणियाचामलाप्रचंडअभिमानआहे.” डॉ सीमा सांगतात.

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य