Bhartiyans

Menu

"हम भारत की नारी हैं, फूल नही, चिंगारी हैं"

Date : 10 Nov 2016

Total View : 379

पुरुषप्रधान संस्कृतीत दुर्दैवाने स्त्रीला आज एक शोभेची वस्तू किंवा पुरुषांच्या हातातील खेळणं समजलं जातं पण स्त्रीला अबला समजायचे दिवस आता राहिलेले नाहीत, हे एका भारतीय खेड्यातल्या मुलीने जगाला दाखवून


सारांश

गुजरात येथील वाडिया गावात जिथे मुलगी वयात आल्याबरोबर तिला जबरदस्तीने देह विक्रीच्या धंद्यात फेकले जाते. तिथेच जन्मलेल्या एका मुलीने आणि तिला साथ देणाऱ्या तिच्या मित्राने ह्या समाज कंटक पद्धतीचा विरोध करत पळून जाऊन लग्न केले. तिच्या ह्या धाडसामुळे अनेक मुलींना ह्या पद्धतीला विरोध करायचे धारिष्ट आले आसविस्तर बातमी

"हम भारत की नारी हैं, फूल नही, चिंगारी हैं"

अन्याय करणे हे पाप आहेच पण अन्याय मुकपणे सहन करणे हे ही पापच!

समाजातील अपरुढी व अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची ताकद प्रत्येकात नसते. पण चिखलातच कमळ उगवते पण नंतर भगवंत चरणीच जाते.

पुरुषप्रधान संस्कृतीत दुर्दैवाने स्त्रीला आज एक शोभेची वस्तू किंवा पुरुषांच्या हातातील खेळणं समजलं जातं पण स्त्रीला अबला समजायचे दिवस आता राहिलेले नाहीत, हे एका भारतीय खेड्यातल्या मुलीने जगाला दाखवून दिले आहे.

प्रगतशील म्हणवणाऱ्या आपल्या देशात एक गाव असाही आहे जिथे गावातल्या प्रत्येक मुलीला देहविक्रीच्या धंद्यात ढकललं जातं. तिची मर्जी असो वा नसो. पण वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा धुळीला मिळवलेल्या शूर कन्येची ही कथा.... 
#Bharatiyans

एका मुलीचं एका उच्चवर्णीय मुलाशी प्रेम जुळतं. आपल्या कुटुंबाविरोधात जाऊन तोदेखील तिच्या प्रेमाला प्रतिसाद देतो. दोघंही समाजाचा रोष पत्करून उर्वरित आयुष्य एकत्र घालवण्यासाठी एकमेकांचा हात धरतात. अश्या देशभरात घडणार्‍या बंडकथा तुम्ही पुष्कळ ऐकल्या-वाचल्या असतील.

पण इथे मुलीचं बंड हे फक्त स्वतःच्या कुटुंबाविरोधात नसून ते वाडिया गावातील शतकानुशतके चालत आलेल्या परंपरे विरोधात आहे. या गावातील प्रत्येक मुलीला देह विक्रीच्या धंद्यात ढकललं जातं.

अनेक वर्षांपासून अनेक गावकर्यांनी गावात सुधारणा घडवून आणण्याचे खुप प्रयत्न केले परंतु म्हणावं तसं यश काही केल्या त्यांच्या हाती आलचं नाही.

गावातील पुरुषांना या मुलीचं प्रेम सफल व्हायला नकोय कारण त्यामुळे गावातील इतर स्त्रियांना प्रेरणा मिळेल आणि परंपरागत चालू असलेल्या देहविक्रीच्या धंद्यावर गदा येईल.

दुसऱ्या बाजूला, गावातली इतर लोकं आपलं काही बरंवाईट करतील ह्या भीतीने सध्या हे जोडपं मात्र विलक्षण दबावाखाली आणि असुरक्षित आहे.

केशाजी चौधरी, २५ आणि रुपल चौहान, २४ (खरी ओळख लपवण्यासाठी नावं बदलली आहेत), ही दोघं २६ ऑगस्ट २०१६ रोजी अहमदाबाद येथे नोंदणी पद्धतीने लग्न करून भूमिगत झाली.

रुपलसारख्या अनेक मुली ज्यांना या गावात वयाच्या १३व्या वर्षांपासून देहविक्रीच्या धंद्यात मनाविरुद्ध ढकललं जातं, त्यांच्यासाठी आपण एक उदाहरण ठरू त्या आधीच हे दलाल आमचंच उदाहरण बनवू इच्छितात असं ह्या जोडप्याला वाटतं.

वाडिया, प्रामुख्याने सरनिया नावाच्या भटक्या समुदायाचं वास्तव्य असलेलं हे गाव फार पूर्वीपासून वेश्याव्यवसायामुळे ओळखलं जायचं.

एका स्वयंसेवी संस्थेच्या हस्तक्षेपामुळे २०१२ साली इथे सामुदायिक विवाह लावून दिले गेले.

आपण लग्न केलं नसतं तर मला एखाद्या धनाढ्य माणसाची ठेवलेली बाई म्हणून जगावं लागलं असतं, असं रुपलने सांगितले.

"ज्या दिवशी आमचं लग्न झालं तो दिवस मला स्वप्नवत होता," रुपल सांगते. "मी माझं कुटुंब अन् माझ्या मुलांसोबत एक सामान्य जीवन जगु शकेन यावर माझा विश्वासच नव्हता. मला आशाच नव्हती पण केशाजीने मला शक्ती दिली."

मी रुपलला एका वर्षापूर्वी भेटलो असे केशाजीने सांगितले. अनेकदा भेटल्यानंतर त्याने स्वतःच्या भावना तिच्याशी व्यक्त केल्या. पण तिला आपला हेतू पटवून देण्यास त्याला सहा महिन्यांहून अधिक वेळ लागला.

रुपलने आपल्या कुटुंबाला आपल्या या सगळ्या घडामोडी सांगितल्या आणि मुख्य म्हणजे त्याक्षणी तरी त्यांनी आपला आधार दर्शविला हे विशेष.

पण एका दलालानं जेव्हा राजस्थानातील संचोर येथील ‘चांगला सोबती’ म्हणून एका धनाढ्य माणसाचं आमिष दाखवलं, जो वरवर पाहता तिचा स्वीकार करायला तयार होता; तेव्हा रुपलच्या नातेवाईकांनी आपलं मन बदललं.

आता मात्र परिस्थितीने या जोडप्याला २४ ऑगस्टला पळून जाण्यास भाग पाडलं.

"मी काही समाजकार्य नाही करत," पशुवैद्यकीय रुग्णालयात काम करणाऱ्या केशाजीने सांगितले, "माझं रुपलवर प्रेम आहे आणि पळून जाणे हा एकमेव पर्याय होता. ज्यात तिची काहीच चूक नाही अश्या तिच्या भूतकाळाची मला लाज नाही वाटत. आम्ही आयुष्याची नवीन सुरुवात करायचं ठरवलंय".

"पोलीस या जोडप्याला सुरक्षा देतील आणि त्यांना हवी असल्यास त्यांचा एफआयआर सुद्धा नोंदवतील", असा विश्वास बाणसकंठाचे पोलीस अधीक्षक नीरज बडगुजर यांनी दिला. "आत्तापर्यंत आम्हाला औपचारिक रित्या कसलीही तक्रार मिळालेली नाही," असे ते पुढे सांगतात.

"या जोडप्याचं लग्न हे या गावातलं एक महत्वाचं पाऊल ठरेल हे नक्की. आपण अश्या लोकांना आधार द्यायला हवा जेणेकरून हा गाव आपला भूतकाळ विसरून जाईल. दलालांनी गावकऱ्यांच्या जीवनावर संपूर्णपणे ताबा मिळवलाय आणि फक्त सरकारी हस्तक्षेपानेच ही स्थिती बदलू शकते," असे मत वाडियामध्ये पाहिलं सामुदायिक लग्न घडवून आणणाऱ्या, 'विचारता समुदाय समर्थन मंच' या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक विश्वस्त मित्तल पटेल यांनी व्यक्त केले.

या जोडप्याच्या धाडसाला भारतीयनस् चा सलाम!!

अंजली आमोणकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

इंडिया टाईम्स