Bhartiyans

Menu

सायना नेहवाल आणि आता Giant killer पी. व्ही. सिंधूचे गुरु पी. गोपीचंद

Date : 09 Nov 2016

Total View : 359

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम गाजवणारा आणि त्याकाळी जागतीक क्रमवारीत २ नंबर स्थानावर असणारा हा बेचाळीस वर्षांचा तरुण, पी. गोपीचंद, आधी खेळाडू आणि आता प्रशिक्षक!


सारांश

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम गाजवणारा आणि त्याकाळी जागतीक क्रमवारीत २ नंबर स्थानावर असणारा हा बेचाळीस वर्षांचा तरुण, पी. गोपीचंद, आधी खेळाडू आणि आता प्रशिक्षक!सविस्तर बातमी

“4 am, A time when Legends either wake up or go to sleep”

ही आहे आपल्या रियो फायनलमध्ये गेलेल्या पी. व्ही. सिंधूच्या गुरुंची म्हणजेच पुल्लेला गोपीचंदची गोष्टं ! थोडा वेळ काढा आणि नक्की वाचा\'च....

आपण आपल्या ऑलम्पिक खेळाडूंकडून पदकाची लाख अपेक्षा करतो पण त्यासाठी त्यांनी आयुष्यभर घेतलेले कष्ट त्यांच्याकडे आणखी अपेक्षेने बघत असतात.

रोज पहाटेची ४ ते ७ ही वेळ गोपीचंदच्या गुरुकुलाच्या कोर्टामध्ये ‘हायर हायर हायर!!!’ असाच आवाज घुमतो...

पहाटे ४ वाजतां गोपीचंद याच्या या प्रशिक्षणा ठिकाणी सगळ्यात पहिला येणारा स्वतः गोपीचंदच असतो...मग उन असो, वारा असो, पाउस असो वा काहीही असो....

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम गाजवणारा आणि त्याकाळी जागतीक क्रमवारीत २ नंबर स्थानावर असणारा हा बेचाळीस वर्षांचा तरुण, पी. गोपीचंद, कधीच या खेळातून निवृत्त झाला नाही. त्याने फक्तं त्याची भूमिका बदलली...

आधी खेळाडू आणि आता प्रशिक्षक, ब्बास....

गोपीचंद नियमीत योगा करतो आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांकडून करवून सुद्धा घेतो.

ऑल इंग्लंड चॅम्पियनशीप जिंकल्यानंतर कोक आणि पेप्सीने त्यांच्या शितपेयांची ऍड गोपीने करावी म्हणून त्याला कोट्यवधींची ऑफर दिली होती.

पण , \'कोक आणि पेप्सी पिणे हे शरीराला घातक आहे आणि म्हणून माझ्या देशाच्या तरुणांचे नुकसान मी करणार नाही\' असं म्हणतं गोपीचंदने कोट्यवधी रुपयांवर सहजपणे पाणी सोडले होते.

सहा वर्षांपूर्वी गोपीचंदकडे फक्तं सायना नेहवाल होती ,

पण आता भारतातला प्रत्येक बॅडमिंटन खेळाडू ह्या माणसाकडून प्रशिक्षण घेण्याचं स्वप्नं पाहतो !

आणि ते पूर्ण झालं तर एक म्हणजे स्वतःला धन्य मानतो आणि दुसरं म्हणजे देशासाठी जीवाचे रान करतो....

सिंधूच्या बाबांनी पी. व्ही. रमणा यांनी एका मिडीयाला एक किस्सा सांगितला,

तो इथे मुद्दामून सांगावासा वाटतो..

सिंधू जेव्हा पहिल्यांदा गोपीचंदकडे गेली, तेव्हा \"५० एक प्रशिक्षक, अनेक खेळाडू यांच्या समोर, त्याच्या संपूर्ण कोर्टाच्या मधोमध उभं राहून जोपर्यंत ती मोठ्याने ओरडत नाही, तोपर्यंत तिने रॅकेटला हात लावायचा नाही\" अशी तिच्या प्रशिक्षणाची सुरुवात गोपीचंद यांनी केली.

सिंधू अतिशय मृदुभाषी मुलगी आहे.

तिच्यासाठी हे असं करणं खूप वेगळं आणि कठिण होतं. पण तिने ते केलं...

आणि ओरडून झाल्यावर ती ओक्साबोक्षी रडली.

हे असं करण्यामागे काय कारण असेल ?

तर, तिच्या वडिलांच्या, भारताच्या व्हॉलीबॉल टिमचे १९८६ च्या आशियाई स्पर्धेचे कांस्य पदक विजेते खेळाडू, पी. व्ही. रमणा, त्यांच्या म्हणण्यानुसार गोपीचंद यांनी आपल्या या नवीन शिष्येकडून घेतलेला हा वरवर विचित्र वाटणारा प्रकार खरंच खूप वेगळा पण अत्यावश्यक असाच होता.

आपल्या भारतातली मुलं खूप सुरक्षित वातावरणात वाढतात, त्यांची देहबोली विलक्षण मृदु असते.

पण , \'In sports, domination is the key!\'

म्हणून हा मानसिक व्यायाम सिंधूसाठी गरजेचा होता.

आणि कालची सेमीफायनल जर आपण बघितली असेल तर सिंधूच्या देहबोलीतही गोपीचंदचं करारी प्रशिक्षण आपल्याला निश्चितपणे जाणवतं.

गोपीचंद यांनी प्रशिक्षक म्हणून त्यांच्या करिअरला सुरुवात केली तेव्हा खूप जणांनी त्यांना घाबरवलं ,

आपली सिस्टीम तुम्हाला यशस्वी होऊ देणार नाही अशा शब्दात सांगितलं ,

पण त्यावर गोपीचंद यांची एकच भूमिका होती ,

!!नहीं रुकना नहीं थकना ,

अविरत चलना अविराम चलना\' !!

गोपीचंदच्या कुठल्याही विद्यार्थ्याने कुठेही मेडल मिळवलं तर त्यानंतर त्याची एकच प्रतिक्रिया असते, \'more responsibility!\'

आठवड्यातले सहा दिवस गोपी आणि सिंधू पहाटे उठून सुर्याच्याही आधी मेहेनतीला सुरुवात करायचे आणि एकंदरच सूर्यदेवतेला हरवायचे...

प्रचंड सराव, अविश्रांत कष्ट आणि अपरंपार मेहनत केली तेव्हा कुठे सिंधू आता \'Giant killer\' म्हणून ओळखली जाते आहे.

आपल्या देशात असे मेहनती गुरु आहेत आणि त्यांचे मेहनती शिष्य!

गोपीचंदचं कालचं मॅचच्या वेळेसचं रूप बघण्यासारखं होतं...

\'His soul was playing the game...\' असं म्हणता येईल...

आज आपण सुवर्णपदकाची लढाई लढणार आहोत...

गोपीचंदला आणि त्याची शिष्या सिंधूला \"टिम भारतीयन्स\"चा मानाचा मुजरा ,

 

जगभरातल्या भारतीयांच्या आणि भारतातल्या सव्वाशे कोटी शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत...मन:पूर्वक पाठीशी आहेत....

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य