Bhartiyans

Menu

बलात्कार झालेल्या मुलीसोबत तुम्ही लग्न कराल का ? हरियाणातल्या जितेंद्र छात्तर या २९ वर्षीय शेतकऱ्याने हे धारिष्ट दाखवले आहे.

Date : 09 Nov 2016

Total View : 209

हरयाणातल्या छात्तर गावी बलात्कार झालेल्या आणि या विषयाची खूप चर्चा झालेल्या एका मुलीशी जितेंद्र छात्तर या २९ वर्षीय शेतकऱ्याने लग्न तर केलेच पण लग्नानंतर तिला कायद्याच्या अभ्यासक्रमाला शिकायला घातले.


सारांश

हरयाणातल्या छात्तर गावी बलात्कार झालेल्या आणि या विषयाची खूप चर्चा झालेल्या एका मुलीशी जितेंद्र छात्तर या २९ वर्षीय शेतकऱ्याने लग्न तर केलेच पण लग्नानंतर तिला कायद्याच्या अभ्यासक्रमाला शिकायला घातले.जेणेकरून कायद्याचे पूर्ण ज्ञान शिकून नंतर, तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कायद्यासमोर गुडघे टेकसविस्तर बातमी

जितेंद्र छात्तर या २९ वर्षीय शेतकऱ्याने हा निर्णय घेतला आहे.

हरयाणातल्या छात्तर गावी बलात्कार झालेल्या आणि या विषयाची खूप चर्चा झालेल्या एका मुलीशी जितेंद्रने लग्न केले येव्हढेच नव्हे तर त्या मुलीला लग्नानंतर पूर्ण धीर देऊन कायद्याच्या अभ्यासक्रमाला शिकायला घातले.

जेणेकरून कायद्याचे पूर्ण ज्ञान शिकून नंतर, तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कायद्यासमोर गुडघे टेकायला ती भाग पाडेल आणि अश्या प्रकारचे अत्याचार झालेल्या मुलींच्या मागे आयुष्यभर तिला समर्थपणे उभही राहता येईल.

नीरज नावाच्या अत्याचार्याने अजून चार जणांच्या मदतीने या मुलीवर बलात्कार केला आणि नंतर याच कुकर्माचा धाक दाखवून तो नीच कायम त्या मुलीला ब्लॅकमेल सुद्धा करू लागला.

जितेंद्रने पाठपुरावा करून या नीरजच्या चार साथीदारांना कायद्याच्या कचाट्यात आणले आहे आणि अजूनही काही ना काही कारणाने मुक्त असणाऱ्या नीरज नावाच्या या नराधमाला पोलिसांनी अटक करावी म्हणून आता राजेंद्रने हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांचे दरवाजे जाहीरपणे ठोकावले आहेत.

या दोघांचे लग्न ठरल्यावर ही मुलगी मुद्दामून जितेंद्रला भेटली आणि तिच्यावर झालेल्या या सर्व अत्याचाराची सगळी कहाणी तिने त्याला कथन केली आणि या परिस्थितीत तिच्याशी लग्न करण्याचा विचार त्याने सोडून द्यावा अन्यथा त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना हरियाणा सारख्या संवेदनशील राज्यात आणि एकंदरच समाजात जगणे मुश्कील होऊन बसेल असेही तिने जितेंद्रला स्पष्टपणे सांगितले.

तरीही जितेंद्र आणि त्याचे कुटुंबीय त्यांच्या लग्नाच्या निर्णयावर ठाम राहिले आणि त्या मुलीचे आणि जितेंद्रचे लग्न झाले.

आमचे लग्न झाल्यावर आजपर्यंत आम्ही माझ्यावर ओढवलेल्या काळ्या प्रसंगावर कायद्याच्या आवश्यकतेपेक्षा कणभरही जास्त बोललेलो नाही तर यासंदर्भात अन्य अत्याचार झालेल्या महिलांच्या न्यायासाठी यापुढे कायदेशीर बाबीत काय काय भरीव आणि ठोस करता येईल हाच आमच्या बोलण्याचा मुख्य विषय असतो असे या मुलीने टाईम्स ऑफ इंडिया ला सांगितले.

मित्रा जितेंद्र ,
आम्हाला तुझा अभिमान वाटतो आहे मित्रा...
आम्हाला तुझा Bharatiyans असण्याचा अभिमान वाटतो आहे.

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

टाईम्स ऑफ इंडिया