Bhartiyans

Menu

वॉटर व्हील - Water wheel

Date : 09 Nov 2016

Total View : 387

ग्रामीण स्रियांच्या आयष्यातील बराचसा वेळ पाणी वाहून आणण्यात जातो. त्यांचे कष्ट कमी करण्यासाठी Cynthia यांनी निर्मिती केली ती एका जलवाहू चक्र - वॉटर व्हील ची


सारांश

ग्रामीण भागातील स्त्रियांच्या आयुष्यातील २५% वेळ पाण्याची जमवाजमव करण्यात वाया जातो. ग्रामीण स्त्रीयांच्या गरजा आणि सोय यांचा अभ्यास करून Cynthia यांनी जलवाहू चक्र म्हणजेच वॉटर व्हील ची निर्मिती केली. उत्कृष्ट प्रतीचे प्लास्टिक वापरून हे व्हील बनवण्यात आले आहे. त्याची डिझाईन अशी आहे कि कितीही वजनाचसविस्तर बातमी

"जलवाहू चक्र - वॉटर व्हील"

ह्या वर्षी छान पाऊस पडला धरणे भरली आहेत . पाणीटंचाई कमी झाली . पण हि परिस्थिती सगळी कडे नाही. भारतातच नव्हे तर अनेक गरीब देशांतील ग्रामीण भागात पाण्यासाठी वणवण करत फिरावे लागते. 
पाणी म्हणजे जीवन आणि ते मिळवण्यासाठी कष्टाच्या द्रुष्ट चक्रातून मुक्ती देणारे एका चक्राच्या निर्मितीची कथा ... 
# Bhartityans

डोक्यावर हांडेंच्या हांडे घेऊन पाणी वाहणाऱ्या स्त्रिया हे दृश्य चित्रात रंगवायला कितीही छान असले तरी प्रत्यकात हे फार वेदना दायी आहे.

ग्रामीण भागातील स्त्रियांचा पाण्याची जमवाजमव करण्यात आयुष्यातील २५% वेळ वाया जातो. एका दशकांपेक्षा जास्त काळ ग्रामीण भागात काढल्यानंतर Cynthia Koenig यांनी ह्या समस्येवर उपाय काढण्याचे ठरविले. ग्रामीण स्त्रीयांशी बोलून त्यांची गरज आणि सोय यांचा अभ्यास करून Cynthia यांनी निर्मिती केली ती एका जलवाहू चक्र - वॉटर व्हील ची. आपला MBA चा अभ्यास करत असताना Cynthia यांनी Wello व्हेलो ह्या संस्थेची स्थापना केली.

त्यांना ह्या व्हील ची कलपना ते भारतात २०१० मध्ये एका ट्रिपवर असताना सुचली. राजस्थान मधील लोकांशी बोलता बोलता त्यांनी विचारले कि डोक्यावरून पाणी वाहून आणण्यापेक्षा जर पाणी ढकलत सोपे जाईल आणि वॉटर व्हील चा जन्म झाला.

उत्कृष्ट प्रतीचे प्लास्टिक वापरून हे व्हील बनवण्यात आले आहे. खरे बघता हा एक वेगवेगळ्या लिटर क्षमतेचा हा गोल ड्रम आहे . पण त्याची डिसाईन अशी आहे कि कितीही वजनाचे असले तरी ते एका हाताने त्याला असलेल्या दांड्याला धरून सहज खेचता येईल. आपण लहान पाणी चकरी फिरवायचो इतका सोप्पे. त्याचे कॅप इन कॅप हि झाकणाची विशिष्ट डिझाईन पाण्याला सांडण्यापासून आणि अस्वच्छतेपासून वाचवते. तसेच पाणीही यातच साठवता येते त्यामुळे वेगळे साठवणुकीची गरज नाही.

एकाच फेरीत ५० लिटर पर्यंत पाणी वाहून आणता येते.

लांबच लांब पायपीट , हातात बादल्या, डोक्यावर हंडे व प्लॅस्टिकचे ड्रम ह्यामुळे अनेक शारीरिक व्याधीही जडतात.

ह्या व्हील ची निर्मिंती स्त्रियांना गृहीत धरून करण्यात आली होती परंतु आता हे व्हील पुरुषांमध्येही लोकप्रिय झालाय. ह्या व्हील च्या अतिशय सोप्या वापरामुळे अनेक पुरुषांनी आता पाणी आणायची जवाबदारी उचलली आहे. त्यामुळे नकळतच स्त्रियांना हातभार लागतोय. फक्त पाणीच नाही तर सिंचनांसाठी, जनावरांना पाणी द्यायलाही ह्या व्हील चा वापर होताना आपल्याला दिसेल.

भारतात अहमदाबाद येथे ह्या व्हील चे उत्पादन करण्यात येतेय आणि मुंबईत ह्या संस्थेचे कार्यालय आहे.

आणि ह्या संस्थेचे भारतातील काम सांभाळण्याची जबाबदारी उचलली पुण्याच्या श्रद्धा राव यांनी. त्या म्हणतात कि जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा व्हावा. म्हणून त्यांनी सेवाभावी संस्थांना वैयक्तिक पातळीवर लोकांना आवाहन केले आहे कि जे गरीब लोक हे व्हील खरेदी करू शकत नाही त्यांना भेट द्यावी. कमीत कमी नफ्यावर जास्तीत जास्त व्हील लोकांपर्यंत पोहचण्यावर आमचा भर आहे असेही श्रद्धा म्हणतात.

आरामदायी परिस्थितीतीतही दुसऱ्या स्त्रीयांच्या कष्टांची जाणीव ठेऊन त्यांचे कष्ट कमी करण्याचा प्रयत्न Cynthia Koenig यांनी केला. त्यांच्या ह्या प्रयत्नाला टीम भारतीयंन्स चा सलाम!!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

वैशाली सागर - देवकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

The Better India