Bhartiyans

Menu

केंद्रीय राखीव पोलीस दलाची ब्रँड अँबासेडर बनणार ऑलिम्पिक रजत पदक विजेती विख्यात भारतीय बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही. सिंधू

Date : 10 Nov 2016

Total View : 105

देशाच्या सर्वात मोठं निमलष्करी दल असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाने ऑलिम्पिक रजत पदक विजेती विख्यात भारतीय बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही. सिंधू हिला आपला ब्रँड अँबासेडर बनवायचं आणि तिला कमांडंटचं मानद पद


सारांश

देशाच्या सर्वात मोठं निमलष्करी दल असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाने ऑलिम्पिक रजत पदक विजेती विख्यात भारतीय बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही. सिंधू हिला आपला ब्रँड अँबासेडर बनवायचं आणि तिला कमांडंटचं मानद पद देण्याचं ठरविलं आहे. 3 लक्ष कर्मचारी , नक्षल-विरोधी मोहीम आणि देशातील वेगवेगळे अंतर्गत सुरक्षा ड्युसविस्तर बातमी

देशाच्या सर्वात मोठं निमलष्करी दल असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाने ऑलिम्पिक रजत पदक विजेती विख्यात भारतीय बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही. सिंधू हिला आपला ब्रँड अँबासेडर बनवायचं आणि तिला कमांडंटचं मानद पद देण्याचं ठरविलं आहे.
#Bharatiyans

अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय राखीव पोलीस दलाने केंद्रीय गृह खात्याला औपचारिक प्रस्ताव पाठवला आहे आणि जरूरी मंजूरी मिळाली की पी. व्ही. सिंधू यांना सन्मानित करून रँक बॅजेस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे Camouflage Combat Fatigues एका विशेष समारंभात प्रदान करण्यात येतील.

याबाबतीत केंद्रीय राखीव पोलीस दलाने सिंधुना कळवून त्यांची पूर्व-संमती घेण्यात आल्याचे समजते.

केंद्रीय राखीव पोलीस दलातील कमांडंटचं पद हे पोलीस दलातील पोलीस अधीक्षक पदाच्या बरोबरीचं असतं आणि लढाईच्या मैदानात तैनात असताना असा अधिकारी १००० सैनिकांच्या तुकडीचं नेतृत्व करतो.

केंद्रीय राखीव पोलीस दलाने सांगितले आहे की, 3 लक्ष कर्मचारी , नक्षल-विरोधी मोहीम आणि देशातील वेगवेगळे अंतर्गत सुरक्षा ड्युटी टास्कस या सर्वांनी मिळून सिंधूला निवडलं आहे.

तिच्या या नियुक्तीमुळे फक्त कर्मचाऱ्यांनाच अजून चांगलं काम करण्यास प्रोत्साहान मिळेल असे नाही तर यामुळे सर्व देशभरात महिला सशक्तीकरणाचा संदेश जाईल तसेच त्या कुठेही, कधीही आणि कश्यातही कमी पडत नाहीत हे सुद्धा सर्वांना आयतेच सांगितले जाईल.

केंद्रीय राखीव पोलीस दलाची ब्रँड अँबासेडर असल्यामुळे सिंधू जेव्हा खेळ आणि सरावातून रजा घेईल तेव्हा तेव्हा तिला सैनिकांसाठी प्रेरणादायी सत्रे घेण्यास सांगण्यात येईल आणि तिचा संदेश देशात विविध ठिकाणी तैनात असलेल्या सैनिकांना पाठविण्यात येतील.

१९८७ साली केंद्रीय निमलष्करी किंवा पोलीस दलात पाहिलं सर्व स्त्री बटालियन उभारायचं श्रेय केंद्रीय राखीव पोलीस दलालाच जातं आणि सध्या असे चार contingents आहेत ज्यामधील तीन कर्तव्य बजावण्यात सदैव सक्रिय आहेत.
काही वर्षांपूर्वी सीमा सुरक्षा दलाने क्रिकेटपटू विराट कोहलीला आपला ब्रँड अँबासेडर म्हणून नेमलं होतं.

हल्लीच पार पडलेल्या रिओ ऑलिम्पिक खेळात सिंधूने महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत ऐतिहासिक रजत पदक जिंकले आणि गेल्या २९ऑगस्ट रोजी इतर ऑलिम्पिक खेळाडू, कांस्य पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक, जिम्नॅस्ट दीपा कर्माकर आणि नेमबाज जितू राय यांच्या समवेत - \\"राजीव गांधी खेल-रत्न\\" - हा भारतातील खेळांमधील सर्वोच्च सन्मान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान करून या सर्वांनाच गौरविण्यात आले होते.

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

अंजली आमोणकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

इंडियन एक्स्प्रेस