Bhartiyans

Menu

“कधीकधी सर्वोत्तम उत्तरं दडलेलं असत साध्या-सोप्या गोष्टींमध्ये” असं आत्मविश्वासाने म्हणतेय २६ वर्षीय, दिव्या रावत.

Date : 09 Nov 2016

Total View : 200

उत्तराखंड, देवभूमी, हिमालयानी वेढलेली पण त्यामुळेच नैसर्गिक आपत्तींना तोंड देणारी आणि उपजिवीकेसाठीही झगडणारी, यातूनच तिथे उदयाला आलं एक विदारक सत्य, याच देवभूमीत आहेत कितीतरी 'घोस्ट व्हिलेजेस'. खोटं व


सारांश

सात वर्षांची असतानाच वडलांचे छत्र हरवलेली दिव्या आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी म्हणून दिल्लीत आली. पण तिथल्या आपल्या राज्यातल्या बांधवांचे हाल बघून खूप दु:खी झाली. शिक्षण पूर्ण करून, MNCच्या ऑफर्स नाकारून, एका NGO त काम करताना तिने त्यांच्यासाठी काहीतरी करायचा अपुरा प्रयत्न केला. काहीतरी केलं पाहिजेसविस्तर बातमी

 

“कधीकधी सर्वोत्तम उत्तरं दडलेलं असत साध्या-सोप्या गोष्टींमध्ये.” असं आत्मविश्वासाने म्हणणारया २६ वर्षीय कणखर दिव्या रावतने निर्माण केल्या उत्तराखंडसाठी पोटापाण्याच्या आणि जगण्याच्या संधी...
एका उत्तम व्यवसायामुळे स्वतःच्या राज्यासाठी रोजगार निर्माण केलाय या मुलीने....
उत्तराखंडातून शहरांकडे जाण्याचा तिथल्या नागरिकांचा ओघ सुद्धा आता तीने थोपवलाय यामुळे, 
कोण म्हणतं मुली व्यवसायाची आव्हाने स्वीकारू शकतं नाहीत ?
#Bharatiyans

 

उत्तराखंड .. देवभूमी .. हिमालयानी वेढलेली पण त्यामुळेच नैसर्गिक आपत्तींना तोंड देणारी आणि उपजिवीकेसाठीही झगडणारी, यातूनच तिथे उदयाला आलं एक विदारक सत्य, याच देवभूमीत आहेत कितीतरी \\' घोस्ट व्हिलेजेस\\'. खोटं वाटतं ना? पण खरच आहे हे, इथे कित्येक खेड्यात अक्षरश: २-३ कुटुंबं सोडली तर पूर्ण गाव ओस पडला आहे. कारण, उपजिवीकेसाठी गावच्या गावं स्थलांतरीत झाली आहेत.

 

बहुतेक जणं दिल्लीत स्थायिक झालेत पण दिल्लीत तरी कुठे स्थैर्य मिळालय या लोकांना ?

 

तिथेही अंगमेहनतीची कामे करून , ढाब्यांवर , चहाच्या टपरींवर काम करून कशीबशी गुजराणच होते.

 

अशा या परिस्थितीत दिल्लीत अवतरली या देवभूमीतलीच देवदूत, त्याच भूमीतली कन्या जी या लोकांसाठी साक्षात देवानेच पाठवली असं म्हणायला हरकत नाही..

 

नाव.. दिव्या रावत !

 

सात वर्षांची असतानाच वडलांचे छत्र हरवलेली दिव्या आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी म्हणून दिल्लीत आली पण तिथल्या आपल्या राज्यातल्या बांधवांचे हाल बघून खूप दु:खी झाली.

 

शिक्षण पूर्ण करून , आलेल्या MNCच्या ऑफर्स नाकारून एका नावाजलेल्या NGO त काम करताना तिने त्यांच्यासाठी काहीतरी करायचा प्रयत्न केला पण अर्थातच तो अपुरा होता.

 

तिची अस्वस्थता वाढतच होती. काहीतरी केलं पाहिजे या विचारानी ती पछाडली होती पण नेमक काय करायचं ते सुचत नव्हतं.

 

आणि अशातच अजून एका भयंकर नैसर्गिक आपत्तीने तिच्या उत्तराखंडला हादरवून सोडलं. 
२०१३ चा तो भयानक पूर ..

 

आता मात्र दिव्याचाही बांध कोसळला. 
तिने तडक स्वतःचा जॉब सोडला आणि ती डेहराडूनला परत आली, डोक्यात ठाम विचार आणि काहीतरी ठोस करण्याचा ध्यास घेऊनच.

 

आता तिच्यासमोर एकच ध्येय होतं, आपल्या राज्यातल्या लोकांना त्यांच्याच स्वतःच्या राज्यात रोजगार उपलब्ध करून द्यायचा.

 

आणि तो पण असा पाहिजे होता की त्यांना स्वाभिमानाने जगता तर आलच पाहिजे आणि कमीतकमी गुंतवणूकीतून ते साध्य झालं पाहिजे.

 

त्याही पुढे जाऊन तिचं उद्दिष्ट होतं की जे लोक ऑलरेडी स्थलांतरीत झालेत त्यांना परत आणून त्यांनाही रोजगाराची संधी निर्माण करायचं.

 

मग कमी गुंतवणूक, स्थानिक उपलब्धता यांचा विचार करून तिने एक उद्योग शोधून काढला, 

 

\\"मशरूमची लागवड\\"

 

आता मशरूमची लागवड का?

 

एक तर मशरूमच्या लागवडीला लागणारी गुंतवणूक कमी, लागणारे खेळते भांडवल कमी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा व्यवसाय घरगुती स्वरूपातही करता येतो.

 

कारण जास्तीत जास्त लोकांनी यात पडायचे असेल तर संपूर्ण प्रक्रिया ही अत्यंत सुलभ हवी.

 

आता गुंतवणूकीची रक्कम अजून कमी व्हावी म्हणून दिव्याने मेटल स्ट्रक्चर्स ऐवजी बांबूची रॅक्स तयार केली , त्यामुळे खर्च तर कमी झालाच शिवाय vertical cultivation मुळे जागेचीही खूप बचत झाली.

 

आता अजून एक काम शिल्लक होते ते म्हणजे मशरूमच्या फायदेशीर आणि किफायतशीर जातीची निवड.

 

कोणत्या जातीचे मशरूम लावावे की ज्याला उत्तराखंड मधली हवा सूट करेल , जे इनडोअर सुद्धा छान वाढतील आणि ज्यांच्यासाठी वातानुकूलन सुद्धा लागणार नाही. यासाठीचे संशोधन करताना तिला ३ जाती आढळून आल्या. एक बटण, दुसरे ऑयस्टर आणि तिसरे मिल्की मशरूम.आता अशी सुरूवात झाली सौम्या फूड्स प्रा. लि. ची. यात तिला तिच्या फॅमिलीचे संपूर्ण पाठबळ मिळाले, अगदी आर्थिक सुद्धा आणि आता मात्र तिची जोरदार घोडदौड सुरू झाली.

 

मशरूमसना असणारी मागणी इतकी प्रचंड आहे की विक्री कशी करायची हा प्रश्नच येत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उद्योग सुरू झाला आणि कित्येक स्थानिकांना जगाच्या जागी रोजगाराची संधी मिळू लागली.

 

आता पुढचं पाऊल होतं ते म्हणजे संपूर्ण राज्यभर या उद्योगाची माहिती पोहोचवणे.

 

तेही तिने सहजपणे केले. “५०००० रुपयांची गुंतवणूक करा आणि उद्योजक व्हा” हा मंत्र आता दिव्याने राज्यभर दिला. याला भरघोस प्रतिसाद मिळाला.

 

ज्यांना तेही शक्य नाही त्यांना ती स्वतःकडची १ बॅग देते आणि त्यात असलेल्या मार्गदर्शन कीटच्या सहाय्याने मशरूम कसे वाढवायचे याचे मार्गदर्शनही करते.

 

याबरोबरच शेवटचं पण महत्वाचं म्हणजे या घोस्ट व्हिलेजेस मधे , जिथं स्थानिक लोकांना वरीलपैकी काहीच शक्य नाही पण डोळ्यात जगायची आस तर आहे तिथल्या लोकांसाठी तिने पाड्या पाड्यांवर थेट स्वतःची युनिट्सच काढली आणि यशस्वीपणे संवाद साधत, नेतृत्व देत चालवायला सुरुवात केली.

 

आता या सगळ्याला तिथल्या लोकांचा प्रतिसाद तर मिळतोच आहे पण जे स्थलांतरीत झालेत तेही हळुहळू गावात परत येत आहेत आणि या उद्योगात सहभागी होत आहेत...

 

खरंच Hats off Divya ...

 

स्वत:साठी काहीतरी करणारे, झगडून उभे राहणारे खूप जण असतात पण आपल्या राज्यासाठी, तिथल्या आपल्या लोकांना बरोबर घेऊन जाणाऱ्या आणि स्वतःसोबत त्यांना सुद्धा स्वावलंबी करून स्थानिकांच्या आयुष्यात नवी पहाट आणणाऱ्या दिव्या रावतला ‘टीम भारतीयन्स’चा मानाचा मुजरा .

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य