Bhartiyans

Menu

“उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म” करणारा हा अत्यावश्यक उपक्रम

Date : 10 Nov 2016

Total View : 593

“”अन्न असलेल्यांकडून अतिरिक्त अन्न गोळा करून अन्न नसलेल्यांमध्ये ते व्यवस्थित वितरित करणे हा खाद्य आणि पेय ए. टी. एम. मागील उद्देश आहे.”


सारांश

प्रत्येकाला माहिती आहे कि आज देशभरात कितीतरी लोक एक वेळ जेवतात आणि काहींना तर तेहि नशिबी नसते. दुसऱ्या बाजूला आणेल अशी लोक आहेत जी रोज अण्णा वाया घालवतात. हॉटेल यामध्ये अण्णा वाया जाते. यावर उपाय म्हणून उभे राहिला तामिळनाडूच पहिलं वहिलं ‘खाद्य-पेय’ ए.टी.एम. ह्या उपक्रमात आपल्याला एकाच करायचे कि आपलसविस्तर बातमी

आपण कधीच घरी मोजून-मापून जेवण करू शकत नाही. 
आपल्या घरी वा समारंभात काही ना काही कारणाने खाद्यपदार्थ उरतात आणि नंतर एकतर हे फेकून द्यावे लागतात वा ‘याच आता काय करायचं?’ हा प्रश्न आपल्याला पडतो.
पण, याचवेळी , आपल्या आजूबाजूला असे शेकडो भुकेले गरजू बांधव असतात ज्यांना जगण्यासाठी, पोट भरण्यासाठी अन्नाची अतोनात निकड असते.

अश्या भुकेल्या बांधवांचे एका विलक्षण उदात्त सामाजीक जाणीवेतून “उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म” करणारा हा अत्यावश्यक उपक्रम.... 
#Bharatiyans

कोइम्बत्तूरला तामिळनाडूच पहिलं वहिलं ‘खाद्य-पेय’ ए.टी.एम. मिळून फक्त काहीच दिवस झाले आहेत, परंतु असं वाटतं की शहरातील या पहिल्याच पदपथ फ्रिजने अनेकांची मने जिंकली आहेत.

\\"अप्रतिम लोकसहभागामुळे आत्तापर्यंत सुमारे ५५ गरजू लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो आहोत\\" असे शहरातील \\'नो-फूड-वेस्ट\\' या संस्थेचे अधिकारी पद्मनाभन गोपालन सांगतात. ही संस्था ‘कोलिवूड कॅफे’ नामक स्थानिक हॉटेलच्या सहकार्याने हा उपक्रम राबवते.

“”अन्न असलेल्यांकडून अतिरिक्त अन्न गोळा करून अन्न नसलेल्यांमध्ये ते व्यवस्थित वितरित करणे हा खाद्य आणि पेय ए. टी. एम. मागील उद्देश आहे.”

तुम्ही फक्त येव्हढच करायचय, आपल्याजवळ शिल्लक राहिलेले अन्न व्यवस्थित बांधून आर एस पुरम इथल्या ‘कोलिवूड कॅफे’च्या बाहेर सज्ज ठेवलेल्या पदपथ फ्रिजमध्ये आणून ठेवायचय.

१४ ऑगस्टला सुरु केलेल्या या ए. टी. एम.ची क्षमता दिवसाला २० ते ३० लोकांना अन्न पुरवठा करू शकण्याइतपत आहे.

\\"हा उपक्रम पूर्णपणे माणसांचे संबंध, सदभावना आणि लोकनिधी या तत्वांवर बेतलेला आहे. आम्ही कॅफेत येणाऱ्या ग्राहकांना कूपन देतो आणि ह्या उपक्रमाविषयी त्यांना माहिती देतो. ते लोक मग ती कूपन गरजूंपर्यंत पोहोचवतात आणि त्यांना ए. टी. एम.विषयी सांगतात. आम्ही सुरुवातीला कचरा गोळा करणारे लोक आणि त्यांच्या मुलांना प्राधान्य दिलंय.

कारण हे लोक मीडिया किंवा इतर कुठल्याही दळणवळणाच्या साधनापर्यंत पोहोचू शकत नाहीतं; त्यांच्यातील प्रत्येकापर्यंत पोहोचणे किंचित कठीण आहे.

\\'नो फूड वेस्ट\\' या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही वेल्लोर कचरा यार्ड मधील कुपोषित मुलांबरोबर काम केलंय आणि त्यांना अन्न पुरविण्याची यंत्रणा आम्ही राबवली आहे.

त्या उपक्रमातून आम्ही जे शिकलो त्याचा वापर आम्ही \\'खाद्य आणि पेय ए. टी. एम.\\'साठी करतोय. या उपक्रमासाठी सहाय्य करणारे पूर्णवेळ स्वयंसेवक आमच्याकडे आहेत आणि ते आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत करतात,\\" पद्मनाभन सांगतात.

आपल्याजवळ असलेलं खाण्यायोग्य अतिरिक्त अन्न लोक इथे अमाप उत्साहाने आणून देतात.

पेरूर हरिहरन सुरेश नावाच्या एका हॉटेल मालकाने सांगितले की, \\"सुरुवातीचे दोन दिवस आम्हाला हॉटेलमधलं अन्न फ्रीजमध्ये भरावं लागलं पण आता जनतेने त्याची जबाबदारी घेतली आहे. जरी आम्ही २ - ३ दिवस टिकणाऱ्या पदार्थांना प्राधान्य देत असलो तरी बिर्याणी, पराठा, दहीभात यांसारखे पदार्थ देखील लोक देतात.

दिवसागणिक कमीतकमी १० ते १२ लोकांना आम्ही अन्न पुरवू शकतो. हॉटेल १२ वाजे पर्यंत खुले असते. आणि जर कोणाला त्यानंतर जेवण हवं असेल तर त्याने खाद्य कूपन ए. टी.एम. च्या सुरक्षा कर्मचाऱ्याला दाखवायचे. त्यांच्याकडून ते कूपन घेऊन पुढील ग्राहकांना देण्यात येतं अन अश्या प्रकारे हि प्रक्रिया चालू रहाते. ए. टी.एम. नेहेमी खुलं असतं.”

पद्मनाभन पुढे सांगतात,\\" दुर्दैवाने, काही शिळे होण्याच्या मार्गावर असलेले पदार्थ आमच्यापर्यंत येतात, म्हणून आम्ही लोकांना पोळी, फळं, न्याहारीचे पदार्थ वा तत्सम कच्चे अन्न आणण्यास प्रोत्साहीत करतो. 
इथे आम्ही लोकांच्या हेही निदर्शनास आणू इच्छितो की दुसऱ्या माणसाचे पोट ही काही कचरापेटी नव्हे. तेव्हा आम्ही लोकांना फक्त ताजंच अन्न दान करण्याची विनंती करतो.\\"

अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने, हा समूह आत्ता शहरातील अन्य हॉटेलांच्या सहयोगाने काम करण्याचा विचार करतो आहे.

\\"शहरातील विविध हॉटेल्सना बरोबर घेऊन काम केल्यास या उपक्रमाला नजीकच्या काळात अजून मजबूती मिळेल. यावर चर्चा करण्यासाठी आम्ही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहरातल्या हॉटेल मालकांची एक बैठक बोलविणार आहोत. आर एस पुरम मधील ए. टी. एम. चा अंदाज आल्यावर आम्ही शहरात आणखी खाद्य-पेय ए . टी. एम. सुरु करण्यावर विचार करू. त्यासाठी जागा हेरण्यास आम्ही सुरुवात केली आहे.

आम्हाला चांगलं जेवण मिळू न शकणाऱ्या सगळ्या असहाय्य , गरीब आणि माध्यम वर्गीय माणूस ज्याचं पाकीट हरवलं आणि उपाशी आहे, पण काही खाण्यासदेखील पैसे नाहीत अश्या सर्वांपर्यंत पोहोचायचंय,\\" इथे पद्मनाभन थांबतात.

समाजात आसपास गरीब आणि उपाशी असलेल्या लोकांपर्यंत पोचून त्यांना आपल्याला शक्य आहे तितकं जेवायला देणाऱ्या या उपक्रमाला ‘टीम भारतीयन्स’च्या खूप खप शुभेच्छा.

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

अंजली आमोणकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

इंडियाटाईम्स