Bhartiyans

Menu

गरिबांना न परवडणारी व्हील चेअर, क्रंचेस, टॉयलेट चेअर आणि इतर बरीच आर्थोपेडिक साधने निव्वळ १ रुपयात देणाऱ्या फाल्गुनी दोषी

Date : 09 Nov 2016

Total View : 190

ऑपेरेशन झाल्यावर किंवा म्हातारपणी ऑर्थोपेडिक उपकरणे वापरावी लागतात. अतिशय महागडी असलेली उपकरणे घेणे सर्वसामान्यांना परवडण्यासारखी नसतात. हीच उपकरणे फाल्गुनी दोषी यांनी १ रुपया दराने उपलबद्ध करून दिली


सारांश

ऑर्थोपेडिक च्या संदर्भातील कुठलिही साधनं महागडीही असतात आणि ती आपल्याला कायमस्वरूपी लागत नाहीत. काही काळासाठी इतके पैसे खर्च करणे गरिबांना अवघड होऊन बसते. म्हणूनच वडोदरयाच्या फाल्गुनी दोषी यांनी गरीब लोकांसाठी हि साधनं केवळ १रु रोज अशा भाड्यानं उपलब्ध करून दिली आहेत . १६ वर्षांपासून त्यांनी ही रुग्णसविस्तर बातमी

आपण स्कूटर वरून निघालोय, सिग्नलवर उभे असताना एक महोदय आपल्याला येवून धडकतात, आपला पाय फ्रॅक्चर होतो, डॉक्टर आपल्याला महिनाभर वॉकर घेऊन चालायला सांगतात आणि बरंच काही, आता ही सगळी उपकरणं म्हणजे काही हजारांचा नाहक चुराडा आणि नंतर काहीही उपयोग न होणारा खर्च....

पण आता तुमच्या मदतीला येते फाल्गुनी दोषी...

१ रुपयात व्हील चेअर, क्रंचेस, टॉयलेट चेअर आणि बरंच काही देणाऱ्या...आणि ते सुद्धा प्रेमाच्या कर्तव्यभावनेतून 
#Bharatiyans

ऑर्थोपेडीकच्या सदर्भात कोणतीही साधनं घ्या, एकतर ती खूप महागडी असतात आणि दुसरं म्हणजे थोडा वेळ आवश्यकता असेपर्यंत ती वापरली जातात आणि नंतर ती नुसतीच पडून राहतात.

आपल्या आजूबाजूला आज आपण अनेक लोक बघतो जे चार पायाची चौकट किंवा व्हील चेअर घेऊन जाताना दिसतात. रस्त्यांवरील अपघातांचं प्रमाण वाढलय आणि म्हणूनच अश्या उपकरणांची मागणी सुद्धा वाढलीय.

पण ही उपकरणं कधी कधी तर लाखांच्या घरात असतात. आधीच हॉस्पिटलचा खर्च, मानसिक आणि शारिक त्रास आणि वरून अश्या उपकरणांवर होणार खर्च म्हणजे दुष्काळात तेरावा महिना ... गरीब लोकांना तर हे सगळचं खूप अवघड होऊन बसतं.

पण हीच साधनं तुम्हाला निव्वळ १ रुपया रोज इतक्या स्वस्त भाड्याने मिळाली तर ?

यावर तोडगा म्हणजे अश्या उपकरणांची लायब्ररी ! 
आणि हि भन्नाट कल्पना सुचली वडोदऱ्याच्या फाल्गुनी दोषी यांना.

अशी अनोखी सेवा सुरु करणाऱ्या आणि ही रुग्णसेवा यशस्वीपणे चालवून दाखवणाऱ्या फाल्गुनी दोषी, चला आज जाणून घेऊया यांच्या बद्दल

आजचं जग खूप धावपळीचं झालं आहे, आपलं जीवनमान बदललं आहे, धकाधकीचं झालं आहे आणि त्यातच आपल्याला किंवा कधी आपल्या जवळच्या व्यक्तींना हाडांचे दुखणे मागे लागते किंवा कधी अपघातामुळे आपण स्वतः चालू फिरू शकत नाही. कधी घरात वयस्कर आजी आजोबा असतात त्यांना स्वतःच्या स्वतः उठता बसता, चालता फिरता येत नाही.

या असल्या परिस्थितीसाठी आपल्या गरजांसाठी आता विज्ञानाने बरीच प्रगती केली आहे आणि या आपल्या सर्वांच्याच प्रत्येक गरजेसाठी आवश्यक आणि आयुष्य सोयीचे होईल अशी उपकरणे वेळोवेळी विकसित केली आहेत. ही उपकरणे असलेली दुकाने तुम्हाला ऑर्थोपेडिक वा अक्सिडेंट हॉस्पिटलच्या शेजारी दिसतील.

एके दिवशी फाल्गुनी आपल्या एका ओळखीच्या घरी गेल्या असता त्यांचे लक्ष अडगळीत पडलेल्या व्हील चेअर, वॉकर आणि स्टिक कडे गेलं आणि चौकशीअंती त्यांना कळालं की ही सगळी उपकरणं त्यांच्या आजीसाठीच आणली होती आणि आता आजी वारल्यामुळे ती तशीच अडगळीत पडून आहेत.

हे कळल्या कळल्या त्यांच्या डोक्यात चक्र सुरु झालं. “अशी अनेक लोकं असतील ज्यांच्याकडे अशी उपकरणं अडगळीत पडून असतील, फक्त ती महाग असल्याने ती कोणी फेकून देत नाही एव्हढंच काय ते. मग, हीच उपकरणं जर गरजू आणि गरीब लोकांना रास्त दरात एक रुग्णसेवा म्हणून उपलब्ध करून देता आली तर किती छान होईल.”

आता फाल्गुनी आणि त्यांच्या एका मित्राने मिळून लगेचच ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली. आपल्या ओळखीच्या लोकांना, नातेवाईकांना आवाहन करून वापरात नसलेली अनेक साधनं या दोघांनी जमा केली आणि आवश्यक ती साधनं गरजेपुरती वापरून गरज पूर्ण झाल्यावर परत देता येतील अशी सोय केली.

सुरवातीला ही सर्वच उपकरणं फाल्गुनी विनामूल्य देत होती पण त्याचा होणारा विपर्यास लक्षात घेता त्यांनी नाममात्र भाडे घेण्याचं ठरवलं.

पण गरीब लोकांसाठी ही सेवा असल्याने त्यांनी फक्त १ रुपया आणि काही उपकरणांसाठी ५ रुपये असं भाड घेण्यास सुरुवात केली.

फाल्गुनीला ह्या सत्कार्यात मदत करणाऱ्या मित्राला काही कारणामुळे हे काम थांबवावे लागलं. परंतु “घेतला वसा सोडू नये” ह्या उक्तीवर ठाम रहात थोडी थोडकी नाही तर गेली तब्बल १६ वर्ष फाल्गुनी दोषी यांनी ही रुग्णसेवा अविरत चालू ठेवली आहे.

फाल्गुनीच्या ह्या कामाची दखल समाजातल्या अनेक चांगल्या लोकांनी घेतली. अनेकांनी त्यांना उपकरणे घेण्यास पैसे दिले तर काहींनी स्वतःहून ही अश्या प्रकारची महागडी उपकरणे त्यांना दान सुद्धा केली.

१९९९ मध्ये चार उपकरणे घेऊन सुरु केलेली ही सेवा आजमितीस तशीच निस्पृह भावनेने सुरु आहे. आज फाल्गुनी कडे १०० एक वेगवेगळी उपकरणं आहेत. त्यात एअर बेड, हॉस्पिटल बेड, गुढग्याचा पट्टा, मानेचा पट्टा, व्हील चेअर, वॉकर, टॉयलेट चेअर, स्टिक आणि असलं बरंच काही आहे.

फाल्गुनी मुंबईतल्या सामान्य कुटुंबात वाढल्या, टेक्स्टाईल मध्ये डिग्री घेतल्यावर त्यांचे लग्न स्वतःचा व्यवसाय असलेल्या कुटुंबात झाला. लहानपणापासून समाज सेवा करावी असं स्वप्न बाळगणाऱ्या फाल्गुनीला रुग्णांच्या ह्या आगळ्या वेगळ्या सेवेतुन आपलं स्वतःच स्वप्न पूर्ण करता आलं.

५० वर्षीय फाल्गुनी सांगतात ,\\\\'\\\\'ही सेवा करण्यात एक वेगळंच समाधान मिळते. हे काम आम्ही पैसे वा नफा मिळवण्याच्या हेतूने करत नाही. गरीब, गरजू, वृद्ध आणि आजारी लोकांचे आशीर्वाद या कामातून मिळतात हीच माझी मोठी कमाई आहे. \\\\'\\\\'

आपण सर्वानीच आत्तापर्यंत कुठे ना कुठे कधी ना कधी अशी उपकरणे अडगळीत बघितली असतील पण फाल्गुनीला त्यातून ही अशी आगळी वेगळी सेवा सुरु करावीशी वाटली आणि तिने ती अनेक वर्ष सुरु ठेवली.

फाल्गुनीच्या ह्या आगळ्या वेगळ्या सेवेला टीम भारतीयन्स च्या खूप खूप शुभेच्छा !

For more details, contact Mrs. Falguni Doshi at – falgunikd19@gmail.com

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

वैशाली सागर - देवकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

achhikhabre.com