Bhartiyans

Menu

मुस्लीम लग्नात परंपरा मोडत मेहेर म्हणून चक्क तिने मागितली काही जुनी, दुर्मिळ पुस्तके

Date : 08 Nov 2016

Total View : 205

परंपरा मोडायला धैर्य लागते आणि ते सुद्धा जर मुलगी असेल तर अवघड होऊन बसते, पण या मुलीने होणाऱ्या नवर्याकडे मागितली ५० दुर्मिळ पुस्तके


सारांश

परंपरा मोडायला धैर्य लागते आणि ते सुद्धा जर मुलगी असेल तर अवघड होऊन बसते, पण या मुलीने होणाऱ्या नवर्याकडे मागितली ५० दुर्मिळ पुस्तकेसविस्तर बातमी

कुठल्याही बदलासाठी पहिलं पाऊल टाकणं फार गरजेचं असतं....

हे उचललेलं पाहिलं पाउल नेहेमीच विलक्षण धाडसाचं असतं, त्यात हे पाहिलं पाउल जर मुलीने टाकलेलं असेल तर ते अजूनही मोठं काम असतं, पुढे जाऊन जर हे पाहिलं मुस्लीम मुलीने टाकलेलं असलं तर अजूनच सत्वपरीक्षा बघणार असतं, आणखी पुढे म्हणजे जर हे पाहिलं पाउल एका मुस्लीम मुलीने केरळ सारख्या मुस्लीम धर्माच्या पारंपारिक पगड्याच्या गडात टाकलेलं असेल तर विचारायलाच नको आणि सर्वात शेवटचा कहर म्हणजे म्हणजे हे पाहिलं पाउल जर एका मुस्लीम मुलीने केरळमध्ये आणि ते ही मुस्लीम रूढी आणि परंपरेच्या पलीकडे जाऊन टाकलेलं असेल तर मग मात्र हेखरंच कौतुकास्पद पाउल असत....
#Bharatiyans 

मात्र याचं छान प्रत्यंतर आलं केरळ मधे राहणाऱ्या साहला नेचायील मुळे ......

कारण ज्या कम्युनिटी मधून ती आली त्याची बंधने तोडणे हे काही सोपे काम नव्हते. 

पण तिच्या सुदैवाने ती एका मोकळ्या विचारांच्या कुटुंबात जन्माला आली त्यामुळे तिच्या बरोबरच्यांची लग्नं जिथे १४-१५ व्या वर्षी होत तिथे तिच्यावर मात्र घरच्यांकडून कुठलीही सक्ती झाली नाही. 

खरं तर तिनी ठरवलं होतं की लग्नच करायचं नाही आणि जवळच्या नातेवाईकांच्या कुरबुरींकडे लक्ष न देता तिच्या घरच्यांनीही तिला पाठिंबा दिला होता.
पण अचानक तिच्या आयुष्यात प्रवेश झाला अनिसचा नादोडीचा आणि त्याच्या मोकळ्या विचारांनी ती प्रभावित झाली. 

खरं तर त्यांची ओळख एक वर्षापूर्वीच झाली होती पण एकमेकांना समजून घेत त्यांच्या समविचारांनी अखेर लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला , तेव्हा साहलाचं वय होतं २२ वर्षे. 

पण ही बेडी म्हणजे बंधन नसेल हे मात्र दोघांनी जाणीवपूर्वक ठरवलं आणि स्वत:च्या विचारांवर तर ठाम राहिलेच पण घरच्यांनाही नीट पटवून देऊन अतिशय साधेपणानी ‘निकाह’ केला. 
त्या गुरुवारी जेव्हा ‘निकाह’साठी तिथे जमलेल्या २२ वर्षीय साहलाच्या नातेवाईकांनी साहलाला अत्यंत सध्या, रोजच्यासारख्याच, सलवार कमीझ मध्ये पहिले तेव्हा ‘हिचेच आज लग्न आहे का?’ असा प्रश्नच त्या सगळ्यांना पडला.

साहला साठी तो एक नेहमीचाच गुरुवार होता हे नक्की. आणि अर्थातच २६ वर्षीय अनिस साठी सुद्धा हे अगदी असेच होते. 

पण खरी गोष्ट आता इथूनच सुरु होते. 

मुस्लिम समाजात एक रस्म असते, ती म्हणजे \'मेहेर\'. 

मेहेर म्हणजे नवऱ्या मुलाने नवऱ्या मुलीला काहीतरी रक्कम द्यायची असते. हा तिचा कायदेशीर हक्क समजला जातो. 
सर्वसाधारण पणे तो रोख रक्कम किंवा दागिन्यांच्या स्वरुपात दिला जातो...

पण इथेच साहलाचे वेगळेपण पुढे आले.. 

साहलाने , तिच्या होणाऱ्या नवऱ्याला म्हणजे अनिसला अट घातली की मेहेर म्हणून तिला काही जुनी , दुर्मिळ ५० पुस्तके हवीयत आणि तीही तिच्या विचारपूर्वक निश्चित केलेल्या लिस्टप्रमाणे. 
अनिसने सुद्धा तिची ही ‘हटके’ मागणी आनंदाने मान्य केली. 

मग लग्नाच्या साड्या , दागिने यांच्या शॉपिंगला जसा नवरा फिरतो तसाच अनिस या पुस्तकांच्या शोधार्थ निघाला.. 

आणि अक्षरश: कोझिकोडापासून बेंगलोर पर्यंतची बरीचशी दुकाने पालथी घालून त्याने ही सगळीच्या सगळी पुस्तके जमवली. 

दोघांनीही ठरवल्याप्रमाणे अतिशय साधेपणानी त्यांचा निकाह पार पडला ; अगदी साध्या कपड्यांमधे. 
आणि त्याने जेव्हा तिला मेहेर अदा केला तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. 

याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिची फॅमिली जरी पुढारलेल्या विचारांची होती तरी जवळचे नातेवाईक जे आधी या सगळ्याला विरोध करत होते त्यांनाही ही कल्पना खूप पटली आणि साहला-अनिसला त्यांचे मनापासून दुवेही मिळाले. 

गेले वर्षभर दोघही आनंदाच्या लाटांवर स्वार होऊन प्रवास करतायत. 
हा प्रवास असाच चालू राहूदे ... 

“एखाद्या रूढी अथवा परंपरेला बदलायचे आणि नवीन पायंडा पडायचा तर तुम्हाला त्या रूढी आणि परंपरेचा मूळ पायंडा पाडणाऱ्या मूळ समाजाचा हिस्सा होवूनच हे करावे लागते. या समाजाबाहेर राहून हे करणे शक्य नसते. आणि म्हणूनच मी लग्नाचा निर्णय घेतला पण लग्नात कुठल्याही पद्धतीचा थाटमाट असू नये, लग्न अतिशय साधेपणाने व्हावे अशी आमची दोघांची ही इच्छा होती, त्याप्रमाणे आम्ही लग्न केले आणि कुठल्याही प्रकारचे धन अथवा सोने ‘मेहेर’ म्हणून न घेता मला आवडतात ती पुस्तके ‘मेहेर’च्या स्वरूपात मी अनिस कडे मागितली आणि अनिसने सुद्धा माझी ही मागणी आनंदाने मान्य करत मला माझी ‘मेहेर’ बाकायदा आणून दिली याचा मका फार आनंद आहे.” साहला खूप आनंदाने सांगते.

खरच... साहलाने उचललेल्या आणि अनिसने मं:पूर्वक उचलून धरलेल्या या महत्वपूर्ण पावलाला ‘एक पाऊल क्रांतीच्या दिशेने’ असच इथे म्हणावं लागेल. 

आज अशा अनेक साहला आणि अनिसची समाजाला गरज आहे.

साहला आणि अनिसला मन:पूर्वक शुभेच्छा आणि त्यांनी त्यांची ही ‘हटके’ समाजपरिवर्तन करण्याची क्षमता असणारी विचारधारा अशीच पुढे नेत रहावी व समाजप्रबोधनाला योग्य दिशेने खूप हातभार लावावा हीच सदिच्छा ......

सुप्रिया पोतनीस
*Team Bharatiyans* 
(बातमी सौजन्य- द न्यूज मिनिट आणि गुगल)

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

सुप्रिया पोतनीस

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य